|| दिल्लीवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ड्रिमगर्ल’ स्वत:च्याच प्रेमस्वप्नात दिसते बहुधा. इतकी वर्ष राजकारणात घालवल्यावर तरी जमिनीवर यावं; पण ते काही हेमामालिनी यांना जमलेलं नाही. भाजपमध्ये त्यांना कोणी दुसऱ्या फळीतील नेत्याही मानत नाही. पक्षविस्तारात त्यांचं योगदान काय हे कोणा कार्यकर्त्यांलाही सांगता येणार नाही. भाजपमध्ये अनेक जण पक्षाच्या आणि आता मोदींच्या भरवशावर निवडणूकजिंकतात. हेमामालिनी त्यातल्याच एक. मथुरेच्या या खासदार लोकसभेत एखादा प्रश्न विचारतात. तोही खूप महत्त्वाचा असतो असं नाही. दिवसभर सभागृहात शांत बसून राहणं हेच त्यांचं प्रमुख काम. नित्यनियमाने ते होतं राहतं; पण सध्या बसंतीचा टांगा उधळलेला दिसतो. ‘चुटकीसरशी मी मुख्यमंत्री होऊ शकते’ हे त्यांचं वाक्य. त्यांना वाटतं मुख्यमंत्री होणं इतकं सोपं आहे; पण त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छाच नाही. कारण? ते फारच मजेशीर आहे. ‘मला कुठल्या बंधनात अडकायचं नाही’! मुख्यमंत्रिपदाची बेडी घालून घेण्याकरिता भलेभले गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले असताना हेमामालिनींना त्यांची ‘फ्री मुव्हमेंट’ प्यारी! असो. पण समजा झाल्याच, तर त्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होतील? सध्या दिल्लीतील माध्यमवर्तुळात याची फारच विनोदी चर्चा सुरू असते. तर त्यातला एक पर्याय दिला जातो उत्तर प्रदेशचा. म्हणजे उद्या योगी आदित्यनाथ डोईजड झालेच तर हेमामालिनी यांचा विचार होऊ शकतो. त्या मुंबईत राहतात. तेथून त्यांनी त्यांच्या पक्षभगिनी पंकजाताईंकडं बघितलं असतं, तरी बंधनाचं महत्त्व कळलं असतं.

मला का नाही बोलावलं?

लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे राहुल गांधींच्या शेजारी बसतात. ते चांगले प्रॉम्प्टर आहेत. राहुलनी भाषणात एखादा शब्द खाल्ला, की ज्योतिरादित्य लगेच प्रॉम्प्ट करतात. फक्त राहुलच नाही, आजूबाजूला असलेल्या खासदारांनाही मुद्दा राहिला असेल तर लक्षात आणून देतात. अविश्वास ठरावाच्या भाषणात राष्ट्रवादीचे खासदार तारीक अन्वर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याचा मुद्दा विसरलेले होते. ज्योतिरादित्य अन्वर यांना म्हणाले, आंध्रचा मुद्दा घ्या!.. परवा मात्र ज्योतिरादित्य नितीन गडकरींवर नाराज झाले होते. मध्य प्रदेशमधल्या एका रस्त्याच्या लोकार्पण समारंभाला त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. सगळ्यांना बोलावलंत, मला का नाही बोलावलंत?.. ज्योतिरादित्यांचा गडकरींना सवाल. या समारंभाला खरं तर त्यांना बोलवायला हवं होतं. परिवहन खात्याकडून लेखी पत्र पाठवायचं राहून गेलं. ज्योतिरादित्यांनी थेट हक्कभंगाचाच प्रस्ताव दिला. लोकसभेत काँग्रेस खासदारांनी हा मुद्दा उपस्थित करून सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. गडकरी सभागृहात होते. लोकप्रतिनिधीचा अहं दुखावला गेला, आता काय करणार? मामला गंभीर बनतोय हे चाणाक्ष गडकरींच्या लक्षात आलं. कशाला विनाकारण वाद वाढवा असं गडकरींना वाटलं असावं. ‘अधिकाऱ्यांनी तुम्हाला संपर्क केला होता, पण त्यांनी तुम्हाला रीतसर निमंत्रणपत्र पाठवायला हवं होतं. शिलान्यासावर तुमचं नावंही कोरायला हवं होतं,’ असं म्हणत गडकरी माफी मागून मोकळे झाले! या माफीनं काँग्रेसजनांचं समाधान झालं नाही, पण सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवून आपल्या मंत्र्याच्या माफीचं स्वागत केलं.

श्रीमती आणि मिस

भाजपमध्ये सदासर्वदा शाब्दिक कोटय़ा कोण करतं?.. या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. अर्थातच मोदी. मोदींचं कुठलंही भाषण ऐका. वाक्यावाक्याला शब्दांचे खेळ ऐकायला मिळतील. त्यांच्या भाषणातील संदर्भ कधी कधी चुकतात हा भाग वेगळा! पण ते मोदी असल्यानं निभावून नेतात. जनताही मोदींच्या निभावून नेण्याकडं फारसं लक्ष देत नाहीत. मोदी जे करतात ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंचं उदाहरण घ्या. त्यांनी राज्यसभेत शाब्दिक कोटी केली खरी, पण त्यांना मोदींसारखं निभावून न्यायला जमलंच नाही. मग झाली पंचाईत. शून्य प्रहरात तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांना कुठलासा मुद्दा उपस्थित करायचा होता. सभापतींनी त्यांचं नाव पुकारलं, ‘मिसेस डोला सेन’. सेन अविवाहित आहेत. त्यांनी लगेच नायडूंना चूक लक्षात आणून दिली. त्या म्हणाल्या, ‘मी मिसेस नाही, मिस आहे’.. त्यावर नायडूंना शाब्दिक कोटी करायची हुक्की आली. ते इंग्रजीत म्हणाले, ‘वी विल नेव्हर मिस यू.’ सेन यांचा चेहरा एकदम लाल झाला. त्यांनी रागाला आवर घालत नायडूंना सांगितलं, हे दुसऱ्यांदा होतंय बरं का.. सेन यांच्या आविर्भावाने नायडूंना काय करावं समजेना. त्यांनी विषय सोडून दिला आणि सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं. नायडू नंतर मात्र कोटी करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. भाजप खासदार सरोज पांडे यांचे नाव त्यांनी श्रीमती सरोज पांडे असं उच्चारलं, पण लगेचच त्यांनी ‘मिस’ अशी दुरुस्ती करून शब्दांचा मार वाचवला.

बंदर पे चर्चा

ल्युटन्स दिल्लीमध्ये बडी बडी मंडळी राहतात. त्यांना त्रास देण्याची हिंमत कोण करेल का? आपले पूर्वज हे धाडस करू शकतात. त्यांनी खासदार, मंत्री, उपराष्ट्रपतींचीही तमा बाळगलेली नाही. जेव्हा हवं तेव्हा माकडं त्यांच्या घरी येतात, पाहुणचार घेतात आणि जातात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. नाही तर आपण.. एखाद्या मंत्र्यांच्या घरासमोर मिनिटभर जरी थांबलो तरी सुरक्षारक्षक हाकलून देतात. या माकडांनी व्हीआयपी लोकांना इतका त्रास दिलाय की न राहवून राज्यसभेत एका खासदाराने ‘बंदर पे चर्चा’ घडवून आणली. त्यात थेट सभापतींनी ‘सहभाग’ घेतला. एका खासदाराने गाऱ्हाणं मांडलं की, त्याला बैठकीला जायचं होतं; पण माकडानं त्याच्यावर हल्ला केला. हल्ला परतवून लावेपर्यंत बैठक संपली. माकडं एका खासदाराच्या घरात शिरली आणि त्यांनी कपडेच उचलून नेले. ही सगळी चर्चा रंगात आली असताना सभापती व्यंकय्या नायडूंनी अनुभव कथन केलं. नायडूंच्या निवासस्थानीही माकडं ठाण मांडून बसतात. त्यांनाही माकडं सतावतात. त्यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री गंभीर होऊन म्हणाले, माकडांचं काही तरी केलं पाहिजे!.. माकडांचाच काय संसदेत कावळ्यांचाही त्रास असतो. संसद भवनात कावळे भटकत असतात. कधी डोक्यावरून, कधी कानाशेजारून भर्रकन जातात आणि भिंतींवर जाऊन बसतात. या कावळ्यांवरही चर्चा रंगली होती. पत्रकार गमतीने म्हणाला, हे कावळे म्हणजे अतृप्त आत्मे असावेत. ज्यांना मंत्री बनता आलं नाही, ज्यांची खासदार होण्याची मनीषा पूर्ण झाली नाही, त्यांचा पुढचा जन्म कावळ्यात झालाय.. संसदेत फक्त विधेयकावरच चर्चा होते असं नाही.