शेती व्यवसायात आता फळबागा लागवडीकडेही शेतकरी मोठ्या संख्येने वळू लागला आहे. यामध्ये सुरुवातीला आंबा, केळी, द्राक्षापुरता असलेला शेतकरी आता पपई, डाळिंब आणि पेरू फळांकडेही मोठ्या प्रमाणात वळत आहे. बागेची उत्तम लागवड, जोपासना केल्यावर पेरूसारखे उत्पादनही शेतकऱ्यांना चांगले पैसे देऊ लागले आहे.

शेती करताना भाजीपाला किंवा नगदी पिके घेण्याबरोबरच हवामान, जमिनीचा अंदाज घेत आता अनेक शेतकरी फळ लागवडीकडे वळत आहेत. यामध्ये सुरुवातीला आंबा, केळी, द्राक्षाकडे ओढ असलेला शेतकरी मोटा होता. पण आता त्यासोबत पपई, डाळिंब आणि पेरू लागवडीकडेही मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत आहेत. मुबलक उत्पादन आणि विक्रीची हमी यामुळे शेतकरी पेरूला पसंती देत आहेत. बागेची उत्तम लागवड, जोपासना केल्यावर हे फळ शेतकऱ्यांना चांगले पैसे देऊ लागले आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?

मानवी शरीराला आवश्यक घटक असलेले फायबर, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले फळ आणि तेही गोड असूनही रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे फळ पेरू मानले जाते. पेरू हंगामी फळ असले, तरी बाजारात मागणीही असते. अलीकडच्या काळात बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष, डाळिंब ही पिके बेभरवशाची बनली असताना पेरू लागवडीकडे शेतकरीवर्ग वळू लागला आहे.

हेही वाचा >>> लोकशिवार: कढीपत्त्याची पावडर !

पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिनावगळता वर्षातील दहा महिने कधीही करू शकता. जमिनीची आखणी करून ६ बाय ६ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत ५०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ५ ग्रॅम, फोलिडोल पावडर आणि माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत आणि त्यात रोपांची लागवड करावी. जवळपास १ एकरमध्ये २ हजार झाडांची लागवडदेखील होते. पेरू बागेसाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल मानले जाते. त्याच्या आदर्श उत्पादनासाठी १५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. पेरूचे झाड कोरडे हवामान सहज सहन करते. पेरूचे रोप अगदी सहज तयार करता येते आणि हवामानातील चढ-उतारांचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता आहे त्या ठिकाणीदेखील हे पेरूचे पीक व्यवस्थित येते.

पेरूच्या सुधारित जाती

‘लखनऊ ४९’ ही पेरूची संपूर्ण भारतात उत्पादित होणारी एक प्रगत आणि सुधारित जात आहे. या जातीचे झाड आकाराने लहान असते. या जातीचा पेरू मात्र खूपच गोड असतो. साहजिकच बाजारात याला मोठी मागणी आहे. याशिवाय बाजारपेठेची अधिक पसंती असलेला तैवान पेरू, श्वेता पेरू, थाई पेरू, चविष्ट अलाहाबाद सफेद, पंत प्रभात अशा प्रमुख जाती आहेत. यांपैकी एखादी जात निवडू शकता. प्रत्येक जातीचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे.

पिकावरील रोग व कीड नियंत्रण

पिकावर प्रामुख्याने फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. याच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करावा. फळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी. फळांवरील डागांसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधफवारणी करावी. रोगग्रस्त फळे व फांद्या बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकाव्यात व बागेत हवा खेळती राहील, अशी मोकळीकता ठेवावी.

हरितक्रांतीनंतर भारतात मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय झाला. याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी विविध पिकांत प्रतिएकर उत्पादन वाढवले. याचाच परिणाम, भारत अन्नधान्य, फळे, भाजीपाला याबाबतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला. एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीतील उत्पादन व प्रतिएकर उत्पादकता वाढली, पण दुसरीकडे गेल्या दोन दशकांचा विचार केल्यास वाढलेले तापमान, पावसाची अनिश्चितता इत्यादी हवामानात झालेले बदल, याला आपण ग्लोबल वॉर्मिंगच म्हणू शकतो व दुसरीकडे रासायनिक खतांचा जास्त वापर झाल्याने बिघडलेली मातीची प्रत. थोडक्यात, परिस्थितीनुरूप झालेले बदल आणि तंत्रज्ञान वापरातील बिघडलेला समतोल यामुळे आज शेती करताना शेतकऱ्याला या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो. हवामान आणि समतोल तंत्रज्ञान यासोबतच महत्त्वाचे आहे ते उत्पादित मालाला चांगला भाव मिळणे. चांगला भाव मिळावा यासाठी क्वालिटी माल तयार करणे, ही महत्त्वाची एक पायरी असते. हवामानातील बदलानुसार योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि उत्तम बाजारभाव या तीन गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या, तर शेतकरी स्वत:च्या शेतीत यशस्वी होऊ शकतो.

भारतात पेरू उत्पादनात महाराष्ट्र एक महत्त्वाचे राज्य आहे. त्यात महाराष्ट्रात पेरू उत्पादनातील महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी. या भागात मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड केली जाते. येथील पेरू मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. वर नमूद केल्याप्रमाणे, आज शेती किंवा फळे बागायती करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये हवामानातील बदलानुसार योग्य ते नियोजन करणे, माती व्यवस्थापन आणि त्यालाच संलग्न खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग – कीड व्यवस्थापन, मार्केटचा योग्य अभ्यास करून त्यानुसार बहार व्यवस्थापन इत्यादी घटकांचा समावेश होतो. वरील सर्व गोष्टींचे योग्य नियोजन करून निमगाव केतकी येथील सुनील भोंग या पेरू बागायतदार शेतकऱ्याने नेचर केअर फर्टिलायझर्सच्या मदतीने विक्रमी पेरू उत्पादन घेऊन स्वत:ची एक यशोगाथाच लिहिली आहे आणि शेती क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

श्री. भोंग हे गेल्या चार वर्षांपासून पेरूचे उत्पादन घेतात. पेरू पिकाचे सरासरी प्रतिएकर उत्पादन २५ ते ३० टन निघते. परंतु चालू वर्षी त्यांनी पेरूचे प्रतिएकर तब्बल ४० टन एवढे उत्पादन घेतले आहे. या सगळ्यांत त्यांना साथ मिळाली ती नेचर केअर फर्टिलायझर्सच्या ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, पॉलीफॉस्फेट व जैविक खतांची. गेली तीन वर्षे ते बागेत सातत्याने ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा वापर करत आहेत. ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे एक पेंडीयुक्त व जीवजिवाणूने समृद्ध असे सेंद्रिय खत असून, त्याच्या सातत्यपूर्ण वापराने त्यांच्या शेतात आमूलाग्र असे बदल झालेले दिसून आले. मातीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारले. अन्नद्रव्य उपलब्धता वाढून एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना, रासायनिक खतांचा वापर कमी झाला. माती सुपीक झाल्याने, कमीत कमी म्हणजे खत व्यवस्थापनाच्या फक्त २० टक्के रासायनिक खते देऊन अन्नद्रव्य उपलब्धता चांगली झाली. त्याचसोबत ग्रीन हार्वेस्ट स्पेशलमध्ये असलेल्या विविध मित्र बुरशीमुळे पेरू पिकात शेतकऱ्याची डोकेदुखी ठरणारे व खर्च वाढविणारे सूत्रकृमी व मिली बग यावर १०० टक्के नियंत्रण मिळवता आले. यामुळे रोग कीड व्यवस्थापनामधील खर्चात बचत झाली आहे. एकूण खर्चाचा विचार केल्यास, पेरूमध्ये खते, औषधे यांचा प्रतिएकर खर्च अंदाजे दीड लाख येतो. परंतु, ग्रीन हार्वेस्ट स्पेशलच्या सातत्यपूर्ण वापरामुळे या खर्चात जवळपास २० ते २५ टक्के बचत होऊन तो खर्च साधारण एक लाख दहा हजारांवर सीमित राहिला आहे. यासोबतच, नेचर केअरच्या पॉलीफॉस्फेट खतांचा देखील सातत्याने वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर झाली. साधारणत: जमिनीत दिलेली विद्राव्य खते पिकाला लागू पडतातच असे नाही. बऱ्याच प्रमाणात त्यांचे जमिनीत स्थिरीकरण झालेले असते. ही स्थिर झालेली खते पुन्हा उपलब्ध करून देण्याचे काम पॉलीफॉस्फेट गटातील खतांमार्फत होते. त्यामुळे रासायनिक खतांचे प्रमाण कमी द्यावे लागते. त्यामुळे श्री. भोंग यांना इतर कोणतीही नत्र, स्फुरद, पालाशयुक्त विद्राव्य खते वापरावी लागली नाहीत. अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि रोग कीड नियंत्रण चांगले झाल्याने उत्पादित मालाला उत्तम गुणवत्ता आहे. आज श्री. सुनील भोंग यांच्या शेतात प्रतिझाड सरासरी २५० फळे आहेत. प्रतिफळाचे वजन साधारण ४०० ते ५०० ग्रॅम इतके आहे. म्हणजे सरासरी ८० ते १०० किलो एवढा माल निघणार आहे.

digambarshinde64@gmail.com

Story img Loader