|| डॉ. आशुतोष जावडेकर

आज जागतिक नृत्य दिन त्यानिमित्ताने एक खास ललित लेख

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

माझ्या एक पेशन्ट आहेत.. परवा त्यांनी माझं एक गाणं यूटय़ूबवर बघून त्यावर भरतनाटय़म शैलीत नृत्य बसवलं. मला ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलं. शेवटी त्यात त्यांनी आठवण करून दिली होती, की २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन आहे. मला असा काही दिवस असतो याची कल्पनाच नव्हती. कॉलेजमध्ये असताना आणि आत्ताही व्हॅलेंटाइन दिन हाच मला मोलाचा वाटत आलेला आहे (या वाक्याअंती एक स्माईली आहे!). खेरीज नृत्य म्हणजे काही माझा प्रांतही नाही. मध्ये एकदा कार्यक्रमात मी आणि कीर्ती किल्लेदार गात असताना मी सहज कीर्तीच्या दिशेने हात पुढे केला आणि तिनेही गाता गाता माझा हात धरत गिरकी घेतली. ते इतकं सहज आणि मस्त झालं की प्रेक्षकांना खूप आवडलं. आणि मग मागाहून मित्र जसे आपली हक्काने खेचतात, तसं एकाने म्हटलंच की आशू, आता काय तू नाचणारदेखील आहेस का? नंतर मनोमन आठवला मी पहिल्यांदा जाणत्या वयात मनातले र्निबध तोडत-सोडत कॉलेजमध्ये बिनधास्त केलेला नाच.

असेल सेकंड ईअर. सगळे गॅदरिंगच्या ऑर्केस्ट्रामध्ये नाच करत होते. मी उभा आहे नुसता, तालाचा आनंद घेत, आसपास बघत. मग कनक येतो शेजारी आणि खूण करतो नाच म्हणून. मी मानेने नाही सांगतो. मराठी मध्यमवर्गीय मुलं  नाचत नाहीत. मराठी मध्यमवर्गीय मुलं आनंदही बेतानेच घेतात.. तो पुन्हा आग्रह करतो. म्हणतो, मला फॉलो कर. मी नाचतोय तसं नाच! मग मी सोडतो तो मराठी काठ, धरतो पाऊल तालावर. बघता बघता बेछूट नाचतो.. थांबत नाही.. दमलो तरी थांबत नाही. सगळं शरीर मोकळं होतं. मन मस्त उडय़ा मारत राहतं. छोटय़ा छोटय़ा अशा साध्या नाचाच्या आनंदाला आपण उगाच इतके वर्षे पारखे राहिलो असंही मग मला वाटत राहतं..

स्वत: नाचू किंवा नाही, पण आपल्याला रसिक म्हणून मात्र नृत्य प्रत्यही भेटतं. तुम्हाला कळत नसेल त्यातलं काहीही, तरी उत्तम नृत्य तुम्हाला साद घालतंच. अभिजात नृत्य तर वेगळंच, पण साध्या हिंदी चित्रपटातलं नृत्य वेगळं आणि मस्त असेल तर आपल्याला त्याचं वेगळेपण कळतं. सरोज खान यांची शैली मग नकळत कळते आपल्यालाही हळूहळू. मला आठवतंय, ‘कुछ कुछ होता है’ बघताना पहिल्यांदा ठसल्या त्यामधल्या फ्लुरोसंट रंगाच्या कपडय़ांच्या फॅशन्स आणि मग त्याच्या खालोखाल फराह खानने बसवलेल्या मस्त डान्स स्टेप्स. त्या अगदी वेगळ्या होत्या. ताजं वारं प्यायलेल्या. तरुण आणि निर्विषही. फराह खानच्या अनेक स्टेप्स सहज साध्या आणि तरी अगदी सुंदर असतात. काही नृत्यदिग्दर्शकांच्या स्टेप्स जशा उघड कामुक असतात तसं करायची तिला गरज वाटत नसावी. एक हलकं झुळझुळत प्रेमाचं गाणं फराह खानच्या स्टेप्समध्ये असतं. आणि दुसरा हा हृतिक रोशन.

मला त्याचा अभिनय फार आवडत नाही, पण त्याला नृत्य उत्तम करता येत. पौरुषाने तटतटलेलं, पण तरी गरजेला अगदी नाजूक होऊ  शकणार असं या हृतिकचं नृत्यसंवेदन आहे. अगदी नुकतं  ‘मोहेंजोदारो’ चित्रपटातलं ‘सिंधू माँ’ हे गाणं पाहिलं. त्याचं नृत्यदिग्दर्शन अगदी अफाट आहे. आदिम संगीताला साजेसं असं सुरुवातीला हा हृतिक नाचतो आणि मग क्रमाक्रमाने त्याचं नृत्य जणू सिव्हिलिज्ड होत राहतं. मला रेहमानचं ते गाणं गाणं म्हणून आवडतंच, पण केवळ तो नाच बघण्यासाठीही मी कितीदा तरी यूटय़ूबवर ते गाणं बघितलं आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये नृत्य जसं भेटलं, तसं मला पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास करतानाही कडेकडेने नृत्य भेटत राहिलं. मायकेल जॅक्सनचा ‘मूनवॉक’ हा पदन्यास बघितल्यावर त्याचा निर्माता मित्र उद्गारलेला, ‘मायकेल अंतराळात आला आणि परत आलाच नाही.’ पश्चिमेच्या अनेक गायकांना असं त्यांच्या खास शैलीत नृत्य करतानाही मी पाहिलं आणि मग वाटलं, की आपण नृत्याला इतकं पारखं का केलंय? नृत्याकडे बघण्याची निकोप नजर आपल्याकडे कमी प्रमाणात दिसते. नृत्याच्या अनुषंगाने येणारे ‘नाच’, ‘नाच्या’, ‘नाचरा’ असे मराठी शब्द नर्तनाविषयी काही खास आस्था दाखवत नाहीत. आणि खरं तर अभिजात नृत्याची भारतामध्ये केवढी मोठी परंपरा आहे. मध्यंतरी जानकी रंगराजन यांचा ‘द्रौपदी’ हा बॅले मी बघितलेला. भरतनाटय़मचं अभिजात वळण तर त्यात होतंच पण कथानक हे अतिशय नवंकोरं, आजच्या युगाचं असं होतं. प्रोतिमा बेदींचं आत्मचरित्र वाचताना जाणवत राहिलं, की ओडिसी नृत्याला प्रोतिमाने तिचा स्वत:चा असा एक बिनधास्त, उन्मुक्त असा स्पर्श नकळत दिला असणार. माझा एक मित्र म्हणतो की, ‘नाचातलं मला काही कळत नाही. पण चांगल्या नृत्यांगना मला अर्थातच आवडतात.’ आणि मग तो एक डोळा मारतो शेवटी. लावण्य असतंच नृत्यासोबत. शकीराचं ‘वाका वाका’ बघताना मला नेहमी वाटतं, की हरणाचे पाय जन्माला घेऊन ही मुलगी आली आहे. ‘हीप्स डोन्ट लाय’ म्हणत ती नाचते तेव्हा होतंच आम्हा पुरुषांच्या काळजाचं पाणी पाणी! पण तेवढंच नसतं नृत्य-लावण्य म्हणजे! एक वेगळ्या जातकुळीची बुद्धिमत्ता ज्या नर्तकांमध्ये असते तो ती चौकट – मग ती कथ्थकची असो, नाही तर हिप हॉपची – थोडी विस्तारतो आणि मग सगळं चित्र अजून गहिरं होतं, अजून देखणं होतं..

सहज टेकडीवर चालताना कधी शांत मन असतं, सगळे नाच मागे पडतात आणि मग एखादा मोर समोर आला की मला पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ या कादंबरीतला मोर आठवतो. रेग्यांनी म्हटलंय की मोराला नाचता येत नाही. एक पाय उचलतो, तोल जातो, तो सावरायला दुसरा पाय तो मोर उचलतो असं अ‍ॅड इन्फिनिटीम.. रेग्यांनी सुंदरच लिहिलंय ते..  माझ्या मनातला मोर मात्र वेगळा आहे. तो उगाच पाय उचलत नाही. ढगांखाली व्याकुळ होऊन उभा असतो आणि सर आली पावसाची, की शांतपणे दु:ख झटकावं तसा पिसांना झटकतो आणि मग अखेर सगळा ग्रीष्मकालीन तप्त भूतकाळ मागे टाकत सुंदर कमान असलेला पिसारा नव्या उमेदीने फुलवतो. शांतच उभा असतो खरा.. पण मान अशी हलवतो, की ते सगळं दृश्य स्थितीशील असूनही नृत्यासारखं बनतं.. मोकळं मोकळं करणारं..

Story img Loader