कमी व अधिक तापमानासह गारपीट, वादळी वाऱ्यांमुळे केळी उत्पादकांसमोर संकटांची मालिका उभी राहिली आहे. त्यात करपा, कुकुंबर मोझॅक, फ्युजारियम मर, कंद कुजव्या, या सारख्या बऱ्याच रोगांनी केळी उत्पादकांच्या नाकीनऊ आणले आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीपासून मिळणाऱ्या सरासरी उत्पादनात जवळपास निम्म्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. अशा या स्थितीत केळी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या आहेत.

केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट, वादळी वाऱ्यांमुळे केळी उत्पादकांसमोर संकटांची मालिका उभी राहिली आहे. त्यात करपा, कुकुंबर मोझॅक, फ्युजारियम मर, कंद कुजव्या, या सारख्या बऱ्याच रोगांनी केळी उत्पादकांच्या नाकीनऊ आणले आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीपासून मिळणाऱ्या सरासरी उत्पादनात जवळपास निम्म्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. अशा या स्थितीत केळी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या आहेत.

Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा : लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

करपा किंवा सिगाटोका

केळीच्या खोडाकडून मुळाद्वारे जमिनीतील घटक अन्न प्रक्रियेत सामावून घेतले जातात. त्यामुळे केळीची वाढ होत असते. मात्र, थंडीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढून ही अन्न प्रक्रिया विस्कळीत होते. अशा परिस्थितीत पानाद्वारे अन्न मिळविण्याचा प्रयत्न खोडाकडून वाढतो. मात्र, करपाच्या प्रादुर्भावामुळे पानाद्वारे आवश्यक असणारे घटक खोडाला उपलब्ध होत नाहीत. करपा रोगामुळे केळीची पाने पिवळसर पडणे तसेच पाने जळून चिरा पडण्याची लक्षणे दिसून येतात. या रोगाचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर पुढे जाऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. केळीवरील या बुरशीजन्य रोगामुळे सुरुवातीला पानांवर पिवळ्या रंगाचे लहान लहान ठिपके दिसून येतात. कालांतराने लहान ठिपके मोठे होऊन आतील भाग करड्या रंगाचा होतो व ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसून येतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पाने करपतात.

प्रतिबंधात्मक उपाय

केळी लागवडीसाठी निरोगी बागेतूनच कंद निवडावीत. कंद प्रक्रिया केल्याशिवाय केळी लागवड करू नये. कंद प्रक्रियेसाठी १०० लिटर पाण्यात १५० ग्रॅम अॅसिफेट आणि १०० ग्रॅम कार्बेन्डझिम मिसळून तयार केलेल्या द्रावणात कंद किमान अर्धा तास बुडवून ठेवावे. मगच जमिनीत लागवड करावी. ऊती संवर्धित रोपे तयार करण्यासाठी सुद्धा निरोगी बागेतील कंदांची निवड करावी. बागेत पाणी साचून राहणार नाही व कायम वाफसा स्थिती राहील, याची काळजी घ्यावी. केळीची बाग नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. मुख्य खोडालगत वाढणारी रोपे नियमितपणे कापावी. झाडांना खते व अन्नद्रव्ये शिफारशीनुसारच द्यावी. शेतात वर्षानुवर्षे केळी हे एकच पीक न घेता फेरपालट करावी.

कुकुंबर मोझॅक किंवा सीएमव्ही

केळी पिकामध्ये कुकुंबर मोझॅक, या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक भाषेत हरण्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी थेट उपाय नाहीत. या रोगाचा प्रसार मावा किडींमार्फत प्रामुख्याने होतो. विशेषत: जुलै व ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांमध्ये अधिक दिसून येतो. मे तसेच जून लागवडीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस कोवळ्या पानांच्या शिरांतील हरितद्रव्य लोप पावते. त्यामुळे पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे अर्धवट आकाराचे किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात. कालांतराने पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील उती मृत पावतात. पाने फाटतात, पृष्ठभाग आकसतो. कडा वाकड्या होऊन पाने जवळ येतात. शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. रोगाच्या तीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते.

हेही वाचा : लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता

प्रतिबंधात्मक उपाय

कुकुंबर मोझॅक किंवा सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केळी लागवडीच्या वेळा काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. शक्यतो केळी लागवड जून, ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी महिन्यात करावी. लागवडीच्या सुरुवातीलाच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मे आणि जूनच्या लागवडीमध्ये त्याचा प्रादुर्भाव नगण्य आढळून आला आहे. उशिराने म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या बागांमध्ये जास्त प्रादुर्भाव आढळतो. ऊतिसंवर्धित रोपांची किंवा कंदाची लागवड केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट यांची आलटून पालटून फवारणी करावी. केळी बागेत काकडी, कारली, दुधी भोपळा, गिलकी ही आंतरपिके घेऊ नयेत. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून बागेपासून दूरवर नेऊन जाळून नष्ट करावीत.

फ्युजारियम मर रोग

केळी पिकावर येणारा फ्युजारियम मर (विल्ट) हा मातीमधून पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. तो पनामा मर या नावाने देखील ओळखला जातो. हा रोग जमिनीतील फ्युजारियम ऑक्झोस्पोरम क्युबेनसिस या बुरशीमुळे होतो. या बुरशीचे वेगवेगळे वंश असून, यातील टी-४ (ट्रॉपिकल-४) हा वंश अत्यंत घातक आहे. कारण हा वंश व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या कॅव्हेंडिश गटातील सर्वच जातींवर येतो. महाराष्ट्रात ग्रॅडनैन ही व्यावसायिक लागवडी खालील जात कॅव्हेंडिश गटातील आहे. फ्युजारियम बुरशीचा प्रसार कोनिडिया आणि क्लॅमेयडोस्पोअर्स, या अलैंगिक बीजांणूमुळे होतो. तसेच क्लॅमेयडोस्पोअर्स या जमिनीत दीर्घकाळ राहत असल्याने हा बुरशीजन्य रोग घातक आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

मातीमध्ये असलेल्या बुरशीमुळे, कंदावरील मातीद्वारे किंवा रोपांजवळील माती, शेतीची अवजारे, पादत्राणे, ट्रॅक्टर, वाहने, सिंचन आदींद्वारे फ्युजारियम मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. केरळ कृषी विद्यापीठाने एकात्मिक नियंत्रणाची शिफारस केली आहे. यामध्ये स्युडोमोनास फ्लोरेसन्स या जैविक घटकाची कंद प्रक्रिया करणे, अॅरब्युस्क्युलर मायकोरायझा आणि ट्रायकोड्रर्मा प्रजाती शेणखतात मुरवून लागवडीच्या वेळेस जमिनीतून वापरणे आणि ट्रायअझोल गटातील टेब्युकोनॉझोल या बुरशीनाशकाची लागवडीनंतर दोन आणि चार महिन्यांनी आळवणी करणे यांचा समावेश होतो. स्ट्रेप्टोमायसेस आणि बॅसिलस हे जैविक घटकदेखील या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आढळून आले आहेत. शेती अवजारे, पादत्राणे, ट्रॅक्टर, अन्य वाहने आदींचे निर्जंतुकीकरण करावे.

हेही वाचा : लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती

कंद कुजव्या रोग

केळीवरील या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. झाडाला झालेल्या जखमा, रोगट झाडाचे अवशेष, संसर्गित हत्यारे, रोगग्रस्त बागेतील चिखल व त्यातून झिरपणारे पाणी यांच्यामार्फत हा रोग प्रसार होतो. उष्ण दमट वातावरण, सततचा पाऊस, चिबड, पाण्याचा निचरा न होणारी जमीन हे घटक रोगाच्या वाढीस पोषक असतात. कंदकूज किंवा पोंगासड हा केळीवरील महत्त्वाचा जिवाणूजन्य रोग आहे. हा रोग पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम् या जिवाणूमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. मात्र, सुरुवातीचे १ ते ३ महिन्याचे पीक रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडते. झाडाचा आधार नाहीसा झाल्यामुळे ते हलक्या धक्क्याने कोसळतात.

प्रतिबंधात्मक उपाय

लागवडीपूर्वी उन्हाळी खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. कंद लागवडीपूर्वी, कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.४ टक्के) चार ग्रॅम अधिक स्ट्रॅप्टोमायसीन (३०० पीपीएम) ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ३० मिनिटे बुडवावीत. चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रतिझाड वापरावे. लागवडीच्या वेळी जमिनीत प्रतिझाड ब्लिचिंग भुकटी सहा ग्रॅम द्यावी. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हीच प्रक्रिया करावी. रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत. रोगग्रस्त झाडाचे अवशेष बागेबाहेर काढून बाग स्वच्छ ठेवावी. योग्य प्रमाणात पाणी देऊन बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. रोगग्रस्त बागेत पुन्हा केळी लागवड करू नये. पिकाची फेरपालट करावी. – डॉ. ए. बी. भोसले (उद्यान विद्यावेत्ता), – डॉ. व्ही.टी. गुजर (वनस्पती रोग शास्त्रज्ञ) केळी संशोधन केंद्र, जळगाव

Story img Loader