राजकारणावर प्रेम करणारा, पण प्रेमात कधीही राजकारण न आणणारा, कारभारी.. लय भारी .. ! ‘कारभारी लय भारी’ या ‘झी मराठी’वरच्या नवीन मालिकेचा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून या नव्या मालिके बद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिके तील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकाराची उभं राहण्याची आणि भाषणाची स्टाइल पाहता ही मालिका राजकारणावर भाष्य करणारी आहे असे वाटते. या मालिकेचं लेखन तेजपाल वाघने केलं असून किरण दळवी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. तर ‘देवमाणूस’ या मालिकेचे संवाद लेखक विशाल कदम यांनीच ‘कारभारी लय भारी’ या मालिकेचेदेखील संवाद लिहिले आहेत. ‘डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सुरी, आला आला कारभारी लय भारी..’, हे या मालिके चं शीर्षकगीतही नुकतंच प्रसारित झालं असून त्यालाही लोकांची पसंती मिळत आहे. या शीर्षकगीताला पंकज पडघन यांनी संगीत दिलं असून, शाहीर देवानंद माळी यांनी हे गीत गायलं आहे. तसेच या शीर्षकगीताचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सुलोचना चव्हाणांचे चिरंजीव प्रसिद्ध ढोलकी वादक विजय चव्हाण यांनी या शीर्षकगीताची तालवाद्ये वाजवली आहेत. याच वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिके तून विक्याच्या भूमिके त प्रसिद्ध झालेला अभिनेता निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाते ही जोडी या मालिके त मुख्य भूमिके त दिसणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका २ नोव्हेंबरपासून ‘कारभारी लय भारी’ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. आपल्या झी मराठी वाहिनीवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा