सर्व क्षेत्रातील गुगलची घोडदौड ही लक्षणीय आहे. ती अशीच चालू राहिली तर गुगल जगावर राज्य करणार हे उघड आहे आणि गुगल हा ग्लोबल विषय असल्यामुळे अमेरिका किंवा कोणतेही सरकार त्यांना थोपवू शकणार नाही..
सबीर भाटियाची हॉटमेल या एकेकाळी सर्वात पुढारलेल्या (कटिंग एज्) मेलिंग सिस्टीमला गुगल खरेदी करण्याची ऑफर आली होती. ही ऑफर नाकारण्याची चूक म्हणजे, गेल्या शतकातील आय.टी. उद्योगातील एक सर्वात मोठी चूक असे म्हणता येईल. कारण गुगलच्या जी-मेलने अगदी कमी काळात हॉटमेलचा बाजा वाजवला. भाटिया यांनी तत्पूर्वीच हॉटमेल मायक्रोसॉफ्टला विकून अवाढव्य संपत्ती आपल्या बँक खात्यामध्ये जमा करून घेतली होती, त्यामुळे त्यांचे व्यक्तिगत असे विशेष नुकसान झाले नाही आणि ते सुदैवी ठरले. त्यानंतर गुगलने एकापाठोपाठ एक, अशा नामचीन इंटरनेट कंपन्यांना तडाखे द्यायला सुरुवात केली.
गुगलचे सगळेच प्रकल्प-सेवा (Services) यशस्वी झाल्या असे नाही. जी-प्लस ही सेवा सुरुवातीलाच कोलमडून पडली. गुगल क्रोम अल्पावधीतच काळाठिक्कर पडला. पण सर्च सेवेवर मात्र गुगलने आपली पकड हळूहळू वाढवत नेऊन एवढी घट्ट केली की, अल्टाव्हिस्टासारखी सर्च इंजिनमधील पायाभूत कंपनी अर्काईव्हज् किंवा म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली. मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या चाणाक्ष, धूर्त, कायदे-कावेबाज अशा जगातील प्रथम क्रमांकाच्या श्रीमंत माणसाने सर्वशक्तिनिशी गुगलच्या एकाधिकारशाहीवर निकराचा हल्ला चढवला, पण गुगलचे तो काहीच बिघडवू शकला नाही. आज त्याचे Bing हे सर्च इंजिन लोकांच्या विस्मृतीत गेलेले आहे.
गुगलचे ध्येय हे Organize the world’s information and make it universally accessible and useful. (जगातील सर्व माहितीचे वर्गीकरण करून ती सर्वाना खुली आणि उपयुक्त करून देणे हे आहे) ही माहिती कोणत्याही प्रकारची असू शकते. संगीत, नकाशे यापासून ते अगदी अवकाशापर्यंत. ५ सप्टेंबर १९९८ ला कंपनीचा जन्म स्टँडफर्ड विद्यापीठात झाला. सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी गुगलची स्थापना केली. आतापर्यंतच्या तांत्रिक प्रवासात आणि झालेल्या जलद प्रगतीमध्ये इतर कंपन्या आणि गुगल यातील फरक म्हणजे गुगलचे ओपन-मुक्त तत्त्वज्ञान हे होय. आज दिसणाऱ्या अ‍ॅपलच्या पीछेहाटीमागचे खरे कारण म्हणजे स्टीव्ह जॉब्ज-अ‍ॅपलचा पशाचा हव्यास हे राहिले आहे. हे तत्त्वज्ञान इंटरनेटवर चालत नाही. इंटरनेटवरील सेवा या बहुतांशी मोफतच असाव्या लागतात. निदान सुरुवातीला तरी! गुगलने ही आपली संस्कृतीच बनवून टाकली. गुगलच्या यशाचे दुसरे कारण म्हणजे, गुगलचे आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध. आठवडय़ाच्या पाच दिवसांतील एक दिवस स्वत:चे काम सोडून दुसरे कोणते तरी वेगळे असे काम करण्याची सक्ती गुगल कर्मचाऱ्यांवर आहे. ‘मग या दिवशी तो-ती कर्मचारी व्यक्ती घरीच झोपून राहिली तर?’ असा प्रश्न विचारला असता, ‘आम्ही माणसाची निवड/नेमणूक करतानाच अशी माणसे निवडतो की, असे घरी बसण्यासारखे प्रकार करण्यात त्यांना क्वचितच रस असेल याची खात्री आम्हाला असते’ असे थक्क करणारे धोरणात्मक उत्तर गुगलच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आले. गुगलच्या जगभर पसरलेला ५३,५०० कर्मचाऱ्यांचा ‘फोर्स’ हे गुगलचे मोठे शक्तिस्थान आहे. आय.टी. क्षेत्रातील प्रत्येकाला गुगलबरोबर काम करण्याची इच्छा आहे. गुगलचे उत्पन्न हे बहुतांशी जाहिरातीतून मिळणारे आहे. जगभर पसरलेल्या १० लाख सर्वर्सवर रोज १०० कोटी सर्च रिक्वेस्ट येतात. रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर बदल करण्याची क्षमता अजून टिकवून धरल्यामुळे गुगलची ही दादागिरी आहे.
गुगलने आतापर्यंत स्वत:चे हार्डवेअर-मोबाईल फोन, पी.सी., टॅबलेट, इंटरनेट टेलिव्हिजन, ई-बुक टॅबलेट इ. बाजारात आणलेले नाहीत. (सुरुवातीच्या काळात HTC च्या नेक्सस वन या फोनवर, तेही मागच्या बाजूला आपले नाव वापरण्याची परवानगी दिली होती, हा अपवाद) त्यामुळे या हार्डवेअरच्या बाजारात गुगलची कोणाशीही स्पर्धा नाही. परंतु ज्याप्रमाणे बिल गेट्सने MS-DOS  ही सॉफ्टवेअर-प्रणाली तयार करून ती सगळ्यांना दिली आणि बिग ब्ल्यू (Big Blue) आय.बी.एम. (IBM) या महाकाय कंपनीच्या वाढीला रोखत, या क्षेत्रात पहिला नंबर मिळवला. त्याच धर्तीवर गुगलने अँड्रॉईड ही मोबाईल फोन, टॅबलेटसाठी ऑपरेटिंग प्रणाली निर्माण केली. अँड्रॉईड म्हणजे हाडामांसाच्या माणसासारखा दिसणारा, चालणारा, बोलणारा पण भावनाहीन यंत्रमानव. स्टार-ट्रेक या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टेलिव्हिजनच्या जमान्यातल्या सायन्स फिक्शन मालिकेत ‘डाटा’ नावाचा यंत्रमानव (अँड्रॉईड) आहे. अँड्रॉईड प्रणालीचा ‘डाटा बेस’ हाच कणा आहे. गुगलच्या सर्च इंजिनवरून अँड्रॉईडला असा डाटा क्षणार्धात मिळवता येतो. हा अँड्रॉईड दिसतो मात्र जॉर्ज लूकासच्या ‘स्टार्स वॉर्स’मधील चपळ रोबो R2-D2 सारखा. हे दोन्ही रोबो
जनमानसात खोलवर रुजलेले असे सिम्बॉल्स आहेत. अँड्रॉईड ही लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, अँड्रॉईड प्रणाली ही टचस्क्रीन मोबाइलसाठीच बनवली गेली होती. ५ नोव्हेंबर २००७ साली अँड्रॉईडची ‘बेटा’ सिस्टीम बाजारात अवतरली. तेव्हा त्याचे कोडनेम R2D2 हेच होते. आजमितीला जगातील ४० कोटी लोक अँड्रॉईड वापरतात.  म्हणूनच की काय स्टीव्ह जॉब्जने अँड्रॉईड हा आपला क्रमांक एकचा शत्रू असून, अ‍ॅपलकडील शेवटचा डॉलर संपेपर्यंत ही खोटी (बोगस) प्रणाली आपण नष्ट करू अशी घोषणा आपल्या चरित्रात केली होती. अ‍ॅपलला गुगलपासून असलेली भीती स्टीव्हला ठाऊक होती. ती खरी क्षाली! जेव्हा गेल्या महिनाभरात अ‍ॅपलचा शेअर १२० डॉलर्सनी कोसळला. अ‍ॅपलचे आयफोन २०१२च्या अखेरीपर्यंत अमेरिकेत सर्वात जास्त खपत असत. परंतु आता सॅमसंग आणि एलजी या कोरियन कंपन्यांनी, अ‍ॅपलच्या स्मार्टफोन मार्केटवर घाला घातला आहे. एकेकाळी ब्लॅकबेरीच्या मोबाइल फोन्सचा अमेरिकेतील मार्केट शेअर हा ६० टक्के इतका होता, तो आज दोन टक्क्यांवर आला आहे. गेल्याच महिन्यात ब्लॅकबेरीने बाजारात आणलेला बीबी-१० हा स्मार्टफोन बाजारात फसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ब्लॅकबेरी बनवणाऱ्या RIM (Research in Motion) या कंपनीचा शेअर १७ टक्क्यांनी पडलेला आहे. हे असे का घडते आहे? गुगल टी.व्ही. येण्याआधीच घाईघाईने अ‍ॅपलने आपला अ‍ॅपल टी.व्ही. बाजारात आणला, त्याचे कारण गुगलने शार्प या जपानी टी.व्ही. कंपनीमध्ये गुंतवणूक करून शार्पद्वारा आपला गुगल टी.व्ही. मार्केटमध्ये आणण्याचे ठरविले आहे. टच स्क्रीन स्मार्टफोन मार्केट जसे एक्सप्लोड झाले, त्याची पुढची पायरी म्हणजे बिग स्क्रीन कम्प्युटिंग मार्केट आता जोर धरू लागणार आहे. गुगल तिथेही घुसली तर अ‍ॅपलचे काही खरे नाही.
गेम थिअरी
१९५० साली रॅण्ड कॉर्पोरेशनच्या मेरील फ्लर्ड आणि मेल्विन ड्रेशर या शास्त्रज्ञांनी गेम थिअरीचा शोध लावला. जॉन नॅश (द ब्युटिफुल माइंड) या गणितज्ज्ञाने त्यात नॅश इक्विलिब्रियमची मोलाची भर घातली. दोन देशांमधील राजनतिक संबंधांमध्ये वापरण्यासाठी गेम थिअरीचा जन्म झाला (तिला Peace War Game असेही म्हणतात). पुढेही ही थिअरी अन्य थिअऱ्यांप्रमाणे कार्पोरेट जगतातही वापरात आली. कोका-कोलाने, न्यू-कोक बाजारात आणून सुरुवातीला बाजारात पिछाडी घेऊन नंतर क्लासिक कोकचा अवतार घडवून आणून पेप्सीला कोला मार्केटमध्ये जगात कायमचे कसे झोपवले, हे ८०च्या दशकातले गेम थिअरीचे वास्तव आता क्लासिक बिझनेस पॉलिसीचे चांगले उदाहरण आहे. त्याचवेळी जाऊन रिचर्ड डॉकिन्स याने The Selfish Gene या आपल्या पुस्तकात गेम थिअरीचे नवीन मॉडेलही अस्तित्वात आणले. विशेष म्हणजे इंग्लंडमधील सॉऊथहॅम्प्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रो. निकोलस जेनिंग्स यांच्या हाताखालील राजदीप दास, सर्वपली रामचरन, पेरूकृष्णन, व्यातिलगम तसेच अमेरिकेत प्रिन्सून विद्यापीठात डॉ. अविनाश दीक्षित या भारतीय गणितज्ज्ञांनी गेम थिअरीमध्ये मोलाची भर घातली आहे. भारत-पाकिस्तान तणावयुक्त संबंधात भारताच्या परराष्ट्र खात्याने वेळोवेळी गेम थिअरीचा वापर करून पाकिस्तानचे धोरण कमकुवत बनवलेले आपल्याला दिसते. पर्यावरणाच्या बाबतीतही वेगवेगळे नियम आणि धोरणे लागू करताना गेम थेअरीचा वापर तज्ज्ञांकडून केला जातो. गुगलनेसुद्धा आपल्या धोरणात कुठेही स्वत: प्रतिस्पध्र्याशी, तडक समोर न येता, हार्डवेअरमध्ये स्वत:चा ब्रॅन्ड न वापरता अ‍ॅपल, सॅमसंग, HTC अशा कंपन्यांना अँड्रॉईडद्वारे पाठिंबा दिला. अ‍ॅपल हार्डवेअर बनवत होती व सॉफ्टवेअरसाठी सुरुवातीला मायक्रोसॉफ्टवर व नंतर इतरांवर अवलंबून होती; तर मायक्रोसॉफ्ट हार्डवेअरमध्ये नसून सॉफ्टवेअरच्या ताकदीवर धंदा करीत असे. एक क्षण असा आला की, मायक्रोसॉफ्टला अँड्रॉईडच्या तडाख्याने मृतवत झालेल्या नोकिया (symbian platform) या कंपनीला विकत घेऊन विंडोज या प्लॅटफॉर्मवर लुमिया हा फोन/हार्डवेअर बाजारात आणणे भाग पडले. (स्मार्ट-फोन हा भविष्यातील प्लॅटफॉर्म असल्याचे गेट्स यांना ध्यानात यायला एवढा वेळ का लागला, हे खरोखरच समजत नाही.) परंतु लुमियाची ६०० आणि ८०० ही मॉडेल्स यशस्वी ठरली नाहीत.
