सौरभ कुलश्रेष्ठ

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

प्रचारापासून निकालापर्यंत आणि निकालापासून सत्तास्थापनेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अभूतपूर्व गाजल्या. राजकारणाचे सारे रंगढंग अंगावर लेऊनच नवं सरकार सत्तेवर आलं; पण बहुमताची कसोटी पार पडेपर्यंतची धाकधूकदेखील अभूतपूर्व अशीच होती. या आखाडय़ात कसलेले- आणि तेल लावलेलेही- पैलवान होते, नवशिके कुस्तीबहाद्दर होते, फेटे होते, हलगीवालेही होते आणि तुरेबाज ‘सलगीवाले’ही होते. मतमाऊलीच्या या जत्रेच्या मैदानात अशी एकाहून एक तालेवार माणसं शड्डू ठोकून उतरल्यावर मैदान तर गाजणारच! महाराष्ट्राच्या मैदानावरच्या ज्या माणसांनी सामना गाजविला.. ती सारी माणसं महाराष्ट्राला माहीत आहेतच, पण त्यांची तरीही दखल घेतलीच पाहिजे!

रणक्षेत्राची निवड अचूकपणे केली की लढाईत विजयाची शक्यता दुणावते, ही उक्ती सार्थ ठरवत वृत्तवाहिन्यांचा रणक्षेत्र म्हणून वापर करत बलाढय़ भाजपवर मात करण्यात मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे यांनी यश मिळवले. निवडणुकीत संख्याबळ कमी झाल्याने एकप्रकारे हरलेला डाव हुशारीने आणि धाडसाच्या जोरावर जिंकण्याची किमया साधणारे ते झुंजार सेनानायक ठरले आहेत!

भारतात २४ तास वृत्तवाहिन्यांचे युग सुरू झाल्यानंतर कारगिलची लढाई ही वृत्तवाहिन्यांवर दिसलेली पहिली लढाई होती. वृत्तवाहिन्यांचा वापर करून जम बसवणारा (नंतरचा इतिहास वेगळा) मनसे हा पहिला पक्ष आणि राज ठाकरे हे पहिले नेतृत्व होते. याच वृत्तवाहिन्यांचा खुबीने वापर करून सत्तासंघर्षांत संख्याबळ कमी असूनही मुख्यमंत्री पदाची लढाई लढणारा आणि जिंकणारा शिवसेना हा पहिला पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिले नेते ठरले आहेत. रणक्षेत्राची निवड अचूकपणे केली की लढाईत विजयाची शक्यता दुणावते, ही उक्ती सार्थ ठरवत २४ तास वृत्तवाहिन्यांचा रणक्षेत्र म्हणून वापर करत बलाढय़ भाजपवर मात करण्यात मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे यांनी यश मिळवले. निवडणुकीत संख्याबळ कमी झाल्याने एकप्रकारे हरलेला डाव हुशारीने आणि धाडसाच्या जोरावर जिंकण्याची किमया साधणारे ते झुंजार सेनानायक ठरले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्याही आधीपासून नव्या युती सरकारमध्ये सगळे कसे समसमान हवे, अशी भूमिका सातत्याने उद्धव ठाकरे मांडत होते. मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवणार, असा निर्धार व्यक्त करत होते. २४ ऑक्टोबरला निकाल लागले आणि शिवसेनेचे संख्याबळ ६३ वरून ५६ वर घसरले, तरी भाजपही १२२ वरून १०५ वर आल्याने आता शिवसेनेला वगळून भाजप सरकार स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाले. उद्धव यांच्यासाठीची ही पहिली संधी होती. त्याच सायंकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही राहणार आणि त्यासाठी सर्व पर्यायांचा वापर करणार असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. आपल्या मर्यादांमुळे खचण्याऐवजी नियोजनबद्ध डावपेच, चिकाटी, निग्रही स्वभाव या जोरावर युतीच्या जागावाटपात आधी लोकसभेला व नंतर विधानसभेला शिवसेनेच्या शक्तीपेक्षा अधिक जागा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खेचून घेण्यात उद्धव यांनी यश मिळवले होते. आताही तेच करण्याचा उद्धव ठाकरे यांनी निर्धार केला.

