वाघनखं इंग्लंडच्या संग्रहालयातून भारतात येणार आहेत. वाघनखं खरी की खोटी आणि अफजलखानाला मारलेली हीच ती वाघनखं आहेत काय याविषयी जोरदार राजकारण सुरू आहे. त्यावरूनही प्रश्न उपस्थित करून  वेगवेगळी चर्चा- आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयनराजे यांनाच खरं की खोटं यातलं तुम्हाला काही माहीत आहे का, याविषयी विचारलं असता ते म्हणाले,  वाघनखं खरी की खोटी हे मला कसं माहीत. त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. लहानपण संपलं आणि बघता बघता वयाची पन्नास वर्षे  उलटली. हाफ चड्डीतून फुलपॅंटमध्ये कधी आलो आणि शाळेतून कॉलेज संपून राजकारणात कधी पडलो हे समजलेच नाही. उदयनराजे  भाजपमध्ये असल्याने भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाबद्दल मौन बाळगणे त्यांनी पसंत केले असावे.

सोलापूरचे पालकमंत्री आणि पोलिसांची पंचाईत 

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन

अलीकडे राज्यात एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मंत्र्यांना लक्ष्य बनवून त्यांच्या अंगावर शाईफेक किंवा भंडाराफेकीचे प्रकार घडणे हे आता नवीन नाही. गेल्या महिन्यात सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एका तरुणाने भंडारा उधळला होता. त्यामुळे पोलिसांनी पुरेशी दक्षता घेणे स्वाभाविक होते. नवीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीप्रसंगी तर पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे शासकीय विश्रामगृहात हजर होते. तरीही  भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी पोलीस आयुक्त माने व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळय़ांदेखत नव्या पालकमंत्र्यांच्या अंगावर शाईफेक करून निषेधाच्या घोषणा देत काळा झेंडाही दाखविला. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

अमावस्या आणि विखे-पाटील

शनिवारी सर्वपित्री दर्श अमावस्या होती. अमावस्येला शुभ कार्य न करण्याचा समज नागरिकांमध्ये पसरलेला आहे. मात्र सरकारी कामाला अमावस्या-पौर्णिमेचा काही संदर्भ नसतो. तरीही राजकीय मंडळींकडे अमावस्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जालीम तोडगे उपलब्ध असतात. नगर शहरातील महसूल भवन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ शनिवारी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही अमावस्येची चर्चा होत होती. त्याचा संदर्भ देत खासदार सुजय विखे यांनी आपल्याला हाच प्रश्न आमदार मोनिका राजळे यांनी विचारल्याचे सांगत त्याचे राजकीय स्पष्टीकरणही दिले. खासदार विखे म्हणाले, नगरमध्ये अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत पडले आहेत. त्यांची सुरुवात काही अमावस्येला झालेली नव्हती. तरीही ते अपूर्णावस्थेत आहेत. परंतु आम्ही महसूल भवनह्णच्या कामाची सुरुवात अमावस्येला करत आहोत.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रदेश पातळीवरील नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि वातावरण निर्मिती करण्यात राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. सांगली लोकसभेसाठी दोन ठिकाणी निवडणुकीतील वॉरियर्स म्हणजेच रणांगणावरील योद्धय़ासाठी बौद्धिक घेण्यात आले. जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले होते. यासाठी खर्चाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक प्रतिनिधींवर टाकण्यात आली होती. जिल्ह्यातील एका नेत्याने पक्षाचा आदेश मानून सगळी व्यवस्था अगदी ढोलताशांपासून ते मंडप, रस्त्यावर व्यासपीठाची उभारणी करण्यापर्यंतचा खर्च उचलला. मात्र, याचवेळी कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपाच्या शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करून साऱ्या खर्चाचा भार त्यावर टाकण्यात आल्याची चर्चा मात्र रंगली आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

   चंद्रकांत पाटील यांचा अभाविपलाच विसर?

भाजप विरोधात असताना अभाविपने तत्कालीन काँग्रेस मंत्र्यांना सळो की पळो करून सोडले होते. आताही भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेत असला तरी अभाविपची लढाऊ वृत्ती काही कमी झालेली नाही. कोल्हापूर अभाविपने शिवाजी विद्यापीठाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या विरोधात अभाविपने विद्यापीठामध्ये आंदोलन केले. त्यात असे झाले की अभाविपच्या आंदोलनात आपल्याच मंत्र्याच्या म्हणजे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असा फलक असलेल्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले.  खरे तर चंद्रकांतदादांची प्रदीर्घ कारकीर्दच अभाविपमध्ये गेली आहे. अगदी या संघटनेचे राष्ट्रीय सचिवही ते झाले होते. पण अशाप्रकारे मंत्र्याच्या पुतळय़ाचे दहन नवागत कार्यकर्त्यांनी केल्याचे समजल्यावर संघटनेत एकच खळबळ उडाली. त्यावर संघटनेने घाईघाईने खुलासा केला की प्रतीकात्मक पुतळादहन मंत्री म्हणून झाले आहे; तो चंद्रकांतदादांचा म्हणून नव्हे. पण तोवर पुलाखाली पाणी वाहून गेले होतेच. 

(संकलन : मोहनीराज लहाडे, विश्वास पवार, दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे)

Story img Loader