अजित अभ्यंकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भावनिक आवाहन हा त्यांचा स्थायीभाव होता आणि हीच त्यांची मर्यादादेखील होती. त्यामुळेच १९९२ साली बाबरी मशीद पाडण्याचे संघपरिवाराचे हिंसक राजकारण ते थांबवू शकले नाहीत. वाजपेयी ज्या विचारसरणीचे आणि संघटनेचे प्रतिनिधित्व करत होते, त्या संघटनेच्या संस्कृतीशी त्यांचा स्वभाव सरळसरळ विसंगत होता..

वाजपेयींच्या राजकीय कारकीर्दीचे वर्णन इंग्रजीमधील ‘स्क्वेअर पेग इन ए राऊंड होल’, या वाक्प्रचारातून करणे सर्वात योग्य ठरेल. त्याचा एक मोठा अनुभव फार बोलक्या रीतीने खालील घटनांतून व्यक्त होतो :

सन १९७७. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पहिले काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आलेले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती. ते त्यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना दिसून आले की, परराष्ट्र मंत्र्यांच्या दालनात त्यापूर्वी कित्येक वर्षे विराजणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र भिंतीवर नव्हते. वाजपेयी यांनी त्याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. थातुरमातूर कारणे देण्यात आली. पण वाजपेयींना समजून चुकले की, केंद्रात सरकार बदलल्याने आणि खासकरून जनसंघासारख्या नेहरूद्वेष्टय़ा पक्षाचा नेता परराष्ट्र मंत्री झाल्यामुळे (उगवत्या सूर्याला वंदन करण्याच्या संस्कृतीला अनुसरून) नेहरूंचे ते छायाचित्र अधिकाऱ्यांनी िभतीवरून हटविले होते. पंडितजींचा आपण वैयक्तिक द्वेष करत नाही. शिवाय पंडितजींनी या देशाच्या अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाचा पाया घातला आहे, आणि आपण (संघाच्या संकुचितवादाचा विचार न करता) तेच धोरण पुढे चालवायचे आहे, याची पुरेशी जाणीव कित्येक वर्षे संसद सदस्य असणाऱ्या वाजपेयींना होती. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना पंडितजींचे ते छायाचित्र पूर्ववत् तेथे ठेवण्याचे आदेश दिले.

असाच अनुभव २००१ सालच्या गुजरातमधील भूकंपानंतर आलेला दिसतो. त्यावेळी भुज आणि कच्छ प्रदेशात भूकंपाने प्रचंड हाहाकार उडविला होता. संपूर्ण देशातून मदतीचा ओघ येत होता. त्यावेळी ही मदत भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचविणे आणि पुनर्वसनाचे कार्य विनाविलंब पार पाडणे, हे अत्यंत मोठे आव्हान सरकारसमोर होते. महाराष्ट्रात १९९३ साली लातूर-किल्लारी परिसरात जो भूकंपाचा तीव्र धक्का बसून जी अपरिमित अशी जीवित आणि मालमत्तेची हानी झालेली होती; त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेली कामगिरी वाजपेयींना ज्ञात होती. शरद पवार हे विरोधी काँग्रेस परिवारातील प्रमुख नेते असूनदेखील त्यांनी त्याचा काहीही विचार न करता वाजपेयींनी त्यांना राष्ट्रीय आपत्कालीन आयोगाचे अध्यक्ष बनविले आणि त्यांच्यावर गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन कामाची जबाबदारी सोपविली.

आज लाल किल्ल्यावरील भाषणांपासून ते संसदेच्या पटलापर्यंत आत्मस्तुती, आत्मवंचना, सूड आणि द्वेष यांच्या सरकारप्रणीत प्रदूषणाने लोकशाहीचा श्वास कोंडला असताना, देशाला वाजपेयींच्या निमित्ताने वरील आठवण होणे अपरिहार्य आहे. सत्ताधाऱ्यांच्या राजकीय संस्कृतीच्या गेल्या १० वर्षांत झालेल्या अधपतनाचा आलेखच त्यातून आपल्यासमोर येतो.

म्हणूनच संसदीय नेते, पंतप्रधान किंवा व्यक्ती म्हणून वाजपेयी यांची काही सकारात्मक वैशिष्टय़े होती. तिचा उल्लेख करणे विशेषत आजच्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचे आहे.

वाजपेयी यांच्यासारखा एक संसदेतील अतिशय प्रदीर्घ कारकीर्द असणारा, स्वतची अशी खास वक्तृत्वशैली असणारा नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी विचार करताना नेहमीच दुविधा निर्माण झालेली आपल्याला दिसू लागते. वाजपेयी ज्या विचारसरणीचे आणि संघटनेचे प्रतिनिधित्व करत होते, त्या संघटनेच्या संस्कृतीशी त्यांचा स्वभाव सरळसरळ विसंगत होता. पंतप्रधान म्हणून किंवा संसद-सदस्य म्हणून त्यांच्या भाषणांत आजच्या सत्ताधारी नेत्यांप्रमाणे विरोधी मत किंवा विरोधी पक्षांबद्दल दिसणारा हिंसक द्वेषभाव दिसत नसे. लोकशाही चौकटीत आपल्याला काम करायचे आहे, आणि तिचा संसदीय ढाँचा सांभाळायचा आहे, ही सखोल जाणीव एक व्यक्ती म्हणून त्यांच्या संसदेतील बोलण्या-वागण्यातून नेहमीच व्यक्त होत असे.

भावनिक आवाहन हा त्यांचा स्थायीभाव होता आणि हीच त्यांची मर्यादादेखील होती. त्यामुळेच १९९२ साली बाबरी मशीद पाडण्याचे संघपरिवाराचे हिंसक राजकारण ते थांबवू शकले नाहीत. २००२ साली गुजरातमधील सरकारनियोजित दंगलींच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माची शिकवण पंतप्रधान वाजपेयींनी दिली खरी. पण तरीही त्यांना पदावरून दूर करण्याचा आग्रह त्यांनी अडवाणी आणि संघपरिवाराच्या दबावामुळे लावून धरला नाही. हे विसरून चालणार नाही.

संघपरिवाराला आणि भारतीय जनता पक्षाला ‘मुखवटा’ म्हणून का होईना, वाजपेयींच्याच चेहऱ्याचा वापर करावा लागला. हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक पराभव होता, तर वाजपेयी यांच्यासारख्याची मर्यादा होती.

लेखक भाकपचे नेते आहेत. त्यांचा ई- मेल .

abhyankar2004@gmail.com