सुहास सरदेशमुख

४० कुटुंबांसाठी पुरेल इतकी दहा हजार लिटरची, ७५ वर्ष टिकू शकणारी फेरोसिमेंटच्या पाण्याच्या टाकीची रचना स्थापत्य अभियंता वैशाली खाडिलकर यांनी केली आणि या टाक्या ३३०० टंचाईग्रस्त गावांत पोहोचवल्या. परिणामस्वरूप कित्येक जणींच्या डोईवरचा हंडा उतरला. गेली २६ वर्षे ‘दिलासा’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सात लाख हेक्टर जमिनीवर पाणलोटाची कामं अथकपणे करणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, वैशाली खाडिलकर.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Forest Minister Ganesh Naiks first visit to Vidarbha praise work of former Forest Minister
वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक

डोंगराच्या वरच्या बाजूला चर खोदायचा, खोदलेल्या चरात पावसाच्या पाण्याने पुन्हा माती लोटली जाऊन तो बुजून जाऊ नये म्हणून त्याच्या भोवताली झाडं लावायची, चर खणण्यासाठी, बंधारे बांधण्यासाठी गावकऱ्यांना तयार करायचं, गावाचं पाणी वाढेल असा विश्वास द्यायचा, पळणारे पाणी, थांबलेलं पाणी यातून मुरलेल्या पाण्याचे हिशेब मांडून दाखवायचं, त्या पाण्यातून कोणती पिकं घेता येऊ शकतात, त्याची बाजारपेठ कोणती हे समजावून सांगायचं. हे सारं करताना निर्माण करावा लागणारा परस्पर विश्वास, हा दोन-चार वर्षांचा कार्यक्रम. तसं जलक्षेत्रातील निर्णय पुरुषांचे. इथे स्त्रीला तसं स्थान कमी. कारण पाणलोटात काम करणं म्हणजे जमीन, पाणी, झाडं आणि माणसं या साऱ्याची अभियांत्रिकी. ‘इंटिग्रेटेड इंजिनीअरिंग’ म्हणू त्याला. मात्र गेली २६ वर्षे वैशाली खाडिलकर हे काम अथकपणे करताहेत. ‘दिलासा’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सात लाख हेक्टरवर पाणलोटाची कामं केली आहेत.

हेही वाचा >>> लोकसत्ता दुर्गा : २०२३ कर्णबधिरांचा आसरा!

अशा कामांचा उपयोग काय? अंबेलोहळ गावाच्या टोकीवस्तीचा भाग हे टँकरचे गाव. गावातील प्रत्येकीला किमान दोन किलोमीटरवरून पाणी आणावं लागे. टँकर आल्यावर गावात जणू लढाईच सुरू होई, पण या गावात पाणी साठवणुकीचा एक प्रयोग करण्याचे ठरले. पूर्वी गावात धान्य साठवणुकीसाठी कणगी असायची. मोठी आयाताकृती रचना. तशी फेरोसिमेंटची टाकी बांधली, फेरोसिमेंटच्या या टाकीचं आयुष्य ७५ वर्षांपेक्षा अधिक. या टाकीत छतावरचे पाणी साठवता येते. एका झरोक्यातून टाकी साफ करायला माणूस उतरू शकतो. त्यामुळे ३५- ४० कुटुंबांसाठी दहा हजार लिटरची टाकी उपयोगी पडते. या टाकीची रचना स्थापत्य अभियंता वैशाली खाडिलकर यांनी तयार करून घेतली आणि या टाक्या विविध जिल्ह्य़ातील ३३०० टंचाईग्रस्त गावांत पोहोचवल्या. एका कंपनीने टाक्यांसाठी सामाजिक दायित्व निधीतून खर्चाचा भार उचलला आणि कित्येक जणींच्या डोईवरचा हंडा उतरला. त्यामुळे काही गावात वैशाली खाडिलकर यांची ओळख ‘पाणीवाली बाई’अशी झाली.

स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’मध्ये लागलेली नोकरी सोडून त्या जेव्हा स्वयंसेवी संस्थेत रुजू झाल्या तेव्हा त्यांना सिमेंट-वाळूतून उभ्या राहणाऱ्या अभियांत्रिकीचं ज्ञान होतं. पण माणसांचं इंजिनीअरिंग कसं करणार? छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका कोपऱ्यामध्ये असलेलं कोनेवाडी गाव. सरकारी माणूस लोकांशी पारावर चर्चा करू लागला, की हमखास समजायचं त्याची पादत्राणे गायब होणार. उचापती करणाऱ्या या गावाच्या नादाला कोणी लागत नसे. गावचा डोंगर तसा उघडा- बोडका. त्यावर चर खोदण्याची घनमीटरप्रमाणे मजुरी तुम्हाला कशी मिळणार,

 ते त्यांनी लोकांना समजावून सांगितले. पैशाचं गणित कळलं आणि दुसऱ्या दिवशी चर खोदल्या गेले. तिथूनच पाणलोटाचे काम जोमानं या गावात सुरू झालं. पहिला आठवडी पगार झाल्यानंतर लोकांचा विश्वास बसला. मग मागे पाहावं लागलंच नाही. दर आठवडय़ाला एक दिवस श्रमदान करून दोन माती नाला बांध बांधले गेले. दारू पिणे, चोऱ्या-माऱ्या करणे या वागण्यावर लोकांमध्येच चर्चा होऊ लागली. हळूहळू गावाचं भूषण कशात, असे प्रश्न विचारत आलेलं भान एवढं होतं की, डोंगरावर लावलेली झाडं कोणी तोडू नये म्हणून चराईबंदी करण्यात आली. खरंच, नंतर झाडाला बकरी सुद्धा शिवली नाही. बघता-बघता झाडी वाढली. सामाजिक वनीकरणचे अधिकारी चकित झाले. उघडा-बोडका डोंगर हिरवागार झाला. या गावाला ‘वनश्री पुरस्कार’ मिळाला. पुढे मोठी दूध डेअरी झाली. शेडनेटमधील सिमला मिरची घेणारे शेतकरी पुढे आले, बियाणाचे प्लॉट तयार झाले. ट्रॅक्टर आला. गाव बदलला. हे सारे घडवून आणण्यासाठी सुसंवादाचं तंत्र विकसित करण्यात वैशाली खाडिलकरांचा मोठा वाटा. म्हणजे अधिकाऱ्यांना त्यांच्या कमतरता तर सांगायच्या, पण त्याची भाषा आणि त्याचा स्वर कसा ठेवायचा हे त्यांना समजले आहे. आता ही बाब त्या त्यांच्या देशभरातून काम करणाऱ्या चमूला समजावून सांगतात. खरे तर सरकारी पातळीवर पाणलोटाच्या व्याख्या, त्यातील मातीनाला बांध, सिमेंट बंधारे या अधिक पैसे लागणाऱ्या चर्चामध्ये पाणी शिवारात थांबावं म्हणून कोणतं गवत लावावं, चर किती रुंद असावेत अशा तांत्रिक तपशिलात वैशाली खाडिलकर आपलं ज्ञान वापरत होत्या. त्याचबरोबर पाणलोटाच्या क्षेत्रातील तांत्रिक तपशिलाचं भान असणारी कॉर्पोरेट क्षेत्राला लागणारी निधी मिळविण्याची भाषा त्यांनी आत्मसात केली. ‘कपार्ट’, ‘नाबार्ड’, ‘ वल्र्ड बँक’, ‘युनिसेफ’ अशा संस्थांना लागणारा तपशील एका बाजूला आणि दुसरीकडे गावातील शेतकऱ्याला, गाव पुढाऱ्यांना पाण्याची भाषा शिकवणं अशा दोन स्तरावर त्या काम करत. गेल्या २६ वर्षांत हे सारे घडू शकले त्याचे कारण ‘दिलासा’ संस्थेच्या अनघा पाटील, संजीव उन्हाळे यांनी वैशाली खाडिलकर यांच्या कामावर टाकलेला विश्वास आणि काम करण्यासाठी दिलेलं स्वातंत्र्य, यातून अनेक प्रयोग करता आल्याचे त्या सांगतात. आता संस्थेच्या कामाचा पाणलोटाच्या क्षेत्रात दबदबा आहे. एवढा की चेन्नईला जेव्हा पाणीटंचाई जाणवली तेव्हा काय करता येईल, याचा शोध सुरू करण्यात आला. ‘दिलासा’चा चमू पोहोचला आणि वैशाली खाडिलकरांनी स्थानिकांशी दुभाषकांच्या मदतीने चर्चा केली. तेव्हा कळले की, जुने जलस्रोत बुजले आहेत. त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. कालवे मोकळे केले आणि चेन्नईमधील टँकर कमी झाले.

महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांतून ६२५ गावांतून पाणलोटाची कामे करताना ४५० हेक्टरावर झाडं लागली. या गावांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ४२ हजारांहून ६० हजारांपर्यंत वाढल्याचा ‘दिलासा’ संस्थेचा दावा आहे. अनेक पुरस्कारांनी संस्थेला गौरविण्यात आले आहे. वैशाली खाडिलकरांचे नियोजन यास कारणीभूत आहे.

गाव हिरवागार होण्यासाठी आणि पाणीटंचाई कमी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या वैशाली खाडिलकर यांना त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा.

संपर्क :

वैशाली खाडिलकर – ९८२२०६८९२३

पत्ता – प्राइड टॉवर, वेदान्त नगर,

छत्रपती संभाजीनगर 

vaishalee2016@02shraddhaw

मुख्य प्रायोजक :  उषा काकडे ग्रुप,

सहप्रायोजक :  मे. बी. जी. चितळे डेअरी, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, उज्ज्वला हावरे लेगसी

पॉवर्ड बाय :  केसरी टूर्स , व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स ,ओ एन जी सी,  दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.

Story img Loader