गाव तसं छोटेखानी. लोकसंख्या दोन हजारांच्या घरातील. इतर गावांप्रमाणे शेतीवर उदरनिर्वाह करणारे ग्रामस्थ. अडचण पाण्याची. हातकणंगले तालुक्याला वारणा, पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा अशा बारमाही दुभत्या वाहणाऱ्या नद्यांचा पाणीपुरवठा. त्याला अपवाद तमदलगे. पाणीबाणी पाचवीला पुजली असतानाही या गावाने शेतीमध्ये केलेले नानाविध प्रयोग, पुरस्कार यावर वेगळी छाप पाडली आहे. हल्ली तर तमदलगे गावाची ओळख ही रोपवाटिकेचे गाव अशी झाली आहे. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेला बगीचा चांगलाच फुलवला आहे. त्यातील दर्जेदार रोपांच्या आधारे महाराष्ट्र, शेजारचे कर्नाटक यांसह काही राज्यांतील पिकांची हिरवाई डोलताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तमदलगे हे हातकणंगले तालुक्यातील उत्तर दिशेला असलेले गाव. पूर्वेकडचा शेजार शिरोळ तालुक्याचा. कोणत्याही सामान्य खेड्याप्रमाणेच गाव म्हणजे तमदलगे. जलसमृद्धी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील या गावाला पाणीटंचाईच्या झळा बसायच्या. खातेदार शेतकऱ्यांची संख्या २४१. पिकाऊ जमीन ६५० एकर. याच दुष्काळी गावाने कृषी क्षेत्रात नित्य काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतलेला. याचा प्रयोगशील वाटांनी अशी किमया केली की आता हे गाव कृषी क्षेत्रातील यशस्वी ‘प्रायोगिक भूमी’ ठरले आहे. प्रगतशील शेतीचा वस्तुपाठ घालणाऱ्या या गावात शासनाचे एकूण एक पुरस्कार चालत आले. देशाच्या अनेक राज्यांतील ऊसशेतीला ऊस रोपांचा पुरवठा करणारे गाव म्हणून लौकिक मिळविला आहे. आज या छोट्या गावामध्ये ८० हून अधिक छोट्या-मोठ्या रोपवाटिका कार्यरत आहेत. पाच-सहाशे लोकांना त्याच्या माध्यमातून रोजगार मिळतो आहेत. थोडी थोडकी नाही तर ४ ते ५ कोटी ऊस रोपे येथून दरमहा पुरविली जातात. या व्यवसायाने गावाचा चेहरामोहरा नि अर्थकारणच बदलून टाकले आहे.

हेही वाचा :लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता

रोपवाटिकेमध्ये या गावाचा हात धरावा असे गाव अन्यत्र आढळल्याचे उदाहरण नाही. इथल्या ८० रोपवाटिकांमुळे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील गावोगावची शेती फुलली आहे. त्यांनाही आधुनिक शेतीच्या अर्थकारणाचा फायदा झाला. गेल्या काही वर्षांमध्ये गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांना येथून ऊस रोपांचा पुरवठा होतो आहे. निर्धार गाठीशी बांधून नव्या वाटेने जायचे ठरवले की यशाचे सोपान सर करता येते याचा धांडोळा या तमदलगे गावातून घेता येतो.

कोल्हापूर जिल्ह्य़ावर वर्षाराणी प्रसन्न. मुबलक पावसामुळे पाण्याची कमतरता कधी जाणवलीच नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे राधानगरी धरणाची निर्मिती झाली. स्वातंत्र्योत्तर काळात काळम्मावाडी धरण झाले आणि अवघा जिल्हा जलसमृद्ध बनला. रानोमाळ पाणी पोहोचल्याने जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसू लागले हे भाग्य काही गावांच्या वाट्याला आले नाही. ती गावे पाण्याबाबत कमनशिबी ठरली. हातकणंगले-शिरोळ तालुक्यातील काही गावांचे वाळवंट झाले नसले तरी तेथे पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे.

आजूबाजूच्या भागात, शिवारात जलसमृद्धी नांदत असताना तमदलगे आणि शेजारच्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करावी लागण्याची वेळ अधून मधून येते. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पूर्वेकडील या दोन तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी. पण कोयना-वारणापासून ते कृष्णा पंचगंगा आणि दक्षिणेकडील दूधगंगा या नद्यांचे पाणी या दोन तालुक्यांत येऊन साचते. या भागाला महापुराची समस्या जाणवण्याचे कारणही हेच. बेसमेंटच्या या भागाने अनेकदा महापुराचा तडाखा अनुभवला आहे. जलवैभवाची उधळण होत असताना तमदलगेचा भाग मात्र कोरडा पाषाण राहिला. पाणी नसले म्हणून काय झाले; स्वस्थ थोडेच बसून चालणार आहे, असा निर्धार करून वेगळ्या कृषी प्रयोगांना हात घातला. गावात पाणी नसले तरी गावकऱ्यांचा बाणा लाथ मारेल तेथे पाणी आणण्याचा. या गावातील शेतकऱ्यांच्या जिद्दीतून मेहनतीचे पाणी ठिबकत राहिले. कठोर परिश्रम, नेटके नियोजन, नवतंत्रज्ञानाची जोड, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या पंचसूत्रीचा अवलंब करीत गावकऱ्यांनी माळरानाचे रूपांतर बारमाही फुलणाऱ्या हिरव्यागार शेतीमध्ये केले. शासकीय योजनांचा लाभ उठवण्याबाबत हे गाव सजग.

कोल्हापूर – सांगली मार्गावरून जाण्यासाठी अलीकडच्या काळात एक नवे बाह्यवळण लागते. ते याच तमदलगे गावावरून जाते. गाव कोरडवाहू. गावाच्या तिन्ही बाजूला १२०० एकराचा डोंगर. दुसऱ्या बाजूला ६५० एकर क्षेत्र पिकाऊ जमीन. १९७२ साली राज्यात तीव्र दुष्काळ पडलेला. या दुष्काळाच्या चटक्यांनी तमदलगे गाव होरपळून निघालेले. आपत्ती गावासाठी इष्टापत्ती ठरली. दुष्काळाचा पुढे सामना करायला लागू नये यासाठी याच सुमारास गावात मोठा पाझर तलाव बांधला गेला. कष्टाला गोड फळ आले. तलाव काठोकाठ भरला गेला. गावात पाण्याची बऱ्यापैकी सोय झाली. पावसाच्या लहरीवर इथल्या शेतीचे नशीब. ही बेभरवशाची स्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी राज्य शासनाच्या योजनेतील जलसंधारण कामांना गती दिली. पाणी नाही म्हणू शेती पिकत नाही ही प्रतिकूल परिस्थिती तमदलगेकरांच्या कृषी प्रगतीच्या आड आली नाही, किंबहुना ती येणार नाही अशाप्रकारे नियोजन केले. अडचणीवर मात करीत पुढे जायचे हा निसर्गाचा मंत्र हे गाव आचरणात आणते.

मेहनत घेतली आणि त्याला शाबासकीची थाप मिळाली की काम करण्याला आणखी उमेद मिळते. या गावाने याचाही सुखद अनुभव घेतला आहे. शेतीत प्रयोग करायचे. ते यशस्वी करायचे. हा ध्यास गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांना जडला आहे. तो कधीपासून याच्या खोलात गेले, की मिळणारी माहिती चकित करते. अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजच्या घडीपर्यंत. स्वातंत्र्यानंतर ४० कोटी लोकसंख्येच्या देशात प्रत्येकाला दोनवेळचे अन्न मिळणेही कठीण झालेले. ही दुर्धर स्थिती ओळखून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतीला प्रोत्साहन दिले. तसे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहनही केले. त्यांच्या आवाहनास साद देण्यासाठी तमदलगे गावातील एक जाणते शेतकरी पुढे आले. भीमगोंडा दादा पाटील या शेतकऱ्याने ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेऊन यशाची द्वाही फिरवली. त्यांच्या या पराक्रमाची नोंद घेत पंतप्रधानांनी पाटील यांना कृषिपंडित पुरस्कार देऊन सन्मानित केले. ट्रॅक्टर भेट मिळालेला त्यांचे छायाचित्र आजही संसदेच्या सभागृहात पाहायला मिळते. येथूनच सुरू झाली तमदलगेतील बहाद्दर शेतकऱ्यांची यशोगाथा.

हेही वाचा :लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती

शिरोळ – हातकणंगले परिसर भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर. शास्राोक्त पद्धतीने उत्पादन घेता यावे या उद्देशाने तमदलगेतील बाबुराव कचरे यांनी उच्च – आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त (हायटेक नर्सरी) रोपवाटिका सुरू केली. त्यांचे पुत्र शिवाजी यांनी हे काम तांत्रिकदृष्ट्या आणखी उंचीवर नेले. सध्या भाजीपाला क्षेत्रात कचरे रोपवाटिकेचा लौकिक अनेक राज्यांमध्ये आहे. कृषी क्षेत्रातील कार्याची नोंद शासनाने बाबुराव यांना कृषिभूषण तर शिवाजी यांना उद्यानपंडित हे पुरस्कार प्रदान केला आहे. कृषी क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणारी पिता-पुत्राची ही जोडी तशी विरळाच म्हणायची.

अलीकडे तर तमदलगेची ओळख रोपवाटिकेचे गाव म्हणून झाली आहे. खरेतर या व्यवसायाला पहिला बहर आला तो व्यापारी पेठ असलेल्या जयसिंगपूर या बाजारपेठेच्या शहरात. वाढत्या नागरीकरणामुळे रोपवाटिका वाढीचा केंद्रबिंदू शेजारच्या तमदलगेकडे सरकला. नावीण्याचा ध्यास असलेले तरुण या व्यवसायात उतरू लागले असून स्वकर्तृत्वाने स्थिरावत आहेत. गावात तब्बल ८० जण रोपवाटिकेच्या व्यवसायात आहे. लातूर, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरपासून ते बेळगावपर्यंत रोपे पुरविली जातात. तज्ज्ञ रोपांबाबत मार्गदर्शन करतो. म्हणूनच इथल्या रोपवाटिकेतील रोपांना मागणी आहे. दरमहा सुमारे ५ कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. खेरीज, ऊस, भाजीपाला व रोपवाटिका या तीन मुख्य शेती पिकाची वर्षांची उलाढाल सुमारे ६०- ७० कोटी आहे. दोन वर्षांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या या गावात संपन्न हिरवाई नांदते आहे. अलीकडे शेतकऱ्यांना ऊसशेती परवडेनाशी झालेली आहे. एकरी उत्पादकता घटते आहे. एका बाजूला उसाला भाव वाढवून मिळत असला तरी उत्पादकता घटल्याने शेतकरी तोट्यात आहे. हाच धागा पकडून येथील एक प्रयोगशील शेतकरी संग्रामसिंह देसाई यांनी आपल्या दहा एकरातील सगळा ऊस बंद केला. त्यांनी याच क्षेत्रात देशी केळी, पपई, भोपळा, हिरवी मिरची, आळू अशी पिके घेतल्याने शेतीने कूस बदलली आहे. त्यांना उसापेक्षा दोन ते अडीच पट जादा पैसे मिळू लागले आहेत. रोपवाटिका, भाजीपाला पिके, पेरू आणि इतर पिके, शेतीतील इतर प्रयोग, दुग्ध व्यवसायामुळे या गावाने जुनी वल्कले सोडून नवे रंगरूप परिधान केले आहे.

हेही वाचा :‘अपघाती’ पंतप्रधान; निश्चयी प्रधानसेवक!

शेती प्रयोग आणि पुरस्कार !

आजूबाजूच्या गावात केळीचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी गावात केळी रायपनिंग चेंबर्सची उभारणी सहकारी तत्त्वावर केली आहे. यासाठी राजकुमार आडमुठे या तरुणाने पुढाकार घेतला. त्यांनाही शासनाने उद्यानपंडित पुरस्काराने सन्मानित केले आहे. याचबरोबर जिजामाता पुरस्कार येथील श्रीमंती वैयजंतीमाला वझे या शेतकरी महिलेला दिला आहे. याच गावाचे रावसाहेब पुजारी हे कृषिपत्रकारितेच्या माध्यमातून गेली ३०-३५ वर्षे शेतकऱ्यांच्या जागल्याचे काम करतात. त्यांनाही शासनाने कृषिपत्रकारितेचा वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.