कोल्हापूरच्या राजकारणात बंटी आणि मुन्ना हे परवलीचे शब्द. दोघे एकेकाळचे जीवश्च कंठश्च मित्र. पुढे दोघात अंतर पडले. २०१९ सालच्या निवडणुकीत उभयतांनी पुन्हा गळय़ात गळा घातला. नंतर पुन्हा लगेचच दोस्ताना दुभंगला. तो अजूनही कायम आहे. तर असे हे माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक ही बंटी -मुन्नाची जोडी पालकमंत्री हसन मुश्रीफ या समान दुव्यामुळे एका कार्यक्रमात एकत्र आलेली. दोन ध्रुवावरचे दोन टोक जवळ आल्याचे अकल्पित चित्र पाहून उपस्थितांच्या नजरेत विस्मय दाटलेले. इतरांचे सोडा हे दोघेही मुश्रीफ यांच्या डाव्या- उजव्या बाजूला बसले असले, तरी या प्रसंगाने त्यांच्याही मनातल्या मनात हसू फुटत होते. एक मात्र झाले त्यांनी अखेपर्यंत बोलणे टाळले. नंतर चहापानासाठी मुश्रीफ यांच्या समोरच्या दोन खुर्च्यावर दोघेजण स्थानापन्न झाले; तेव्हाही मध्ये एका खुर्चीचे अंतर राहिले. हे अंतर कधीच मिटणार नाही हेच जणू दर्शवणारी ती पोकळी ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा