कोकणातील शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असल्याची ओरड नेहमी होते; पण पारंपरिक पिकाला फाटा देऊन अधुनिक शेतीची कास धरली तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावातील अमर कदम यांनी हेच सिध्द करून दाखवले आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत चीनमधील ड्रॅगन फ्रुट लागवडीतून त्याने महिन्याला लाखभर रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया सिध्द करून दाखवली आहे.

रायगड जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक आहे. दरवर्षी खरिपात १ लाख हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाते. शेतमजुरी आणि लागवड खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे दरवर्षी भातलागवडीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. तरुण पिढी शेतीपासून दुरावत चालली आहे. शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा भर आहे. मात्र योग्य नियोजन केले तर कोकणातील शेती फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी योग्यवेळी योग्य पिकाची लागवड करणे आवश्यक असते हे अमर कदमने सिध्द करून दाखवले आहे.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
article about ex pm manmohan singh political journey
‘अपघाती’ पंतप्रधान; निश्चयी प्रधानसेवक!
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News LIVE Updates : वाल्मिक कराडवर मकोका लागला असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक – जरांगे पाटील

कोकणातील बहुतांश तरुण नोकरी निमित्ताने मुंबई, ठाणे, सुरत, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये स्थलांतरित होतात. मिळेल ते काम करून आपला चरितार्थ चालवतात. या रोजगारांच्या शोधात होणाऱ्या स्थलांतरामुळे गावे मात्र ओस पडतात. या स्थलांतराला प्रामुख्याने दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असते, शिवाय गावात पर्यायी रोजगाराच्या संधी फारशा नसतात. यामुळे शहरांकडे स्थलांतराचे प्रमाण वाढते. नाणेघोळ येथील अमर कदमही याला अपवाद नव्हता. त्यानेही शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतरांप्रमाणे पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो मुंबईत नोकरीच्या शोधात होता. तिथेच स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. मात्र त्याच वेळी जगभरात करोनाच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली, देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. कामधंदे बंद झाल्याने अनेकांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला यात अमरचाही समावेश होता.

हेही वाचा >>> लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार

गावाकडे येऊन करायचे काय, हा प्रश्न त्याच्या समोर होता. त्यामुळे अमरच्या वडिलांनी त्याला शेतात काम करण्याचा सल्ला दिला. लहानपणापासून कधीच त्याला शेतात काम करण्याची इच्छा नव्हती, मातीत हात घालणेही त्याला कधी आवडत नसे; पण आता शेती करण्याशिवाय त्याच्यासमोर कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याने वडिलांच्या इच्छेचा मान राखत शेतीत पहिले पाऊल टाकले.

पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा निर्णय त्याने घेतला. भातशेतीऐवजी त्याने कलिंगड, अननस, भाजीपाला आणि फुलशेती करण्यावर भर दिला. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले. महाड पोलादपूरमधील बाजारपेठेत त्याने उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात मागणी असलेल्या पिकांचा अभ्यास करून तो शेतात त्याचे उत्पादन घेऊ लागला. त्यामुळे शेतीत त्याला गती प्राप्त झाली.

माती, हवामान अभ्यास करून त्याने शेतात ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी त्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली, लागवडीसाठी लागेल ते मार्गदर्शन करण्याची ग्वाही कृषी अधिकाऱ्यांनी दिली. पिकाचे पशुप्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला कंपाऊंड घालून घेतले. त्यासाठी लागणारे सिमेंटचे पोल आणि जाळी स्वत:च तयार केली. शेतात ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी लागणारे १२०० पोल उभे केले. त्यावर रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. दोन वर्ष रोपांची जपणूक करण्यात गेली. त्यासाठी मेहनत करावी लागली. तालुक्यात पहिल्यांदाच या पिकाची लागवड झाली असल्याने, अपेक्षित उत्पन्न मिळेल अथवा नाही याची साशंकता होती. मात्र तिसऱ्या वर्षीपासून अमरची कष्ट फळाला आले. ड्रॅगन फ्रुटच्या झाडांना फळधारणा सुरू झाली. पीक जोमाने आले. बाजारात या फळाला चांगली किंमत असल्याने, चांगेल उत्पन्नही मिळाले.

ड्रॅगन फ्रुट झाड हे निवडुंग प्रकारात मोडते. त्यामुळे या झाडांचा संगोपन खर्च कमी असतो. बुरशी, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. एक झाड किमान पंचवीस वर्ष उत्पन्न देऊ शकते. त्यामुळे कमी कष्टात चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकेल असा विश्वास अमरने व्यक्त केला आहे.

चीन आणि व्हिएतनाम या देशात प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुटची लागवड मोठ्या प्रमाणात होते. औषधी गुणधर्म आणि रुचकर चवीमुळे या फळांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केल्यास त्यांना दुपटीने नफा मिळू शकेल अशी खात्री त्याला वाटते.

आरोग्याच्या दृष्टीने फायदे

ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते. या अँटिऑक्सिडेंटमुळे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. यामुळे कर्करोग, हृदयरोग यांसारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. तसेच व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी देखील वाढते. रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार सहसा होत नाही. ड्रॅगन फ्रुटमध्ये पोटॅशियम भरपूर असते, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबर भरपूर असते, शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्यास ज्यामुळे मदत होते. ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात, जे कर्करोगाचा धोका कमी करतात. अँटिऑक्सिडेंटमुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते असे सांगितले जाते

कोकणातील शेतीत पैसा मिळत नाही असे अजिबात नाही, पण त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांची लागवड करावी लागते. ज्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला दरही मिळतो. ड्रॅगन फ्रुटला बाजारात चांगली मागणी आहे. बाकी फळांच्या तुलनेत त्याला मिळणारा दरही चांगला आहे. त्यामुळे कोकणातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट शेती उपयुक्त आणि दुप्पट उत्पन्न देणारी ठरू शकते. – अमर कदम, प्रयोगशील शेतकरी, नाणेघोळ पोलादपूर

harshad. kashalkar@expressindia.com

Story img Loader