लोकसभा निवडणुकीची वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे. इच्छुकांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संधी मिळेल तिथे  सांगायला सुरुवात केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदारांची प्रतिमा लक्षात घेऊन महायुतीतील अनेकांनी आपल्या उमेदवारीचे घोडे दामटायला सुरुवात केली आहे. ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने माजी कृषी राज्य, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत हे इचलकरंजीत आले असता त्यांनी मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक आणि २०१४ साली लोकसभा निवडणूक लढवलेले उमेदवार सुरेशदादा पाटील यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. विषय लोकसभा निवडणुकीचा आला तेव्हा सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच सुरेशदादा पाटील हेही प्रचारात असतील, असे सांगितले. त्याच क्षणी सुरेशदादा पाटील यांनी, अहो, मीच लोकसभा निवडणूक मराठा क्रांती संघटनेकडून लढणार आहे, असे उत्तर दिले. त्यावर भाऊंचा चेहरा कसानुसा झाला. इकडे उपस्थितांमध्ये मात्र हास्याची लकेर उमटली.

दिवाळीनंतरचे फटाके ..

दिवाळीनंतर आता नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांनी आयोजित केलेले राजकीय दिवाळी फराळाचे कार्यक्रम गाजू लागले आहेत. भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे दक्षिण भागातील सर्वच नेत्यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाला सध्या आवर्जून हजेरी लावत आहेत. या सर्व ठिकाणच्या मेजवानीच्या बेतातून आमदार शिंदे सध्या गाजत आहेत ते केवळ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे यांच्या विरोधातील वक्तव्यांमुळे. त्यात त्यांच्या जोडीला उपस्थित असतात ते विखे विरोधक म्हणून ओळखले जाणारे अजितदादा गटाचे आमदार नीलेश लंके. दिवाळी फराळाच्या निमित्ताने चौफेर टोलेबाजी करत हे दोघेही थेट विखे यांचा नामोल्लेख न करत टिप्पणी करत आहेत. उपस्थितांना मात्र त्यातून नेमका अर्थ समजतो. यापूर्वीही आमदार शिंदे यांनी विखे केवळ जिल्ह्याच्या उत्तर भागात, त्यांच्या शिर्डीतच प्रमुख कार्यक्रम आयोजित करतात, राष्ट्रपती, पंतप्रधानांना बोलवतात, दक्षिण भागाला मात्र वंचित ठेवतात, असा आक्षेप घेतला होता. त्याचे सर्वदूर परिणाम उमटले. आता आमदार शिंदे यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाला हजेरी लावत ‘नगर दक्षिणेतील खासदार हा आपल्या दक्षिण भागातीलच हवा’ असा संदेश सर्वांपर्यंत गेलेला आहे, अशी राजकीय टिप्पणी करत पक्षाचेच खासदार सुजय विखे यांच्या उमेदवारीला एक प्रकारे आव्हानच दिले. खासदार विखे मूळचे उत्तर जिल्ह्यातील असल्याचा संदर्भ त्यामागे आहे. आमदार शिंदे यांनी यापूर्वीही आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. आता थेट त्यांनी खासदार विखे यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिल्याने शिंदे व विखे यांच्यातील संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

ताव तर मारला..

दिवाळीचा सण म्हणजे आनंदी-आनंदच. एकमेकांना प्रेमाने घरी फराळाला बोलावायचे, फराळाचे ताट समोर येताच बऱ्याच जणांना गोडाचे पथ्य. यामुळे फराळाच्या ताटातील चकली तेवढी वेगाने उचलली जाते. चिवडा खाण्यास विलंब लागत असल्याने चकलीसोबत असलेली बाकरवडी पाटवडीही फस्त होते. मात्र, लाडू, करंजी तसेच ताटात राहतात. हे काही नवीन नाही. यंदा लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, याचबरोबर पाठोपाठ विधानसभा आणि यातच महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा हंगाम कधीही सुरू होणार आहे. हे ओळखून एका राजकीय कार्यकर्त्यांने सामूहिक फराळाचे आयोजन ऐन दिवाळीतच केले होते. मात्र, फराळ देताना नेहमीचा फराळ न देता अस्सल कोल्हापुरी कट असलेल्या मिसळीची बेत ठेवला होता. झणझणीत मिसळीवर ताव मारल्यानंतर प्रत्येक जण मधाळ हसत ‘सर, जित आपलीच हाय, आता मागं फिरायचं न्हाय.  बेरकी राजकारण्यालाही हे ज्ञात होतेच; पण काय करणार? चर्चेत राहण्यासाठी हे मिसळ पार्टीची गरज असतेच.

(संकलन : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, मोहनीराज लहाडे)