लोकसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा रंगलेली होती. काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी सडेतोड युक्तिवाद केला. भाजपच्या वतीने दिल्लीच्या खासदार आणि वकील मीनाक्षी लेखी यांनी कुराणातील वचनांचा (आयत) आधार घेत तिहेरी तलाक हा गुन्हा कसा ठरतो हे पटवून दिलं. फारसी-उर्दू शेर सांगत लेखींनी उत्तम भाषण केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सलीम नेहमीच खुसखुशीत बोलतात. त्यांच्या बोलण्यात गांभीर्य असतं. पण, ज्या आविर्भावात ते बोलतात तो पाहण्याजोगा असतो. भाजपचे मुस्लीम खासदार मुख्तार अब्बास नक्वीही बोलले. मधू दंडवते तलाकवर काय म्हणाले होते याचा इंगजी परिच्छेद नक्वी यांनी वाचून दाखवला आणि पुन्हा हिंदीत भाषण सुरू केलं. मुल्ला-मौलवींच्या कडव्या धर्माधतेवर टीका करताना त्यांनी ‘कठमुल्ला’ असा शब्दप्रयोग केला. हा शब्द ऐकताच तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय एकदम खवळले. असला कसला शब्द हा? तुम्ही असा शब्द वापरलाच कसा?.. त्यावर नक्वी म्हणाले, हा भलता-सलता शब्द नाही. उर्दू शब्द आहे. कठमुल्ला म्हणजे धर्माध. फॅनॅटिक.. नक्वी आदरयुक्त स्वरात म्हणाले, माझी इंग्रजी थोडी नाजूक आहे म्हणून मी उर्दू शब्द वापरला. मला जरा समजून घ्या.. नक्वींच्या वाक्यावर रॉय नरमले. नक्वींनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यांना ‘कठमुल्ला’ शब्द पुन्हा वापरायचा होता पण, त्यांनी फॅनॅटिक.. फॅनॅटिक असं दोन-दोनदा म्हणत आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला. रॉय म्हणाले, फॅनॅटिक म्हणा.. कठमुल्ला काय शब्द आम्हाला माहिती नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा