मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या पत्नी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेहरुन्निसा दलवाई यांचे नुकतेच निधन झाले. दलवाई यांच्या पश्चात गेली चाळीस वर्षे त्यांचे कार्य मेहरुन्निसा यांनी पुढे नेले. मुस्लीम समाज सुधारणेच्या कार्यक्रमात त्या हिरिरीने भाग घेत असत. त्यांच्याच एका शिष्येने जागवलेल्या या आठवणी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मला आजही आठवतं. मेहरुन्निसा दलवाई यांच्यासोबत त्यांच्या घरी राहण्याचा योग आला तेव्हा ऐंशी पार केलेलं हे व्यक्तिमत्त्व इतकं सळसळतं कसं राहू शकतं! हा मलाच पडलेला प्रश्न आणि मग त्यांच्याशी गप्पांची मैफल रंगली तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तरही मिळालेलं. तारुण्याचा उंबरठा पार केलेल्या आणि पूर्णपणे उर्दूच्या प्रभावात जडणघडण झालेल्या मेहरुन्निसांनी लग्नानंतर हमीद दलवाईंसोबत त्यांच्या कार्यात अक्षरश: स्वत:ला झोकून दिलं. हमीद दलवाईंच्या जाण्यानंतरही मुस्लीम समाजाच्या सुधारणेची कास त्यांनी सोडली नाही. आताही आयुष्याच्या अखेपर्यंत नव्वदीला आल्यानंतरसुद्धा मुस्लीम समाजासाठी आणि मुस्लीम महिलांसाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून त्यांचे काम सुरूच होते.
३ मे २००९ ला हमीद दलवाई यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला तेव्हा पुण्यात मेहरुन्निसा यांची भेट झाली. तो एक दिवस त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला आणि या दाम्पत्याच्या कार्याला जवळून ओळखता आले. वास्तविक पतीनिधनानंतर आणि तेसुद्धा मुस्लीम समाजातील महिलेने समाजाच्या सुधारणेची धरलेली कास आणि मुस्लीम समाजातील स्त्रियांसाठी लढा उभारणे इतके सोपे नव्हते. त्यांनी तो उभारला आणि पुढे नेला. हमीद दलवाई यांनी याचसंदर्भात मोर्चा काढला तेव्हा त्यांना मुस्लीम कट्टरपंथीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दिल्लीत मोर्चा आल्यानंतर दगडफेकीचा सामना करावा लागला होता. संपूर्ण भारतभर आयोजित या मोर्चात मेहरुन्निसासुद्धा सहभागी होत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांनीही मग १९८६-८७ मध्ये महाराष्ट्रात तलाकमुक्ती मोर्चा काढला. या संपूर्ण कार्यात जिवाची भीती पावलोपावली असतानासुद्धा मुस्लीम समाज सुधारणा आणि मुस्लीम स्त्रियांना हक्क मिळवून देण्याची चळवळ सुरूच ठेवली. वयाची ऐंशी पार केलेली ही बाई पुण्यासारख्या शहरात एकटी राहते आणि स्वत:ची कामे स्वत:च करते हे नक्कीच प्रेरणादायी होते. शिक्षणापासून तर संस्कारापर्यंत उर्दूत जडणघडण झाल्यानंतरही केवळ दलवाईंच्या आग्रहाखातर त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली. दलवाई पुरोगामी विचारसरणीचे, सुधारणावादी व्यक्तिमत्त्व आणि धार्मिक कट्टरतावादावर ते प्रहार करत असताना तेवढीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक सोबत त्यांनी केली. समाजकार्याचा ‘स’देखील माहिती नसलेल्या मेहरुन्निसा यांनी दलवाई हयात असताना तर त्यांच्या कार्यात साथ दिलीच, पण त्यांच्या १९ वर्षांच्या सोबतीनंतर त्यांचं कार्य पुढे सुरू ठेवलं. मेहरुन्निसा यांच्या घरी मुक्काम केल्यानंतर ‘तिहेरी तलाक’ या विषयावर चर्चा रंगली. मलाही खरं तर याच पद्धतीने तलाक देण्यात आला होता आणि म्हणूनच त्यांनी दिलेला सल्ला मला पुढच्या कामासाठी ऊर्जेचा स्रोत ठरला. ‘मुस्लीम समाजातील हजारो स्त्रिया तलाकमुळे पीडित आहेत, पण त्यातून त्यांनी बाहेर निघावं. कारण समाजाला त्यांच्या खचण्याशी काहीही देणंघेणं नसतं किंवा समाज त्यांच्या मदतीला पुढे येणार नसतो. अशा वेळी स्त्रियांनी आत्मनिर्भर होणं अधिक गरजेचं! तू जे धाडस दाखवलंस, ते इतर स्त्रियांनीही दाखवावं आणि आत्मनिर्भर व्हावं’ त्यांचे हे शब्द मनाला वरवर उभारी देणारे नव्हते, तर त्यांच्या या शब्दांनी आणखी चार हत्तींचं बळ अंगी संचारलं. एका धडाडीच्या, बिनधास्त, क्रांतिकारी विचारांच्या या स्त्रीने तिच्या दोन्ही मुलींना आत्मनिर्भर बनवलं. मुलींचे विवाह आंतरजातीय नव्हे तर आंतरधर्मीय लावून दिले. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा कार्यक्रम नागपुरात चार-पाच वर्षांपूर्वी झाला तेव्हा बजाजनगरातील कस्तुरबा भवनात त्या आल्या होत्या. त्यांच्या येण्याची नांदी मिळताच तडक त्यांना भेटायला गेले आणि तेथेही त्यांच्याशी पुन्हा ‘तिहेरी तलाक’ या विषयावर गप्पांचा फड रंगला.
