रावसाहेब पुजारी

आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. शेती करताना केवळ लागवड, जोपासना करणे, खते-औषधे देणे, उत्पादन बाजारात नेणे एवढेच नसते, तर आपल्या भागातील हवामान, जमीन, बाजारपेठेचा विचार करत शेती उत्पादन ठरवावे लागते. त्याचे शास्त्रशुद्धरीत्या व्यवस्थापन करावे लागते. बाजारपेठेचा, त्यातील हंगामाचा अंदाज घ्यावा लागतो. परंपरेने शेती करणारा इथेच कमी पडतो आणि त्यामुळे शेती परवडत नाही अशी ओरड सुरू होते. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतीला दिलेली नवी दिशा अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.

dairy farming news in marathi
लोकशिवार: गोपालनाचा जोडधंदा!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) येथील केशव बबनराव होले यांची ही यशोगाथा. उच्चशिक्षित असूनही ते नोकरीसाठी धडपड न करता त्यांनी आदर्श शेती करून दाखवली आहे. शेती उत्पादनापासून ते त्याच्या पीक पद्धतीपर्यंत त्यांनी वेळोवेळी केलेले प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतास भेट आहेत.

केशव होले यांच्याकडे वडिलोपार्जित ८ एकर शेती ही बागायती आहे. यात ते खरबूज, कलिंगड, काकडी आणि झेंडू या मुख्य पिकांची लागवड करून चांगले उत्पादन घेत आहेत. केशव यांना लहानपणापासून शिक्षणासोबतच शेतीची आवड होती. सुरुवातीला त्यांच्या शेतात ऊस, कांदा, गहू आणि बाजरी अशी पिकांची लागवड केली; मात्र, यातून फारसे काही उत्पादन निघत नव्हते. केशव यांनी २००६ मध्ये खरबुजाची लागवड केली. यानंतर वाढत्या तापमानात शेती शाश्वत करण्यासाठी केशव यांनी संरक्षित शेतीचा प्रयोग केला आहे. सव्वा एकर क्षेत्रात त्यांनी काकडी पिकाकरिता बांबू आणि पॉलिस्टर पेपरच्या साहाय्याने कमी खर्चात ‘शेडनेट’ची उभारणी केली आहे. ‘पॉलिस्टर पेपर’मुळे हवामान नियंत्रणात राहते, फुलकळी गळत नाही, कीड आणि रोग नियंत्रणात राहतात, पाण्याची व खताची बचत होते, कृषी निविष्ठांवरील खर्च कमी होतो. बांबू आणि ‘पॉलिस्टर पेपर’च्या साहाय्याने तयार केलेल्या ‘शेडनेट’मध्ये काकडी पिकाचे उत्पादन घेतले. या संरक्षित पद्धतीच्या शेतीत खुल्या शेतीतील पिकांपेक्षा एकरी जास्त उत्पादन मिळाले. मल्चिंग पेपरवर ६ बाय १ फुटावर सरळ ओळ पद्धतीने काकडीची बी लागवड, विद्राव्य खतांचा संतुलित वापर, जिवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर, बुरशीनाशक व कीटकनाशक यांचा आवश्यकतेनुसार वापर, तसेच शेडनेटमुळे पाण्याचा अतिरिक्त वापर कमी झाला.

केशव यांनी अडीच एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली आहे. तर दोन एकर क्षेत्रात खरबूज लागवडीचे नियोजन केले आहे. खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडी पिकाच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रति एकरी उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन वाढविण्यावर केशव यांनी भर दिला आहे. सेंद्रीय, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर देखील ते त्यांच्या शेतीत करत आहेत. साधारणपणे जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने खरबूज लागवड केली जाते. या पिकासाठी केशव यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या क्रॉप कव्हर तंत्रासाठी एकरी १८ ते २० हजार रुपये अधिक खर्च होतो. मात्र, यामुळे तण नियंत्रण, पीक संरक्षण, पाणी आणि खर्चात बचत होते. या सोबतच उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होते. फळांचा दर्जा चांगला येतो आणि परिणामी बाजारात दर चांगला मिळतो. केशव यांनी दुसऱ्या सरीवर कलिंगडाची लागवड केली असून, त्याची काढणी झाल्यानंतर त्याच सरीवर झेंडूची लागवड करणार आहेत.

नोंदवहीत नोंदी

कोणत्या पिकातून किती फायदा झाला किंवा किती नुकसान झाले याचा ते दर वर्षी अंदाज घेतात. या अंदाजावरून ते पुढील वर्षाचे नियोजन करून अंदाजपत्रक तयार करतात. या आर्थिक नियोजनावर केशव यांनी विशेष भर दिला आहे. केवळ पीक लागवड करून विक्री झाली म्हणजे झाले असे होत नाही. बाजारपेठेचा अभ्यास व शेतमालाला मिळणारा भाव यांचा अभ्यास करणे गरजेचे असते, असे होले यांनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून होले यांनी पीक व्यवस्थापनाच्या सर्व नोंदी नोंदवहीत तारीख-वार ठेवल्या आहेत. यामध्ये लागवड ते विक्री संबंधितचा तपशील, मिळालेला दर, खर्च याची सविस्तर माहिती नोंदविलेली आहे. पीक व्यवस्थापन करताना फवारणी, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत तपशीलवार नोंदी असून, त्याचा काय परिणाम झाला याचीही नोंद घेतलेली आहे व निरीक्षण नोंदविलेले आहे.

शेतीचा वाढवला अभ्यास

केशव यांनी खरबूज, कलिंगड, झेंडू व काकडी या पिकांचे व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. तसेच त्यांनी शेतीमध्ये केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला विविध मान्यवरांनी भेटीदेखील दिल्या आहेत. जिथून ज्ञान मिळेल तेथून ते घेण्याचा केशव होले यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी प्रयोगशील शेतकरी, नामवंत तज्ज्ञांची ते भेट घेत असतात. तसेच शेतीविषयक पुस्तके ते वाचतात. तज्ज्ञांनी विविध टप्प्यांवर व्यवस्थापनाबाबत दिलेल्या उपयुक्त गोष्टी ते नोंदवून ठेवतात. त्यांना कोणताही नवीन प्रयोग करायचा असल्यास ते एक एकरावर करतात. अभ्यास व अनुभव याचा मेळ घालत होले यांनी आपले व्यवस्थापन व वेळापत्रक तयार केले आहे.

आव्हानातून शेती यशस्वी

अलीकडील काळात हवामान बदलामुळे सर्वच भाजीपाला उत्पादकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दर वर्षी वेगवेगळ्या अडचणी येत असतात. अनेकदा बियाण्यांची उगवण एकसारखी होत नाही. त्या वेळी दुबार टोकनही करावी लागते. यामुळे पिकाचा कालावधी कमी-जास्त होतो. काही वेळा कीडनाशकांची फवारणी करूनही कीड व रोग आटोक्यात येत नाही, अशा कारणामुळे खर्चात मोठी वाढ होते. नैसर्गिक आपत्ती आल्यास व्यवस्थापन खर्च जवळपास दुप्पट होतो. संघर्ष करीत प्रतिकूल परिस्थितीत आपली पिके टिकवून धरण्याचे प्रयत्न व सातत्य केशव होले यांच्यात दिसून येते. शेतीतील विविध ज्ञान मिळविण्यासाठी केशव होले कायम प्रयत्नशील असतात. त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठ, बारामती कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आदी ठिकाणी अभ्यास दौरा केला आहे. आज ते परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. आपली शेती सांभाळण्यासाठी सहा महिलांना त्यांनी कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, कृषी विभागाद्वारे आयोजित परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण आणि चर्चा यात त्यांचा सहभाग असतो.

समाजमाध्यमाचा वापर

केशव होले हे फेसबुक, व्हॉट्सअप यावर शेतीविषयक माहिती देत असतात. शेतकरी मेळावे, ऑनलाइन चर्चासत्र, सेमिनार- वेबिनार प्रशिक्षण या माध्यमातून शेतकरी तज्ज्ञ, विद्यार्थ्यांसोबत, तसेच कृषी संशोधक, पीएचडी करणारे विद्यार्थी यांच्या संपर्कात असतात. त्यातून ज्ञान व तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण सातत्याने सुरू असते. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात सुमारे सात एकरात लागवडीचे नियोजन झाले होते. लॉकडाउन सुरू झाला आणि बाजारपेठ ठप्प झाली. सर्व माल शेतातच सोडून देण्याची वेळ आली. या वेळी तब्बल १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. तरीही केशव यांनी खचून न जाता पुन्हा हिंमत एकवटली आणि शेतीत सकारात्मक व उत्साहरूपी चैतन्य भरले.

वर्षाला चांगली कमाई

केशव होले हे आता खरबूजाचे प्रतिएकर २० टनांपर्यंत, तर कलिंगडाचे प्रतिएकर ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत. तसेच झेंडूचे १० टन, तर काकडीचे ४० टन उत्पादन ते घेत आहेत. एकंदरीत या सर्व उत्पादनातून केशव होले वर्षाला सुमारे १० लाख रुपयांची कमाई करत आहेत. तसेच शेतमाल विक्रीसाठी त्यांनी ह्यकेशव होले डेलिशिअस फार्म फ्रेश फ्रूट्सह्ण हा ब्रँड तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने शेतीला प्रक्रिया उद्याोगाची जोड देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. रेसिड्यू फ्री पद्धतीने उत्पादन केलेल्या कलिंगड, खरबूज, काकडी यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मुंबई- पुणे बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून केशव होले डेलीशिअस फार्म फ्रेश फ्रूट्स या ब्रँड व लोगोद्वारे प्रतवारी करून क्रेटद्वारे खरबूज व कलिंगडाचे मूल्य संवर्धन करून विक्री केली जाते.