येणार.. येणार.. येणार.. म्हणता म्हणता अखेर ‘अॅपल’चे आयवॉच सोमवारी ब्रिटनच्या बाजारात उपलब्ध होणार आहे. ब्रिटनमधील तमाम प्रसार माध्यमांना अॅपल कंपनीतर्फे ९ मार्च रोजी होणाऱ्या ‘िस्प्रग फॉरवर्ड’ या कार्यक्रमाची निमंत्रणे मिळाली आहेत. पण हा कार्यक्रम नेमका कसला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही या निमित्ताने आयवॉच बाजारात दाखल होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सप्टेंबर, २०१४मध्ये अॅपलने ‘आयफोन ६’, ‘आयफोन ६ प्लस’ आणि ‘आयवॉच’ या उपकरणांचे अधिकृत अनावरण केले होते. तेव्हाच कंपनीने २०१५च्या सुरुवातीला आयवॉच वापरकर्त्यांच्या मनगटावर येईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आयवॉचच्या विकासासाठी अनेक गोष्टी घडल्या. यात प्रामुख्याने म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जगातील अॅपलच्या अॅप विकासकांसाठी कंपनीने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. तेथे आयवॉचवर वापरता येतील अशा अॅप्सची निर्मिती करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या कार्यशाळेत तब्बल एक लाख अॅप्स विकसित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनीही आयवॉच हे अमेरिकन नागरिकांसाठी सर्वप्रथम बाजारात येणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर ब्रिटनमधील प्रसार माध्यमांच्या हाती पडलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रणामुळे तर आयवॉच बाजारात दाखल होणार याची खात्रीच मॅकवर्ल्डमध्ये पटली आहे. सध्या अॅपलकडे आयवॉचव्यतिरिक्त असे कोणतेही उत्पादन नाही ज्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे आणि ते बाजारात येण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
खरे तर अॅपलने बाजारात यापूर्वीच दाखल झालेल्या स्मार्टवॉचनंतर त्यांचे घडय़ाळ बाजारात आणले आहे. तरीही आयवॉचबद्दल लोकांना मोठी उत्सुकता आहे. अॅपलचे सह संस्थापक स्टिव्ह वॉझनिक यांनी बीबीसीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये बाजारात स्मार्टवॉच उपलब्ध असले तरी आम्ही बाजारात आणत असलेले वॉच हे इतरांपेक्षा खूप वेगळे असून त्या घडय़ाळाचा प्रत्येक भाग कलात्मकरीत्या तयार केला आहे. हे घडय़ाळ म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्यावर ’वॉच’ ठेवणारे आहे. म्हणजे यामध्ये देण्यात आलेल्या सुविधांमुळे आपल्या आरोग्यावर करडी नजर राहतेच याशिवाय आपली अनेक कामे हे घडय़ाळ करू शकणार आहे. अॅपल वॉच, अॅपल स्पोर्ट्स वॉच आणि वॉच एडिशन अशा तीन प्रकारात स्मार्ट घडय़ाळांचे अनावरण करण्यात आले होते. वॉच एडिशनमध्ये १८ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा प्रकार भारतात सर्वाधिक चालेल, असा विश्वास कंपनीने यापूर्वी व्यक्त केला होता. हे सोनेरी मुलाम्याचे घडय़ाळ ३८ एमएम आणि ४२ एमएम आकारात उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा