अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या माघारीनंतर कोणी कोणाची जिरवली याचीच चर्चा सुरू झाली. रमेश लटके यांच्या पत्नीने शिंदे गटात सामील व्हावे, असे प्रयत्न झाले; पण त्यात यश आले नाही. नंतर त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई महानगरपालिका सेवेचा त्यांचा राजीनामा वेळेत मंजूर होणार नाही, असे प्रयत्न झाले. शिवसेनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्यायालयाने ऋजुता लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला. तेथेच भाजप आणि शिंदे गटाचे अवसान गळाले. निवडणूक चुरशीची होणार हे गृहीत धरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुरजी पटेल यांची उमेदवार जाहीर करून त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. भाजपच्या सर्वेक्षणात शिवसेना मोठय़ा फरकाने ही पोटनिवडणूक जिंकणार असेच स्पष्ट झाले होते. अंधेद्त पराभव झाल्यास त्याचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होण्याची भीती होती. माघारीसाठी मग मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वापर करण्यात आला. पोटनिवडणूक बिनविरोध होणार याचा अंदाज येताच शरद पवार यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेत हीच मागणी रेटली. माघार घेऊ नये म्हणून आशीष शेलार नेतेमंडळींकडे पाठपुरावा करीत होते; पण भाजपने माघार घेतली. देशभर सर्व निवडणुका जिंकत असताना अंधेरीत माघार घेतल्याने भाजपवर टीका होऊ लागली. दुसरीकडे, पक्षाच्या हितासाठी माघार घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्यातून आशीष शेलार यांचा ‘गेम’ पक्षातूनच झाल्याची चर्चा सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा