अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी स्वत: पंतप्रधान कार्यालय अर्थ मंत्रालयाशी समन्वय ठेवून आहे. दोन्हीकडील सनदी अधिकारी परस्पर समन्वयाने अर्थसंकल्पाला आकार देत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या या पडद्यामागील चेहऱ्यांविषयी..
पी. के. मिश्रा (पंतप्रधानांचे अतिरिक्त मुख्य सचिव)
अरिवद मायाराम (अर्थ सचिव)
जी. एस. संधू (वित्तीय सेवा विभागाचे सचिव)
रवी माथूर (निर्गुतवणूक विभागाचे सचिव)
सिंधुश्री खुल्लर (नियोजन आयोगाचे सचिव)
रतन पी. वातल (खर्च/व्यय/विनियोग सचिव)
शक्तिकांत दास (महसूल सचिव)
रजत भार्गव (अर्थसंकल्प विभागाचे सहसचिव)
नृपेंद्र मिश्रा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव
अत्यंत स्पष्टवक्ता, पारदर्शक कारभाराचे भोक्ते आणि योग्य तेच बोलणारे म्हणून मिश्रा यांचा दरारा आहे.
अर्थसंकल्पपूर्व बठकीत मिश्रा यांनी लोकप्रिय नव्हे तर विवेकबुद्धी जागृत ठेवून अर्थसंकल्पाची निर्मिती करायचे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अर्थसंकल्पावर त्यांच्या विचारांची छाप असेल हे नि:संशय. सर्वसहमती घडवून आणण्यातही मिश्रा वाकबगार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा