नितीन पखाले
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे गेल्या २६ वर्षांपासून चळवळी, आंदोलनांच्या माध्यमातून अनेक प्रश्न धसास लावणाऱ्या डॉ. लीला भेले. ‘फुले—आंबेडकर महिला प्रबोधिनी’च्या माध्यमातून त्यांनी बालवाडय़ा, शाळा, महाविद्यालय, नालंदा अकादमी, स्त्री समुपदेशन
केंद्र स्थापन केले असून त्यामुळे परिसरातील लोकांचे, मुलांचे आयुष्य मार्गी लागत आहे. मात्र त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम ठरले ते येथील आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नांसाठी थेट शासनास हस्तक्षेप करण्यास भाग पाडणे. या मुलींना आणि त्यांच्या बाळांना त्यामुळे न्याय मिळाला आहे. कुमारी मातांच्या आई ठरलेल्या डॉ. लीला आहेत आजच्या दुर्गा.
शेतकरी आत्महत्यांचा अभि:शाप असलेला जिल्हा ही यवतमाळची ओळख. यात गेल्या काही वर्षांपासून कुमारी मातांच्या सामाजिक प्रश्नाची भर पडली. जिल्ह्य़ाच्या एका टोकावर डोंगर, दऱ्यांत तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेले झरी जामणी आणि केळापूर हे आदिवासीबहुल तालुके कुमारी मातांचे प्रभाव क्षेत्र आहे. जिल्ह्य़ात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना कुमारी मातांचा प्रश्न शासन, प्रशासन, सामाजिक संस्था, कार्यकर्ते या सर्वच स्तरांवरून दुर्लक्षित होता. १९९०-९२ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रात, महिला चळवळी, स्त्री अत्याचार, हुंडा विरोधी आंदोलने, दलित चळवळ, साहित्यक्षेत्र यात हिरिरीने आघाडीवर असलेल्या प्रा. डॉ. लीला हरिश्चंद्र भेले यांनी ‘फुले—आंबेडकर महिला प्रबोधिनी’ या संस्थेच्या माध्यमातून कुमारी मातांच्या प्रश्नांचे गांभीर्य महाराष्ट्राला पटवून तर दिलेच, पण त्यावर रोख लागावा यासाठी उपाययोजनाही के ल्या.
सुमारे २५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. झरी, केळापूर या भागांत शेतीच्या व्यवसायात काम करणारे जमीनदार, विविध खनिज व्यवसायानिमित्त या भागात येणारे कंत्राटदार, आदिवासींची शेती भाडेतत्त्वावर घेणारे परप्रांतीय ठेकेदार, युवक या परिसरातील आदिवासी समाजातील १२ ते १८ वयोगटांतील मुलींवर बलात्कार करायचे तर कधी विविध आमिषे दाखवून भुलवायचे आणि त्यांच्यावर मातृत्व लादून परागंदा व्हायचे. पांढरकवडा येथे प्राध्यापिका असलेल्या डॉ. लीला भेले यांच्या संपर्कात मांगुर्डा येथील एक १३ वर्षीय शोषित चिमुरडी आली आणि या गंभीर प्रश्नाची वाच्यता महाराष्ट्रापुढे झाली. पांढरकवडा येथे बरचसे आदिवासी बांधव रोजगारासाठी येतात. एकदा ती एकटीच जंगलातून गावाकडे जायला निघाली. त्याच वेळी तीन ते चार नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. वैद्यकीय तपासणी झाली असता तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचे निर्दशनास आले. डॉ. लीला यांनी बालिका आणि तिच्या पालकांसह यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी
व्ही. गिरीराज यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. आणि त्यानिमित्ताने या आदिवासी भागातील बालिकांचे लैंगिक शोषण, कुमारी मातांचा प्रश्न, त्याचे गांभीर्य महाराष्ट्रासमोर आले. या पीडित बालिकेचे पुनर्वसन डॉ. भेले यांनी करून दिले. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कारवाईसुद्धा झाली.
त्यानंतर तालुक्यातील कोवळ्या मुलींच्या शोषणाचे अनेक प्रकार हळूहळू पुढे आले आणि कुमारी मातांच्या प्रश्नावर प्रा. डॉ. लीला भेले यांची चळवळ व्यापक झाली. झरी जामणी, केळापूर तालुक्यांतील ५० आदिवासी पाडय़ांना भेट दिल्यावर बहुतांश पाडय़ांवर आदिवासी बालिका, तरुणींचे शोषण झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. बहुतांश मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रस्थापितांकडून त्यांचे शोषण केले जात असल्याचे निदर्शनास आले. यातील २०० मुली गर्भवती होत्या. साहजिकच डॉ. लीला यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह आंदोलनातून रान पेटविले. हा प्रश्न विधिमंडळातही पोहोचला. पीडित कुमारी मातांना आर्थिक मदत देण्याची तयारी त्या वेळी शासनाने दर्शविली. ‘फुले—आंबेडकर महिला प्रबोधिनी’च्या माध्यमातून बालसंगोपन योजनेखाली जवळपास २०० कुमारी मातांना आर्थिक मदत देण्यात आली. एकू ण जिल्ह्य़ात कुमारी मातांची संख्या ३००च्या घरात असल्याची नोंद विविध संस्थांच्या सर्वेक्षणातून पुढे आली. यातील अनेक कुमारी मातांचे, त्यांच्या पाल्यांचे पुनर्वसन, शिक्षणही भेले यांच्या ‘फुले—आंबेडकर महिला प्रबोधिनी’ या संस्थेच्या पुढाकारातून करण्यात आले. या जगजागृतीमुळे आदिवासी समाज, पाडांवरील मुलीही सावध झाल्या असल्याने कुमारी मातांच्या प्रश्नांची दाहकता अगदीच कमी झाली आहे.
प्रा. डॉ. लीला भेले या मूळच्या यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्यातील. वडील नामदेवराव दिवेकर इंग्रजांच्या काळात भारतीय सैन्यात होते. घरात महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा असल्याने शैक्षणिक, सामाजिक वातावरण होतेच. आई गंगूबाई यांनी लीला यांच्यासह सात भावंडांना उत्तम संस्कार देऊन उच्चविद्याविभूषित केले. १९७६ नोकरीनिमित्त पांढरकवडा आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते
प्रा. हरिश्चंद्र भेले यांच्याशी लीलाताई विवाहबद्ध झाल्या. पुढे या दाम्पत्याने अनेक चळवळीतून समाजाला दिशा देण्याचे काम केले. दलित साहित्य हा त्यांच्या आवडीचा प्रांत. डॉ. लीला भेले यांनी कल्याण आणि महाड येथील दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. वक्ता म्हणूनही त्यांचा परिचय महाराष्ट्राला आहे.
१९९३ मध्ये स्थापन केलेल्या ‘ फुले-आंबेडकर महिला प्रबोधिनी’ या संस्थेमार्फत डॉ. लीला भेले यांचे सामाजिक कार्य आज ६८ व्या वर्षीही अविरत सुरू आहे. त्यांनी २५ बालवाडय़ा सुरू केल्या तसेच सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापनाही केली. इतके च नव्हे तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, याकरिता पांढरकवडा येथे नालंदा अकादमीची स्थापना आणि त्याची वास्तू उभी केली. तेथे शेकडो पुस्तके उपलब्ध असून या अकादमीतील अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. डॉ. भेले पांढरकवडा येथे गेल्या १० वर्षांपासून महिला समुपदेशन केंद्र चालवीत असून शासनाने त्यांच्याकडे आठ तालुक्यांचे काम सोपविले आहे. कौटुंबिक अत्याचाराची ५००वर प्रकरणे या केंद्रामार्फत यशस्वीपणे हाताळली आहेत.
कुमारी मातांच्या प्रश्नांवरील आंदोलनामुळे
डॉ. लीला भेले महाराष्ट्राला परिचित असल्या तरी साहित्य, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रांत त्यांची मुशाफिरी राहिली आहे. डॉ. लीला भेले यांचे सामाजिक चळवळीतील आयुष्य पती प्रा. हरिश्चंद्र भेले आणि दोन मुलींच्या खंबीर साथीमुळे अधिक समृद्ध झाले आहे. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा.
संपर्क : प्रा. डॉ. लीला भेले
फुले-आंबेडकर महिला प्रबोधिनी, प्रोफेसर कॉलनी, पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ
ईमेल – drleela.bhele@gmail.com
दूरध्वनी – ८००७९४०४६६
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
यश कार्स
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लि.