सीताफळ या बहुगुणी फळपिकापासून वर्षाला एकरी ४० ते १२० क्विंटल उत्पादन मिळते. पाण्याची अल्प उपलब्धता आणि हलक्या रानातही हे पीक चांगले येत असल्याने कोरडवाहू शेतकरीही आता सीताफळ लागवडीकडे वळत आहेत. अल्प श्रम, अल्प चिंता आणि अल्प पाण्यावर सीताफळाचे उत्पादन घेता येते.

सांगलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात सध्या सीताफळाची आवक वाढली असून, दरही समाधानकारक आहेत. बहुवर्षीय फळपिकापासून वर्षाला एकरी ४० ते १२० क्विंटल उत्पादन मिळते. पाण्याची अल्प उपलब्धता आणि हलक्या रानातही हे पीक चांगले येत असून, मुळात कोरडवाहू फळ असल्याने याकडे शेतकरी वर्ग आता वळत आहे. अल्प श्रम, अल्प चिंता आणि अल्प पाण्यावर सीताफळाचे उत्पादन घेता येते.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Solapur Onion auction resumed on Monday after a four day work stoppage by Mathadi workers
चार दिवसांच्या खंडानंतर, सोलापुरात कांदा लिलाव
Manikrao Kokate , Manikrao Kokate Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना
potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट

सीताफळ हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमध्ये आढळणाऱ्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापाऱ्यांनी हे आशियामध्ये आणले. या फळाचे जुने मेक्सिकन नाव, हे अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात. हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. यात काळ्या रंगाच्या बिया असतात. फळावरचे डोळे चांगले मोठे झाले, की कच्चे तोडून पिकायला ठेवतात. खरे तर याचे नाव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.

सीताफळ हे एक कोरडवाहू फळपीक असून, डाळिंब या कोरडवाहू पिकाखालोखाल या पिकाचे क्षेत्र आणि बाजारपेठेतील मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. या पिकासाठी लागणारी हलकी जमीन, हवे असणारे हवामान व कमी पाणी अशा प्रकारची उपलब्धता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. असे जरी असले, तरी या पिकाच्या लागवडीमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये सुधारित जातींचा अभाव, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, तसेच काढणीपश्चातचे तंत्रज्ञान यामधील संशोधनाची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत.

हेही वाचा >>> लोकशिवार: आंतरपिकातील यश !

सीताफळ हे कोरडवाहू फळपीक अत्यंत महत्त्वाचे असून, या फळामध्ये अनेक प्रकारची कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वांचा मुबलक साठा असल्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गराचे जास्त प्रमाण व कमी बिया असलेल्या जाती या पिकाच्या लागवडीसाठी पसंत केल्या जातात. राहुरीच्या कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या जातींच्या संशोधनाचे कार्य सन १९८८पासून हाती घेण्यात आले आहे. या फळपिकाचे महत्त्व ओळखून भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्या विद्यापीठास या पिकाच्या संशोधनासाठी मदत देऊन सन २००७ मध्ये पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथे एक स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करायला उद्याुक्त केले आहे. सीताफळाच्या वेगवेगळ्या जातींचा संचय करणे, सीताफळामध्ये सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे, सीताफळावर येणाऱ्या किडीचे आणि रोगांचे व्यवस्थापन करणे व काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे ही या संशोधन केंद्राची मूळ उद्दिष्टे आहेत.

सीताफळाची लागवड बिया व कलम पद्धतीने करता येते. बियापासून करण्यात येत असलेल्या लागवडीची फळे एकाच दर्जाची मिळतीलच असे नाही. त्यामुळे यामध्ये कलम लागवड दर्जा, गुणवत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरते. लागवडीनंतर दोन वर्षांनी फळधारणा होत असली, तरी झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर चौथ्या वर्षापासून चांगले उत्पादन घेता येते. पावसाळी व उन्हाळी असे दोन बहार असतात. बाजारपेठेचा विचार करून कोणता बहार घ्यायचा, हे ठरवता येते.

फळ काढणीला आल्यानंतर फळातील शिरा खुल्या होतात. रंग गुलाबी, पांढरट पोपटी शिरा दिसू लागताच फळकाढणी करून पिकवता येतात. यामध्ये किमान चार ते पाच दिवसांचे अंतर राहू शकते. यामुळे वाहतुकीत फळ खराब होण्याचे प्रमाण कमी राहते. आहे त्या गुणवत्तेचे फळ ग्राहकांच्या हाती मिळू शकते. सांगलीच्या बाजारात सध्या सांगलीसह सोलापूर व सातारा जिल्ह्यातून सीताफळाची आवक होत आहे. बाजारात किमान दर १० ते २५ रुपये प्रतिकिलो सध्या सुरू असून, हेक्टरी ४० ते १२० क्विंटल उत्पादन मिळू शकते. हंगामात फळपक्वतेच्या काळात दोन पाणी मिळाले, तरी चालते.

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची चव फार कमी लोकांना आवडते; पण या फळात आरोग्याचा खजिना असतो. व्हिटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स आणि फायबरने समृद्ध असलेले हे फळ गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते. सीताफळामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते, जे स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करते आणि शारीरिक कमकुवतपणा दूर करते. या फळात फायबर असते, जे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करते. सीताफळाचे सेवन केल्याने पोट लवकर साफ होते आणि पचनसंस्था मजबूत होते.

पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमने समृद्ध असलेले सीताफळ हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते. जेव्हा तुमचे हृदय निरोगी असते, तेव्हा संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते, जेणेकरून संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह नियमितपणे राखला जातो.

व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आजारात खूप प्रभावी आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर करण्यात सीताफळ मोठी भूमिका बजावते. दररोज नियमित प्रमाणात सीताफळाचे सेवन केल्याने दृष्टी चांगली होते. याशिवाय व्हिटॅमिन ए केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

जर अस्थमा म्हणजे दम्याची सुरुवातीची लक्षणे दिसत असतील, तर सीताफळाचे सेवन सुरू करा; कारण यात असलेले व्हिटॅमिन बी ६ दम्यावर परिणाम दर्शवते. जर तुम्ही नियमितपणे सीताफळाचे सेवन केले, तर दम्याचा झटका येण्यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

सीताफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला डिटॉक्स करण्यास, शरीरातून नको असलेले पदार्थ काढून टाकण्यास आणि शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात, जे आपल्याला अधिक निरोगी ठेवते. जेव्हा शरीर डिटॉक्स होते तेव्हा आपल्याला कमी अशक्तपणा जाणवतो आणि शरीर अधिक सक्रिय होते.

digambarshinde64@gmail.com

Story img Loader