‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्यातर्फे आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या मंथनातील चौथे चर्चासत्र २३ आणि २४ जून रोजी मुंबईत हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे पार पडले. ‘उद्योगाचे आव्हान’ असा या चर्चासत्राचा विषय होता. औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्र आज देशात कोणत्या पायरीवर आहे.. राज्याचे या आघाडीवरील गतवैभव आणि सद्य: वास्तव यावर सरकारचा पक्ष आणि उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधित्व
राज्यातील महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांवर चर्चासत्र घडवून आणण्याचा ‘लोकसत्ता’चा उपक्रम स्तुत्य आहे. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर असताना राज्य मागे पडले किंवा पिछाडीवर गेले असा प्रचार किंवा टीका मुद्दामहूनच केली जाते. ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमामुळे उद्योग क्षेत्रातील वस्तुस्थिती जनतेसमोर येईल.
रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून उद्योजक आणि उद्योग क्षेत्राला मदत करण्याची राज्याची भूमिकाच आहे. उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच, पण त्यासाठी ‘लोकसत्ता’ने पुढाकार घेतल्यास त्याला सरकार सर्वतोपरी सहकार्य करील.
नारायण राणे, उद्योगमंत्री
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा