राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध सर्वश्रृत आहेत. संधी मिळेल, तेव्हा उभयतांकडून परस्परांना शह-काटशह दिला जातो. कोश्यारी यांच्या नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यात पुन्हा एकदा त्याचे प्रत्यंतर आले. अर्थात, यावेळी सामना पालकमंत्री छगन भुजबळांशी असल्याने राज्यपालही तयारीने आले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक शाखेच्या कार्यक्रमात राज्यपाल-भुजबळ यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याने उद्योजक, व्यावसायिकांची करमणूक झाली. आजवर राज्यपाल अनेकदा नाशिकला आले आहेत. हा धागा पकडून त्यांचे नाशिकसह आपल्यावर प्रेम आहे. आमंत्रण दिले की, ते लगेच येतात. परंतु राजकारणातलं काही सांगितलं तर ते ऐकत नाहीत, असा टोला भुजबळांनी लगावला. राज्यपालांनी भुजबळांचे संदर्भ घेऊन टोलेबाजी केली. सर्व काही आपल्याच भागात हवे, असा हट्ट धरणाऱ्या लोकप्रतिनिधीची कथा कथन करीत भुजबळांचे तसे असल्याचे नमूद केले. राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्यापुढे कोणाला जाऊ देत नाही. दुसरे सोबत असणाऱ्याला दोन पावले पुढे नेतात. उद्योजकांनी दुसऱ्या लोकांप्रमाणे आपल्यासोबत इतरांना देखील पुढे घेऊन जाण्याचा विचार करावा. तेव्हाच ‘सबका साथ, सबका विकास ’ दृष्टीपथास येईल, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा