प्रशांत कुलकर्णी

लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना सांप्रत काळी मऱ्हाटी प्रदेशात कोण ओळखत नाही? स्वत:च्या प्रकृतीची चिंता आणि इतरांच्या प्रकृतीची काळजी असणारा प्रत्येकजण त्यांना ओळखतोच!

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Sharad Pawar Speaking At Markadwadi.
Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
Mohanji Bhagwat expressed his concern about the decline in the country population
चारा नाही; तर चोचही नकोच!

त्यांच्या ‘दीक्षित लाइफस्टाईल पॅटर्न’मुळे हजारो-लाखो जणांनी आता वाट्टेल तसं चरणं सोडून दिलंय. आता फक्त दोन वेळेला भरपेट जेवण- तेही पंचावन्न मिनिटांत आटपायचं. साखर, गूळ, मध वज्र्य. व्यायाम म्हणून पंचेचाळीस मिनिटांत साडेचार कि. मी. चालणं आणि मधे भूक लागली तर एखादा टोमॅटो किंवा पाणी किंवा ताक!! या सूत्रबद्ध पद्धतीने जगणाऱ्यांची ढेरपोटं थोडय़ाच दिवसांत खपाटीला गेलेली दिसू लागली, असे किस्से चवीचवीने चघळले जाऊ लागले. (हे चघळणंसुद्धा दिवसातून दोन वेळेलाच असावं असाही काही नियम आहे असं व्हॉट्स अ‍ॅप मेसेजमधून वाचायला मिळालं!)

तर तात्पर्य म्हणजे या अत्यंत यशस्वी प्रयोगामुळे या जीवनशैलीचा बोलबाला इतका सर्वदूर पसरला, की तो प्राणीजगतातही पोहोचला. नुस्ता पोहोचला नाही तर तिथल्या अनेकांनी तो अंगिकारलाही (!) त्याचाच हा व्यंगचित्रात्मक आढावा.. अर्थात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या कार्याबद्दल पूर्ण आदरभाव बाळगून!

 

Story img Loader