मुस्लीम सत्यशोधक समाजमंडळाची स्थापना १९७० मध्ये झाली आणि सातच वर्षांनंतर ३ मे १९७७ ला दलवाईंचा मृत्यू झाला. कामाला उभारी येणे आणि दलवाईंचा मृत्यू याला एकच गाठ पडली. मात्र, दुसरा हमीद उभा करता आला नसला तरी मंडळाचे काम तेवढय़ाच ताकदीने सुरू होते. याच ताकदीने मीसुद्धा मंडळात ओढले गेले आणि या मंडळाची सदस्य झाले.
मुस्लीम समाज आणि महिलांच्या प्रश्नावर मंडळ काम करत आहे. मुस्लीम शरियत कायदा हा प्रथा, परंपरेने चालत आलेला, पण यातील बहुपत्नीत्व, ‘तिहेरी तलाक’सारखे विषय मुस्लीम स्त्रियांचे हनन करणारे. मुस्लीम स्त्रियांना पोटगीचाही अधिकार नाही आणि मुलांचा ताबाही नाही. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या या प्रथा, परंपरांच्या विरोधात या मंडळाच्या माध्यमातून बंड उभारले गेले. याच तलाकच्या विरोधात शायरा बानोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, त्या शायरा बानोला पुण्यातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. २२ इस्लामी देशांमध्ये या कायद्यात बदल झालेला असताना भारतात अजूनही त्याच कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे हे मेहरुन्निसा यांना अमान्य होते. म्हणूनच एका भेटीत त्या म्हणाल्या होत्या, ‘मुस्लीम धर्माचा खरा अर्थ सांगण्याचे काम मुल्लामौलवी करत नाहीत तर ते त्यांच्या सोयीने धर्माचा अर्थ लावतात.’ मंडळाच्या माध्यमातून या सर्व खोटय़ा प्रथा, परंपरांना मोडीत काढून त्यांना समाजाला, समाजातील स्त्रियांना समोर न्यायचे होते. हमीद दलवाईंचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मेहरुन्निसा दलवाई यांनी हाती घेतला होता आणि मंडळाची वाटचालही त्याच दिशेने सुरू होती. मेहरुन्निसा यांच्या जाण्याने ही वाट थांबणार नाही तर ते मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि आम्ही सारे कार्यकर्ते हे काम पुढे नेणार आहोत. मंडळाचे आणखी एक विशेष म्हणजे स्थापनेपासून तर आजतागायत मंडळाची सर्व कामे मराठीतून होतात. दलवाईंचे मराठी भाषेवरील प्रेम मेहरुन्निसा यांनी जोपासले आणि मंडळाच्या पुस्तकांपासून तर मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमापर्यंत सर्व काम मराठीतून होते. हमीद यांच्या आग्रहाखातर मराठी शिकणाऱ्या मेहरुन्निसा यांनाही मराठी भाषेतील तो गोडवा जाणवला आणि मराठी माणूस बोलणार नाही एवढे प्रभुत्व मराठीवर मिळवले.
शेवटपर्यंत करारी बाण्यानं जगणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला वयाच्या पंच्याऐंशीनंतरही कुणाच्या आधाराची गरज पडली नाही. मुस्लीम समाजाच्या सुधारणेविषयीची त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. स्वत:जवळ काहीही संपत्ती नसताना पतीनिधनानंतर नोकरी करून एकीकडे चरितार्थ चालवताना, दुसरीकडे समाजसुधारणेची वाटही त्या चालत राहिल्या. दलवाई यांचे अप्रकाशित लेखन प्रकाशनाच्या मार्गावर आणणाऱ्या साधना प्रकाशनाला त्यांनी वेळोवेळी मदत केली. हमीद दलवाईंच्या कार्याचा प्रभाव नरेंद्र दाभोलकरांवरही होता. म्हणूनच त्यांच्या मुलाचे नावदेखील त्यांनी हमीद ठेवले.
दाभोलकरांच्या साधना प्रकाशनाशी त्यांचा निकटचा संबंध. मेहरुन्निसा यांनी स्वत: दोन-तीन पुस्तके लिहिली आणि त्यातील ‘मी भरून पावले आहे’ या पुस्तकात त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा उलगडा वाचकांना होतो. दलवाईंच्या मृत्यूनंतर सहजीवनातील आठवणी, त्यांचे कार्य पुढे नेण्याची धडपड असे सारे काही या आत्मचरित्रात आले आहे. हे आत्मचरित्र त्यांनी त्यांच्या सहीनिशी मला भेट द्यावे, यापेक्षा आणखी मोठी भेट काय असू शकते! पूर्णपणे उर्दूत शिकलेल्या, लग्नानंतर नवऱ्याच्या आग्रहाखातर मराठी शिकणाऱ्या, आवडीने त्यावर प्रभुत्व मिळवणाऱ्या एका मुस्लीम स्त्रीचे, मराठीतील हे पहिलेवहिलेच आत्मचरित्र ठरावे. पुस्तकाचा पुढे हिंदीत ‘मैं कृतार्थ हुई’ या नावाने अनुवाद झाला. त्यांच्या जाण्याने मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढणाऱ्या साऱ्यांनी प्रेरणास्थान गमावले आहे.
– रुबिना पटेल
शब्दांकन : राखी चव्हाण