* प्रणब मुखर्जी (राष्ट्रपती)

भारतीय नौदल ४ डिसेंबर २०१२ रोजी नौदल दिन ( नेव्ही डे ) साजरा करीत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे. भारतीय नौदलाचे उच्च व्यावसायिक मूल्य आणि समर्पण वृत्ती याचा प्रत्येक देशवासीयाला अभिमान आहे. नौदल आपल्या सागरी सीमेचे संरक्षण करण्याचे कठीण काम चोखपणे बजावत असून जगभरात शांतता आणि सदिच्छेचा देशाचा दूत म्हणूनही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
िहद महासागरामध्ये शांतता व सुरक्षितता राहील याची खबरदारी घेण्याची जबाबदारी भारतीय नौदल आगामी काळातही पार पाडेल याची मला खात्री आहे. देशाच्या राजकीय, आíथक, कूटनीतिक तसेच लष्करी हितांचे संवर्धन करणे आणि कोणत्याही सागरी आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय नौदल यापुढेही बजावत राहील याचा मला विश्वास आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने मी सर्व अधिकारी, जवान तसेच त्यांच्या कुटुंबयांना शुभेच्छा देतो. नौदल दिन चिरायू होवो.

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी

* डॉ. मनमोहन सिंग</strong> (पंतप्रधान)
नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाचे सर्व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा. आपल्या देशाच्या भोवतालच्या सागरी क्षेत्रामध्ये शांतता व सुरक्षितता कायम राखण्यासाठी नौदलाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली असून यामुळे देशाच्या आíथक प्रगतीस हातभार लागला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आणि सुनियोजित यंत्रणा असलेले भारतीय नौदल हे जगातील एक बलाढय़ असे नौदल आहे. सागरी क्षेत्रातील भारताच्या हिताची जपणूक करताना येणा-या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास आपले नौदल सज्ज आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो. देशाच्या सुरक्षेसाठी नौदलाने आजवर दिलेल्या असामान्य सेवेबद्दल देशवासीयांच्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे. देशसेवेच्या या कार्यात भारतीय नौदल नेहमी यशस्वी होवो, यासाठी माझ्या शुभेच्छा.

* ए. के. अ‍ॅण्टनी (संरक्षणमंत्री, भारत सरकार)


संरक्षणविषयक प्रश्न गुंतागुतीचे होत असताना देशाच्या सागरी मार्गाचे संरक्षण करणे आणि चाचेगिरीला आळा घालण्याची मोठी जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. भारताचे स्थान लक्षात घेता देशाच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या समुद्रामध्ये अखंडपणे जागल्याची भूमिका नौदलाला पार पाडावी लागते. देशाचा व्यापार आणि ऊर्जेच्या जीवनवाहिनीचे संरक्षण करण्याचे कामही नौदलाकडेच आहे. त्यामुळे नौदलाचे सक्षमीकरण करणे ही सध्याची गरज बनली आहे.
आयएनएस ‘चक्र’ चा नौदलातील समावेश करण्यात आला असून आयएनएस विक्रमादित्य आणि सागरी मार्गावर लांब पल्ल्याच्या विमानवाहू जहाज पी-८१ च्या समावेशानंतर भारतीय नौदलास अधिक बळकटी प्राप्त होणार असून त्यामुळे जगातील प्रबळ नौदल तंत्रज्ञानाच्या तोडीस तोड तंत्रज्ञान भारतीय नौदलाकडेही उपलब्ध असेल.
नौदलातील अधिकारी तसेच जवानांनी आजवर गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल देशवासियांना त्यांचा अभिमान आहे. जगातील
प्रबळ नौदलामध्ये आज भारतीय नौदलाचे मानाचे स्थान आहे. मागील काही वर्षांंत नौदलाच्या झालेल्या अधुनिकीकरणाचे यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय नौदलास नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प आजच्या दिवसानिमित्त आपले नौदलातील लढवय्ये जवान करतील, अशी मला खात्री आहे. नौदल दिनानिमित्त सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
जय िहद!

* के. शंकरनारायणन (राज्यपाल, महाराष्ट्र राज्य)

भारताचे अखंडत्व आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी ‘पांढऱ्याशुभ्र’ गणवेशातील नौदल अधिकाऱ्यांनी अभूतपूर्व त्याग केला आहे. अधिकाऱ्यांच्या या त्यागाचे स्मरण म्हणून नौदल दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या तसेच भारतीय नागरिकांच्या मनांत भारताचे अखंडत्व दृग्गोचर करणारी आपली जहाजे, केवळ भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय जलसीमेवरही अभिमानाने विहार करीत असतात. अत्यंत आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीतही या देशाची नि:स्वार्थीपणे आणि कणखरपणे सेवा करणाऱ्या नौदलातील सर्व महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. सागरी हद्दीत भारतीय नौदलासमोर दररोज नवीन आव्हाने उभी राहत आहेत. स्वाभाविकच सरत्या प्रत्येक दिवसाबरोबर नौदलाची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरू लागली आहे. सागरी वाहतूक निर्धोक राखत आणि सोमालियाच्या किनारपट्टीवरून येणारा सागरी चाच्यांचा धोका परतवून लावत नौदलाचे सैनिक आपले कर्तव्य चोखपणे पार पाडताना दिसत आहेत. व्यापारी जहाजांवर समुद्री चाच्यांनी केलेले अनेक हल्ले यशस्वीपणे परतवून लावण्याची कामगिरी सागरी गस्तीवरील जहाजांनी चोखपणे बजावली आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत सागरी सुरक्षेचे महत्त्व वाढले आहे. भारतातील अन्य राज्यांबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी, गेल्या वर्षभरात भारतीय नौदलाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सागरी किनाऱ्यावरील सतर्कता आणि कोणत्याही परकीय आक्रमणाविरोधातील सुसज्जता या उपक्रमांमुळे वाढीस लागली आहे. भारतीय नौदलाचे ‘डोळे आणि कान’ म्हणून मच्छिमार बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यात अधिकाऱ्यांना यश आले असून नौदलाचा हा प्रयत्न निश्चितच ‘सफल’ झाला असे म्हणावे लागेल. भारतीय नौदलातर्फे महाराष्ट्र राज्याच्या ‘मरीन पोलिसां’नाही व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते.
‘मैत्रीचे सेतू’ उभारण्यासाठी भारतीय नौदल समुद्राचा अत्यंत सफाईदारपणे वापर करीत असते. आपल्या सागरी विहारातून आणि देशोदेशींच्या भेटींमधून सदिच्छा व्यक्त करणारी भारतीय नौदलाची जहाजे भारताच्या आर्थिक विकासातही आपले योगदान देतात. मुंबईतील मंत्रालयाला लागलेली आग विझविण्यासारख्या नागरी कामांमध्येही भारतीय नौदलाचे अधिकारी मदत करतात. ‘सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू ऑपरेशन्स’द्वारे नौदलाने केलेल्या मोहिमांमुळे अनेकांचे जीव वाचविण्यात यश आले असून त्यामुळे नौदलाबद्दल अनेकांच्या मनांत आदराची भावना निर्माण झाली आहे.भारतीय नौदलाची ‘धारधार तलवार’ (स्वोर्ड आर्म ऑफ इंडियन नेव्ही ) असे सार्थ बिरूद नौदलाची पश्चिमी कमांड अभिमानाने मिरविते. भारताच्या आणि भारतीय नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली पश्चिमी आघाडी तिच्या सुसज्जतेसाठी आणि सतर्कतेसाठी सुपरिचित आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने मी भारतीय नौदलाच्या पश्चिमी आघाडीचे सर्व सैनिक, त्यांची कुटुंबे आणि अधिकारीवर्ग यांना शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्यावर असलेला भारतीयांचा विश्वास आणि त्यांच्याबद्दल असलेली कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो.

* अ‍ॅडमिरल डी.के. जोशी
पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एनएम, व्हीएसएम, एडीसी
नौदल प्रमुख
देशाच्या विकासासाठी स्थिर व शांततातमय वातावरणाची भारताला गरज आहे. सामाजिक आणि आíथक क्षेत्रात देशाचा विकास होत असताना सुरक्षाविषयक कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. देशाच्या सागरी सीमा सुरक्षित राहाव्यात तसेच जलमार्गाचा देशाच्या विकासामध्ये हातभार लागावा यासाठी भारतीय नौदल नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. याच उद्देशासाठी आगामी वर्ष ‘हे भारतीय नौदल – देशाच्या विकासासाठी सागरी शक्ती’ या संकल्पनेसह साजरे करणार आहे.
देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणा-या शक्तींचा सामना करण्यासाठी आपल्याकडील शस्त्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच नौदलाने केला आहे. गुंतागुंतीच्या लष्करी कारवाईमध्ये अशा प्रकारच्या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक बनला आहे. नौदलाचे दैनंदिन कार्य अधिक सोपे करण्यात या अधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्यावरील सर्व जबाबदारी आणि गुंतागुतीच्या मोहिमा पार पाडत असताना उच्च दर्जाच्या नैतिक मूल्यांची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. नौदलाच्या उज्ज्वल इतिहासाचे स्मरण ठेवून आम्ही यापुढेही अशाच ध्येयवादी वृत्तीने कार्यरत राहू, याचा मला विश्वास आहे. जय िहद!

* व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा
पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम अँड बीएआर, एडीसी
फ्डॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड भारतीय नौदल दिन – २०१२चे औचित्य साधून आपल्याशी संवाद साधणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ४ डिसेंबर, १९७१ रोजी भारतीय नौदलाच्या जहाजांनी अत्यंत धाडसी असा क्षेपणास्त्र हल्ला शत्रूच्या नाविक तळांवर केला होता. १९७१ च्या युद्धात भारतीय विजयाची पताका फडकविणाऱ्या या प्रसंगाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशाचा सन्मान राखण्यासाठी, समृद्धता वाढविण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा कटिबद्ध असल्याची प्रतिज्ञा घेतो. गुजरातपासून ते थेट दक्षिणेकडील किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या विशाल सागरी हद्दीचे संरक्षण करण्यात वेस्टर्न नेव्हल कमांड महत्त्वाची भूमिका बजावते.
सागरमार्गे होणाऱ्या व्यापार-उदीमाचे संरक्षण करण्यासाठी आमची जहाजे सदैव सुसज्ज असतात. त्या दृष्टीने आम्ही नेहमीच आत्मप्रेरित असतो. भारत सरकारने आमच्यावर ठेवलेल्या विश्वासास आम्ही सदैव जागत आलो आहोत. तसेच विविध सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध स्तरांतून सहभाग वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. सागरी सुरक्षेशी संबंधित बहुतांश ‘स्टेक होल्डर्स’ एकत्र आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. दर दोन वर्षांनी होणाऱ्या राज्यनिहाय सागरी सुरक्षा कसरती या वर्षी पार पडल्या. मच्छीमार बांधवांमध्ये जागृती निर्माण करणारे उपक्रम, तटरक्षक दलाशी – राज्य सरकारांशी तसेच अन्य शासकीय कार्यालयांशी समन्वय साधून परवाना देण्याची नवीन पद्धती, बायोमेट्रिक कार्ड्स, बायोमेट्रिक रीडर अशा आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या यंत्रणा उभारण्यात नौदलाने आपले योगदान दिले आहे आणि आता आपल्याला त्याची फळे दिसू लागली आहेत. मरिन पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, मच्छीमार बांधव, पोर्ट ट्रस्ट आणि गुप्तचर यंत्रणांशी नौदलाने उत्तम समन्वय राखला आहे.
‘सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स’च्या माध्यमातून तसेच राज्य सरकारांना सागरी मोहिमांमध्ये मदत करून आम्ही आमची सामाजिक जबाबदारी दाखवून दिली आहे. २१ जून, २०१२ रोजी मुंबईच्या मंत्रालयाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी नौदलाची सहा पथके तातडीने तैनात केली गेली होती. मुंबई बंदर सोडताना एमव्ही अ‍ॅमस्टरडॅम ब्रिज या जहाजाला आग लागली होती. ती नियंत्रणात आणण्याच्या कामीही नौदलाने तटरक्षक दलास सहकार्य केले होते. समुद्रात अडकलेल्या किंवा बुडणाऱ्या अनेक जणांना वैद्यकीय मदत पाठविण्यासाठी नौदलाने अनेक वेळा आपली हेलिकॉप्टर्स वापरली आहेत. जर्मनीच्या ब्रेमन, एमव्ही विश्व विकास, एमव्ही महर्षी अशा जहाजांना नौदलातर्फे उपरोक्त मदत पुरविली गेली. नैसर्गिक आपत्ती आणि अपघातांच्या वेळी मुंबई, गोवा आणि कारवार येथील बचाव पथकांनी नागरी प्रशासनास अभिमानास्पद सहकार्य केले आहे आणि तेही अगदी आयत्या वेळी मिळालेल्या सूचनांनुसार! ‘सागर परिक्रमा – २’ सारख्या उपक्रमाद्वारे आम्ही भारतीय बनावटीच्या म्हादेई या जहाजातून सागरी प्रदक्षिणेस चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. नौदलाच्या पश्चिमी कमांडचे एक अधिकारी कोणत्याही बंदरावर न उतरता ही प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत. असे साहस करणारे ते पहिले भारतीय आहेत. आमची जहाजे, पाणबुडय़ा आणि हवाई दल यांनी भूमध्य समुद्रापासून आफ्रिकेच्या किनारपट्टीपर्यंत तसेच अगदी विश्ववृत्तापर्यंत मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. बहुपक्षीय तसेच द्विपक्षीय सागरी कसरतींच्या माध्यमातून तसेच विविध बंदरांना भेटी देण्याच्या लष्करी राजनीतीच्या माध्यमातून विविध देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात आमचे मोलाचे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय चाचेगिरीविरोधात लढण्यासाठी एडनच्या आखातासह अनेक भागांत नौदलाने आपल्या सामर्थ्यांचा प्रभावी वापर केला आहे. आमची चाचेगिरीविरोधी गस्त, आमची सागरी व्यापारी क्षेत्रातील टेहळणी आणि हिंदी महासागर प्रदेशांतील राष्ट्रांना सर्वेक्षणास केलेली मदत यामुळे अनेक राष्ट्रांचे भारताशी दृढ भावनिक बंध तयार झाले आहेत. आमची देखभालीची पद्धती, पुरवठा यंत्रणा आणि नागरी मदत पथके ही जगातील अत्यंत प्रगत, तसेच अद्ययावत प्रशिक्षण घेतलेली असून कोणत्याही खडतर आव्हानांचा सामना करण्याची त्यांची क्षमता आहे. आमच्याकडून राष्ट्राच्या अपेक्षा कित्येक पटीने वाढल्या असून नवनवीन तंत्रज्ञान आणि साधनांच्या माध्यमातून त्यांची पूर्तता करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. नौदलाचे सर्वच आघाडय़ांवर सक्षमीकरण हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या अधिकाऱ्यांमधील उत्तुंग प्रेरणा आणि व्यावसायिक उत्तमता हे संस्थात्मक पातळीवरील उत्तम कौटुंबिक पाठबळाचे फलित आहे. भारताचे तसेच भारतीय सागरी हद्दीत असलेल्या राष्ट्रांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या आर्थिक उन्नत्तीस चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच या सेवेत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यानिमित्ताने मी देशबांधवांचे आम्हाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय हिंद !!

Story img Loader