डॉ. अनंत पंढेरे

आजार आणि आरोग्यविषयक जागृती-करोनानंतर अनेक आजारांविषयीची वाढती काळजी दिसून येते आहे. यामध्ये दोन प्रकार दिसून येतात. एक म्हणजे, करोना काळातील भयाचे सावट अजून उतरले नसल्याने अनेकजण छोट्या-छोट्या आरोग्य तक्रारीविषयी घाबरून जात आहेत. या लोकांचा गट दुर्दैवाने मोठा आहे. वैद्याकीय सल्ला किंवा तपासणीकरिता तातडीने डॉक्टरांकडे जाताना दिसतात. इंग्रजीमध्ये ज्याला FEAR FACTOR किंवा भयगंड म्हणले जाते अशी जनता डॉक्टरकडे धाव लवकर घेते आहे, तर दुसरा गट असा आहे ज्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.

Former President Ram Nath Kovind Report on One Country One Election submitted to President Draupadi Murmu
One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Nawab Malik Son in Law Accident
Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

आरोग्याचे आर्थिक नियोजन-एक महत्त्वाचा बदल सर्वसामान्यांच्या मानसिकतेत झालेला दिसून येतो तो म्हणजे आरोग्याकरिता पैशांची तरतूद करण्याची मानसिकता वाढलेली दिसते. एकूणच स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे ‘जेव्हा होईल तेव्हा पाहू, आपल्याला काय होते आहे.’ या मानसिकतेतून पाहणारी जनता आता बदललेली दिसते आहे. यामुळे आरोग्य विम्याचे प्रमाण वाढलेले दिसते, विम्यामध्ये सर्व बाबींचा समावेश केलेला आहे की नाही याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. करोनासारख्या अज्ञात आजारांचा विम्यामध्ये समावेश करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते. मराठवाड्यासारख्या भूभागात ‘काही दुखलं खुपल तर गाठीशी थोडेफार पैसे असू द्यावेत.’ याचे प्रमाण वाढले आहे. करोनामुळे आरोग्यावर झालेले परिणाम-करोना हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यामुळे होणाऱ्या सर्वच गुंतागुंतीविषयी वैद्याकीय जगताला अचूक भाष्य करणे अवघड गेले. जसाजसा काळ जातो आहे तसे काही परिणाम दृग्गोचर होत आहेत. मानसिक आरोग्याशी निगडित नैराश्य आणि स्मरणशक्तीची समस्या याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. थकवा किंवा शक्तिहीनता याचे प्रमाणही काळजी करावी इतके वाढले आहे. थोड्याशा सर्दी खोकल्याच्या संसर्गाचा फुफ्फुसावर परिणाम होणे हीसुद्धा एक गंभीर बाब होऊन बसली आहे. अशा अनेक कारणांनी वैद्याकीय क्षेत्रावर चांगलाच परिणाम झालेला दिसून येतो आहे. विशेषत: मराठवाड्यामध्ये वरील कारणांमुळे रुग्णसंख्येत वाढ-भीतीमुळे आणि जागृतीमुळे डॉक्टरकडे जाण्याचा आणि लगेच जाण्याचा कल वाढल्यामुळे शहरातून फिजिशियनकडे आणि लहान गावांमधून डॉक्टरांकडे येणारी रुग्णसंख्या वाढलेली दिसते.