त्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर हल्ला चढवण्यासाठी खासदार संजय राऊत यांची निवड केली. सुरुवातीला राऊत हे ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री’ हीच भूमिका ठासून मांडत होते. भाऊबिजेच्या दिवशी फराळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पद अडीच वर्षे शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला नव्हता, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि ठाकरे यांना दुसरी संधी मिळाली. एक प्रकारे उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, असाच फडणवीस यांच्या वाक्याचा अन्वयार्थ असल्याने ठाकरे संतापले. या संतापाचा वापर त्यांनी हत्यारासारखा करण्याचे ठरवले. त्यांनी ताबडतोब संजय राऊत यांना युतीची बैठक रद्द झाल्याचे जाहीर करण्याचा आदेश दिला. यानंतर सर्वात मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे रोज सकाळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांमधून भाजपवर हल्ले चढवण्याचा. सुरुवातीला भाजपवरील दबावतंत्र असेच याचे स्वरूप होते. त्याच वेळी युतीच्या वाटाघाटी करणारी ठाकरे यांची विश्वासू मंडळी अनौपचारिकपणे भाजप नेत्यांच्या प्रस्तावांना उत्तरे देत होती. ‘बॅकडोअर डिप्लोमसी’ उद्धव ठाकरे यांनी बंद केली नाही. औपचारिक चर्चा सुरू करण्याची विनंती भाजपच्या नेत्यांनी केल्यावर – ‘चर्चा करू, पण आधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या त्या विधानामुळे झालेली चूक दुरुस्त करावी,’ असा स्पष्ट संदेश ठाकरे यांनी दिला होता. ३० वर्षांचा संसार असल्याने युतीलाच त्यांचे प्राधान्य होते. मात्र उद्धव ठाकरे राजी होतील आणि नाही होऊन जातील तरी कुठे, असे आडाखे बांधत भाजपने उद्धव यांची सूचना अमान्य केली. त्यामुळे चर्चेला बसण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले फोन उचलणेही उद्धव यांनी बंद केले आणि आपली रणनीती बदलली.

एरवी भाजपवर दबाव आणण्यापुरताच संजय राऊत यांचा वापर व्हायचा आणि भाजपने अनुकूल प्रतिसाद दिला की सुभाष देसाईंसारखी उद्धव यांची विश्वासू मंडळी वाटाघाटी करायचे. पण आता भाजपला वगळून नवी समीकरणे मांडण्यासाठी देसाई नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक असलेले संजय राऊतच उपयुक्त ठरणार असल्याचे हेरून त्यांनी राऊतांचीच निवड सेनापती म्हणून केली. भाजपवरील टीकेचा कडवटपणा वाढवत सेना-भाजपमध्ये खरोखर अंतर निर्माण झाल्याचा संदेश लोकांना आणि दोन्ही काँग्रेसना जाईल याची काळजी घेतली. तसेच शरद पवारांसोबतच्या भेटीगाठी वाढवण्याची आणि नव्या समीकरणांसाठी दोन्ही काँग्रेसशी अनौपचारिक बोलणी करण्याची कामगिरी राऊतांना दिली. त्यातून अखेर फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि उद्धव यांनी एक डाव जिंकला. त्यानंतर मात्र शिवसेनेला पाठिंब्यासाठीचे पत्र मिळवण्याच्या कामगिरीत परावलंबित्वामुळे अपयश आले आणि शिवसेनेची शोभा झाली. त्यानंतर मात्र सारी सूत्रे उद्धव यांनी आपल्या हाती घेतली आणि फोडाफोडीपासून वाचण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवण्यापासून शरद पवारांशी गाठीभेटी, काँग्रेस नेत्यांशी संवाद साधण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर पडणे यासह जे करायचे ते सर्व केले. फडणवीस यांनी अजित पवारांसह सरकार स्थापन केल्यावरही उद्धव खचले नाहीत. तर सर्वोच्च न्यायालयात याचिका आणि शिवसेना अभंग राहील याकडे जातीने लक्ष दिले. महाविकास आघाडीकडे १६२ आमदार असल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी देण्यात आला. उद्धव यांची झुंजारवृत्तीच यातून दिसून आली आणि त्यामुळेच त्यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्षांचे सरकार असल्याने अडथळे येतच राहणार याची उद्धव यांना नक्कीच जाणीव आहे. शिवाय अजित पवार शरीराने राष्ट्रवादीत परत आले असले तरी, त्यांच्या लहरी राजकारणामुळे कधीही काहीही होऊ  शकते, हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थिर ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे असणार आहे. कारण त्यावरच शिवसेनेला प्रिय असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल, हे २०२२ मध्ये ठरणार आहे.

Story img Loader