नोकियाच्या ब्रँड लॉयल्टीमुळे जर त्यांनी पुढे बाळसे धरले, तर तोवर अँड्रॉईडची नवी आवृत्ती सध्याच्या आवृत्तीला (Jelly Bean)  मागे टाकून बाजारात येईल आणि बिल गेट्सना नोकियाकडे बघून ‘ये मने क्या किया, नोकिया क्यों लिया?’ असे म्हणावे लागेल. अमेरिकेने अफगाणिस्तान, तसेच पाकिस्तानात ड्रोन ही मानवविरहित विमाने वापरून शत्रूला नेस्तनाबूत केले, तसेच गुगलने सॅमसंग, एलजी, एचटीसी या कंपन्यांचा वापर करून नोकिया, ब्लॅकबेरी, अ‍ॅपल या कंपन्यांच्या पायाखालचे जाजमच हिसकावून घेतले आहे.
मायक्रोसॉफ्टचे बिंग तर जेव्हा ‘बिंग’ हे सर्च इंजिन बोंबलले तेव्हाच फुटले होते. AltaVista,Yahoo  सारख्या कंपन्यांनी तर कधीच हार पत्करली होती. सर्च इंजिनच्या पाठबळावर अँड्रॉईड ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार करून गुगलने आतापर्यंत आपले धंद्यातील वर्चस्व निर्विवादपणे टिकवलेले आहे. गुगलच्या प्रॉडक्ट पाइपलाइनमध्ये अनेक प्रकल्प आकार घेताहेत. त्यातील दर १०मधील ३ (३० टक्के) प्रकल्प यशस्वी होत राहिले तरी गुगलकडे संपूर्ण जगाचे ई-व्यावसायिक आणि बौद्धिक नेतृत्व राहणार आहे. हे तसे राहण्याचे कारण गुगलचे तत्त्वज्ञान आणि गुगलमध्ये काम करणारी तसेच गुगल वापरणारी (Googlers) माणसे हे आहे आणि असेल.
सर्व क्षेत्रातील गुगलची घोडदौड ही लक्षणीय आहे. घोडदौड अशीच चालू राहिली तर गुगल जगावर राज्य करणार हे उघड आहे आणि गुगल हा ग्लोबल विषय असल्यामुळे अमेरिका किंवा कोणतेही सरकार त्यांना थोपवू शकणार नाही हेही सत्य आहे. वेबवरील प्रत्येक देवाणघेवाण, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक सिनेमा, प्रत्येक फोन, प्रत्येक संदर्भ, प्रत्येक पॅटर्न, प्रत्येक शोध, प्रत्येक जाहिरात, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ई-कॉमर्स यावर गुगलला नियंत्रण ठेवता आले तर गुटेनबर्गच्या मुद्रणयंत्राने सामाजिक जीवनावर परिणाम घडवायला ५०० वष्रे घेतली तशी गुगल २५-३० वर्षांमध्ये र्सवकष सामाजिक बदल घडवून आणू शकते (नवा रेनेसाँ) आणि जनमत हवे तसे घडवू शकते. गुगल जगावर ताबा मिळवून बदल घडवून आणू शकेल, म्हणजे जसे मुद्रणामुळे लेखक, शास्त्रज्ञ, पत्रकार, नाटक-चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक यांनी बदलाचे माध्यम (कॅटेलिस्ट) म्हणून काम केले तसे गुगलच्या बाबतीत कोण करील? Who Will Drive Google?तर याचे उत्तर ‘गुगलर्स’! गुगलचा वापर करणारे सामान्य लोक!  
गॉड ब्लेस गुगल!..

Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”