डॉ. गुरूनाथ थोंटे

दरवर्षी आपण जागतिक अन्न दिवस साजरा करतो. अन्न सकस व स्वच्छ असावे. त्याचे सेवन ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. अन्नधान्य व फळ/भाजीपाला उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीयांसाठी ही मान उंचावणारी बाब आहे. मात्र त्यातील ९७ टक्के उत्पादन विषारी आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. विषारी अन्न हे दुर्धर आजाराचे स्रोत आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

हृदयविकार तज्ज्ञ हृदयविकाराने ग्रस्त आहेत. मधुमेह त मधुमेहाने हैराण आहेत. कर्करोग तज्ञ कॅन्सरने बाधित आहेत. नेत्रतज्ज्ञ नेत्ररोगाने बेजार आहेत. मनोविकार तज्ज्ञ मनोविकाराने परेशान आहेत. नाक, कान, घसा तज्ज्ञ त्यासंबंधीच्या विकाराने त्रस्त आहेत. स्वत:चा आजार हे तज्ज्ञ दुरुस्त करू शकत नाहीत. याचा अर्थ ते रुग्णास देत असलेले औषध जुजबी आहे. केवळ परिणामांवर उपचार करत आहेत. रोगामागील मुळाला हात घालण्याची उपचार पद्धती खूप कमी मंद गतीने सुरू आहे. दिवसेंदिवस दुरापास्त होत चाललेले सकस, विषमुक्त अन्न यातून कमी होत चाललेली रोग प्रतिकार शक्ती, नवे विकार हे यामागचे खरे कारण आहे.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा

सन १९५० मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन ५१ मिलियन होते. ते त्या वेळी पूर्णत: सेंद्रिय स्वरूपाचे होते, म्हणजे शंभर टक्के. सन २०२१ मध्ये आपले अन्नधान्य उत्पादन आपण खूप वाढवले. अगदी ते ३१४ मिलियन टन झाले. पण यातील सेंद्रिय पद्धतीचे अन्नधान्य फक्त तीन टक्के आहे. सन १९५० मध्ये भारताचे फळ व भाजीपाला उत्पादन २५ मिलियन टन होते. आणि हे संपूर्ण उत्पादन सेंद्रिय होते. सन २०२१ मध्ये हेच फळ व भाजीपाला उत्पादन तब्बल ३३३ मिलियन टनांवर पोहोचले आहे. मात्र त्यापैकी केवळ पुन्हा ३ टक्केच उत्पादन हे सेंद्रिय स्वरूपाचे आहे. सन १९५० मध्ये दुधाचे उत्पादन १७ मिलियन टन होते. ते पूर्णत: देशी गाईचे होते. सन २०२१ मध्ये ते २१० मिलियन टन झाले. मात्र आता त्यातील देशी गाईचे १३६.५ व संकरित गाईचे ५९.५ मिलियन टन झाले. सन १९५० मध्ये तेलबिया उत्पादन पाच मिलियन टन होते. ते पूर्णता सेंद्रिय होते. सन २०२१ मध्ये ते ३८ मिलियन टन झाले मात्र त्यातील सेंद्रिय उत्पादनांचा वाटा केवळ तीन टक्के आहे.

सारांश सध्याचा ९७ टक्के आहार हा रसायन मिश्रीत आहे. कृषी रसायनाचा एक गुणधर्म आहे ते कणाकणाने शरीरात साचतात. सर्वसाधारणपणे त्याज्य पदार्थ मलमूत्र विसर्जनाद्वारे बाहेर पडतात. तसेच वान्तीद्वारे बाहेर फेकले जातात. मात्र कृषी रसायनाचे अंश कणाकणाने शरीरात साचून कॅन्सरयुक्त पेशीसाठी अनुकूलता निर्माण करतात. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी करतात. साधारणपणे कॅन्सरचे निदान आठ ते दहा वर्षांनी होते. शेतात वापरली जाणारी औषधेही मानवाच्या गुणसूत्रांमध्ये बदल घडून आणतात. जसे अनुस्फोटातून निर्माण रेडिओअ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्य करतात. यामुळे अमेरिकेत दरवर्षी जवळजवळ १५ टक्के बालक मानसिक अपंगत्व घेऊन जन्माला येतात. या रसायनामुळे अमेरिकेतील मुलांमधील नपुंसकतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. म्हणून कीटकनाशकाचा वापर अणुबॉम्बच्या वापरापेक्षा भयानक आहे.

सन १९६० ते ७० च्या दशकात हरितक्रांतीची सुरुवात झाली. त्याचे आधारस्तंभ संकरित वाण, सिंचन व कृषी रसायन होते. रॅचेल कार्सन ही अमेरिकन महिला. तिने १९६२ मध्ये कृषी रसायनाचे दुष्परिणाम जगासमोर आणले. भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी तिकडे साफ दुर्लक्ष केले. आपल्याकडे सुपीक जमिनी, सूर्यप्रकाशाची भरपूर उपलब्धता होती. त्यांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे होते. जमिनीची कार्यक्षमता सूक्ष्मजीवाणूच्या संख्येवर अवलंबून असते. कृषी संशोधन जिवाणूच्या संख्यात्मक वाढीवर आवश्यक होते. तसेच संशोधनाची दिशा जमिनीतील नैसर्गिक हवा व जल व्यवस्थापनावरही केंद्रित होणे काळाची गरज होती. अशा संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित शेतीतून वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागली असती.भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी युरोपियन कृषी तंत्रज्ञान आयात केले. ते शीतकटिबंधीय प्रदेशासाठी उपयुक्त होते. आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतो. आपल्याकडे ३६५ दिवसांपैकी तीनशे दिवस सूर्यप्रकाश असतो. सूर्यप्रकाशाचा पीक उत्पादनात २० टक्के वाटा असतो. सूर्यप्रकाशाच्या कार्यक्षम वापरामुळे करडईत २० टक्के वाढ होऊ शकते असं अमेरिकन संशोधन सांगते. मका, सूर्यफूल ही पिकेसुद्धा सूर्यप्रकाशास सहनशील आहेत. त्याचा कार्यक्षम वापर केल्यास या दोन्ही पिकात उत्पादन वाढ होऊ शकते. ऊस, ज्वारी, बाजरी, इतर सी-४ भरडधान्यात सूर्यप्रकाशाचा वापर करून उत्पादनात वाढ होऊ शकते. पानातील क्लोरोप्लास्टने शोषलेला कर्ब वायू, मुळावाटे शोषून घेतलेले पाणी यांची सूर्यप्रकाशाच्या उपस्थित कर्बदकाची निर्मिती होते. यामुळे कायिक व पुनरुत्पादन क्षमता वाढत असते. याचा अर्थ सूर्यप्रकाश वापराची कार्यक्षमता वाढवली तर एकदल पीक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.

हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडची कार्यक्षमता वाढूनही पिकाचे उत्पादन वाढले जाऊ शकते. अशा प्रकारचे प्रयोग हरितगृहातील पिकात घेण्यात आलेले आहेत. डॉ. ए. डी. कर्वे हे ६० सेंटिमीटर उंचीपर्यंत पिकाभोवती पोती बांधतात. उष्णतेने हलका होऊन वर जाणारा कार्बन डाय-ऑक्साइड त्यामुळे जड होऊन पिकाच्या भोवतीच राहतो व पिकाला आपोआप मिळतो. आपल्या उष्णकटिबंधात हरितगृहापेक्षाही कार्बन डाय-ऑक्साइड जास्त मिळण्यासाठी ही पद्धत चांगली आहे. पण शेताच्या छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांना हे तंत्र वापरता येते. मोठय़ा शेतांना तितक्या परिणामकारकपणे ते वापरता येत नाही. भारतात ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा प्रकारचे संशोधन करून विविध पिकामध्ये तंत्रज्ञान विकसित केले तर बदलत्या वातावरणात त्याचा फायदा होऊ शकतो. त्या दिशेने संशोधन झाले तर संकरित वाण, रासायनिक खते व औषधाविना कृषी उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.
हवामानात अचानकपणे झालेल्या बदलामुळे आपण संपून जाणार असा धोका वाटला तर कित्येकदा झाडे फुलावर येतात. उत्पादनाची अवस्था लवकरात आणली जाते. त्या माध्यमातून संरक्षण केलं जातं व पर्यायाने वंशसातत्यही राखले जाते. बराच काळ टिकणार असेल तर त्या वातावरणाला योग्य अशी शरीर रचना केली जाते. त्यासाठी प्रत्यक्ष गुणसूत्रांमध्येच निसर्गाच्या प्रयोगशाळेत बदल घडवून आणले जातात. यालाच अनुकूलन असेही म्हणतात. अशा प्रकारचे संशोधन पीक उत्पादनात प्रतिकूल स्थितीही स्थिरता आणू शकते.

सर्व वनस्पतीसाठी सौरऊर्जा हा प्राणशक्ती जागृत करणारा व नियंत्रण करणारा घटक आहे. श्वसनाच्यावेळी तो प्रत्यक्ष प्राणवायू बरोबर शरीरात शिरतो. या प्राणशक्तीच्या साह्याने शरीरात चयापचयाच्या क्रिया घडवून आणल्या जातात. या सौरऊर्जेच्या सहाय्याने शरीरात मुख्यत: संरक्षणासाठीच्या क्रिया घडवून आणल्या जातात. कृषी रसायनाऐवजी अशा प्रकारच्या सरशणात्मक क्रियांवर संशोधन झाले असते तर सेंद्रिय उत्पादनात देशाने जगावर राज्य केले असते.

Story img Loader