अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या माघारीनंतर कोणी कोणाची जिरवली याचीच चर्चा सुरू झाली. रमेश लटके यांच्या पत्नीने शिंदे गटात सामील व्हावे, असे प्रयत्न झाले; पण त्यात यश आले नाही. नंतर त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई महानगरपालिका सेवेचा त्यांचा राजीनामा वेळेत मंजूर होणार नाही, असे प्रयत्न झाले. शिवसेनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्यायालयाने ऋजुता लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला. तेथेच भाजप आणि शिंदे गटाचे अवसान गळाले. निवडणूक चुरशीची होणार हे गृहीत धरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुरजी पटेल यांची उमेदवार जाहीर करून त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. भाजपच्या सर्वेक्षणात शिवसेना मोठय़ा फरकाने ही पोटनिवडणूक जिंकणार असेच स्पष्ट झाले होते. अंधेद्त पराभव झाल्यास त्याचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होण्याची भीती होती. माघारीसाठी मग मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वापर करण्यात आला. पोटनिवडणूक बिनविरोध होणार याचा अंदाज येताच शरद पवार यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेत हीच मागणी रेटली. माघार घेऊ नये म्हणून आशीष शेलार नेतेमंडळींकडे पाठपुरावा करीत होते; पण भाजपने माघार घेतली. देशभर सर्व निवडणुका जिंकत असताना अंधेरीत माघार घेतल्याने भाजपवर टीका होऊ लागली. दुसरीकडे, पक्षाच्या हितासाठी माघार घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्यातून आशीष शेलार यांचा ‘गेम’ पक्षातूनच झाल्याची चर्चा सुरू झाली.

येतोच म्हणतायेत की..

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

इचलकरंजीचे आमदार तथा माजी मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांचा कल भाजपकडे झुकला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या संभाव्य कार्यक्रमात त्यांचा भाजपप्रवेश होणार असल्याचेही सांगण्यात येते. आवडे हेही वारंवार भाजपप्रवेशाचे संकेत देत असतात; पण इचलकरंजीचे माजी आमदार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर हे मात्र याबाबत काहीच बोलत नाही, त्यावरून चर्चा आहे. अशातच इचलकरंजी येथील पंचगंगा नदीकाठी नदी संवर्धनाबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास आजी-माजी आमदार दोघेही उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडत असताना आमदार प्रकाश आवाडे यांनी सुरेश हळवणकर यांना उद्देशून ‘साहेब, येतो’ असे स्वाभाविक उद्गार काढले. त्यावर हाळवणकर यांच्या शेजारी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘अहो, ते येतोच म्हणतायेत की’ अशी टिपणी केली. त्यातील खोच लक्षात आल्याने आवाडे यांच्या भाजपप्रवेशाविषयी  काहीच न बोलणारे हाळवणकर हसू रोखू शकले नाहीत.

Story img Loader