समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तिंची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रुपाने सहभागी व्हावे या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला. वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. यावर्षी देखील ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने विज्ञान, संगीत, इतिहास, ग्रंथालय, रुग्णसेवा, वृद्धाश्रम आदी क्षेत्रांत निरलसपणे कार्यरत असलेल्या दहा संस्थांचा परिचय करून दिला, आणि वाचकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. चांगल्या कार्याशी स्वत:ला जोडून घेण्याचे भान व इच्छा अनेकांच्या ठायी असल्याचा प्रत्यय आला. अजूनही ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांकडे धनादेश येत आहेत. यंदाच्या वर्षी ‘सर्वकार्येषु सर्वदा’त समावेश केलेल्या संस्थांची नावे व धनादेश पाठविण्यासाठी लोकसत्ता कार्यालयांचे पत्ते पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत. धनादेश त्या संस्थांच्या नावे इंग्रजी किंवा देवनागरी लिपीत लिहावेत. एक हजार व त्यापेक्षा जास्त रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे ‘लोकसत्ता’त क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत.
धनादेश पुढील संस्थांच्या नावे काढावेत.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर
मराठी विज्ञान परिषद
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह (सोलपूर) शाखा, पुणे किंवा पेशंटस् रिलीफ असोसिएशन (सोलापूर)
कल्याण गायन समाज
संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, मेळघाट
मानव्य
घरकुल परिवार संस्था, नाशिक
श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्ट
प्राणिमित्र विलास शिवलाल सवरेदय ट्रस्ट
कल्पना मोरलवार, माहिम यांच्याकडून वासुदेव नारायण मोरलवार आणि मंगला वासुदेव मोरलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
रु. ८५०००/-
अरुण दा. अळवणी, वाशी, नवी मुंबई-
रु. २००००/-
सुप्रिती उल्हास नाडकर्णी, माहिम –
रु. १११११/-
कीर्ती उल्हास मोहिले, लक्ष्मीनगर, नागपूर-
रु. १००००/-
प्रकाश परशुराम वराडकर, बोरिवली –
रु. १००००/-
विनायक मुळे, विले पार्ले यांजकडून मातोश्री इंदूमती मुळे यांच्या स्मरणार्थ-
रु. १००००/-
विनिता व अजित मुंगी, वडाळा –
रु. ९५००/-
विद्या मुळे, विले पार्ले- रु. ५०००/-
वेणूताई जोशी, विलेपार्ले- रु. ५०००/-
श्रावण रामचंद्र केसरकर, बोरिवली –
रु. ५०००/-
मनोहर मोहिते, बोरिवली- रु. ५०००/-
विद्या जोशी, चेंबूर- रु. ५०००/-
संजय गोविंद मालदीकर, मालाड –
रु. ५०००/-
बाळासाहेब चव्हाण, वरळी – रु. ४००४/-
डॉ. दत्ता पवार, कांदिवली- रु. ४०००/-
रपरिणीता माविनकुर्वे, ताडदेव- रु.३००२/-
उमा प्रभाकर रावराणे, बोरिवली –
रु. २०००/-
महेश बापट, अंधेरी -रु. २०००/-
प्र. गो. पारखी, कांदिवली -रु. २०००/-
जगन्नाथ जाधव, विले पार्ले -रु. २०००/-
शीतल दर्शन वर्तक, बोरिवली-रु. २०००/-
गिरीश वासुदेव जोशी, डोबिवली –
रु. १५०३/-
सचिन सदाशिव खोलमकर, बोरिवली-
रु. १५००/-
शुभा महाजन, बोरिवली – रु. १५००/-
राधा वाय. कुलकर्णी, बोरिवली –
रु. १००१/-
हेमंत मधुकर मुळे, डोंबिवली -रु.१०००/-
नरमेश लक्ष्मण दळवी दहिसर, यांजकडून काशिबाई लक्ष्मण दळवी यांच्या स्मरणार्थ –
रु. १०००/-
गीता धुरी, कांदिवली, रु. १०००/-
धनादेश पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांचे पत्ते
मुंबई- एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी : ६७४४०५३६
ठाणे- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा,
दूरध्वनी :२५३९९६०७.
पुणे- दि. इंडियन एक्स्प्रेस लि., ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, दूरध्वनी : ०२०-६७२४१०००.
नागपूर- लोकसत्ता, १९, ग्रेट नाग रोड, दूरध्वनी : ०७१२-२७०६९२३.
नाशिक- लोकसत्ता, ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड,
दूरध्वनी :२३१०४४४
अहमदनगर- लोकसत्ता, आशीष, सथ्था कॉलनी, स्टेशन रोड,
दूरध्वनी : २४५१५४४/२४५१९०७.
औरंगाबाद- लोकसत्ता, मालपानी, ओबेरॉय टॉवर्स, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर, जालना रोड, दूरध्वनी : ०४०-२३४६३०३.