हेही वाचा – Marathwada Liberation Day : हवामान बदल हेच मराठवाड्यासमोरचे आव्हान

तालुका आणि त्यापेक्षा लहान गावांमध्ये डॉक्टरांच्या व्यवसायात वृद्धी झाली आहे. पूर्वी वैद्याकीय सेवा सुरू केली की जम बसण्यासाठी काही काळ जावा लागत असे, मात्र आपण पाहिले तर लक्षात येईल की मागील २-३ वर्षांत नवीन डॉक्टर मंडळी लवकर स्थिरावते आहे. मराठवाड्यातील अनेक लहान गावांमधून तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढली आहे. पॉलिक्लिनिक किंवा एकत्रित येऊन रुग्णालय काढणे याचे प्रमाणही वाढले आहे. समाजामधे जशी जागृती आली तशीच अनेक डॉक्टरांची मानसिकता पण बदललेली दिसते. लहान गावात, तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल काढण्याकरिता पूर्वी कोणी धजावत नसे, रुग्णसंख्या आणि आर्थिक गणित बसेल की नाही याची चिंता वाटत असल्याने गुंतवणूक करणे धोक्याचे वाटत असे. मात्र मागील काही काळात संपूर्ण मराठवाड्यामध्ये तालुका आणि त्यापेक्षा लहान गावात ३-४ डॉक्टरांनी एकत्र येऊन १०-१५ खाटांचे रुग्णालय काढल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. एकट्या फुलंब्रीसारख्या गावात ४-५ अशी रुग्णालये सेवा देताना दिसत आहेत. अशीच किंबहुना अधिक परिस्थिती / वृद्धी शहरांमधून दिसून येते. पाहता-पाहता संभाजीनगर शहरात ५० ते २०० खाटा असलेली अनेक रुग्णालये कार्यरत झाली आहेत. जालना आणि इतर शहरे याला अपवाद नाहीत. या बहुतांश रुग्णालयांमध्ये नर्सिंग होम किंवा एकट्याचे रुग्णालय असे प्रमाण नगण्यच असेल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रालासुद्धा एकत्रित येऊन काम करण्याची गरज लक्षात आली आहे.

एका विशिष्ट क्षेत्राचा डॉक्टर रुग्णसेवेकरिता अपुरा पडतो. त्यामुळे विचारविमर्श करून, सांघिक पद्धतीने काम केले पाहिजे हा धडा करोनाने डॉक्टरांना शिकवला. यामुळे विविध पूरक विषयाचे तज्ज्ञ एकत्र येणे आणि हॉस्पिटल काढणे हा कल दिसून येतो. याचाच एक चांगला परिणाम मोठ्या रुग्णालयांमधूनही दिसतो की रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर मंडळी एकमेकांशी लवकर संपर्क करतात, चर्चा करतात किंवा रेफर करतात. वैद्याकीय क्षेत्र ज्या गतीने वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे, त्यामधे रुग्ण सेवेकरिता विचारविमर्श, सांघिक काम अत्यावश्यक बनले आहे. याचा चांगला परिणाम रुग्णसेवेतील गुणवत्तेवर झाला आहे, हे नक्की!

हेही वाचा – हरवत गेलेले निवांतपण

मराठवाड्यातील आरोग्य सेवा आणि या क्षेत्राशी निगडित किंवा अवलंबून सर्वच क्षेत्रांमध्ये चांगले बदल मागील काळात झालेले दिसतात. आरोग्य जागृतीचे अनेक उपक्रम राबविण्याकरिता अनेक संस्था पुढे आल्या आहेत. मॅरेथॉनसारख्या उपक्रमांची वाढती लोकप्रियता दिसून येते आहे. फक्त उपचाराचा सल्ला देणारे डॉक्टर आता आरोग्यविषयक सल्ले देताना दिसतात. मागील काळात मराठवाड्यातील अनेक उद्याोजकांनी धर्मादाय कामाकरिता निधी देताना आरोग्याला प्राधान्य दिल्याचे प्रकर्षाने दिसते. रुग्णालयाकरिता निधी किंवा गरीब रुग्णांच्या उपचारासाठी निधी वाढलेला दिसतो. यासोबतच खासगी रुग्णालय प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. आणखी एक सकारात्मक बदल जाणवतो की करोनामुळे वैद्यकीय ज्ञानाला, असे संकट वैद्यकीयदृष्ट्या हाताळण्याच्या क्षमतेला आव्हान मिळाले. डॉक्टरांचा या काळात कस लागला. जगभर होणारे मृत्यू, टाळेबंदीचे भयावह चित्र, सर्वच क्षेत्रातील भांबावलेपणा यामुळे समाज आणि यंत्रणा गोंधळलेली होती. आजाराचे निदान हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक निर्णायक टप्पा असतो. डॉक्टरला निदान करता येत नसेल तर उपचार कठीण जातात. दिसणाऱ्या लक्षणांचे उपचार करणे ही अवस्था अस्वस्थता निर्माण करणारी असते. याचे काही दुष्परिणाम झाले आणि काही चांगलेसुद्धा घडले. शहरातील डॉक्टरांना रुग्णांचा विश्वास संपादन करण्याकरिता नव्याने कंबर कसावी लागली.

(लेखक हे डॉ. हेडगेवार रुग्णालयात वैद्याकीय संचालक असून ते श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष आहेत.)