पाण्याचा अमर्याद वापर, बदलते हवामान, मजुरीबरोबरच खतांचा वाढता दर यामुळे ऊस शेतीही आतबट्ट्याची ठरत आहे. याला उपाय म्हणून बारामतीच्या कृषी संशोधन केंद्राच्या मदतीने सांगली जिल्ह्यातील क्रांती कारखान्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. या विषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोरे म्हणजे ऊस पिकाचे आगरच मानले जाते. कसदार काळी जमीन, बारमाही पाणी आणि पोषक वातावरण यामुळे कमी श्रमाचे पण, अधिक आणि खात्रीलायक उत्पन्न देणारे पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. मात्र, पाण्याचा अमर्याद वापर, बदलते हवामान, मजुरीबरोबरच खतांचा वाढता दर यामुळे ऊस शेतीही आतबट्ट्याची ठरत आहे. याला उपाय म्हणून बारामतीच्या कृषी संशोधन केंद्राच्या मदतीने सांगली जिल्ह्यातील क्रांती कारखान्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे.
हेही वाचा – लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रात सिंचन योजनांच्या शाश्वत पाण्यामुळे ऊसशेती बहरली. यामुळे या शेतीवर आधारित प्रक्रिया उद्याोग म्हणून साखर कारखानदारीही जोमाने स्थिरावली. या भागाचे अर्थकारणच मुळी ऊस शेतीवर अवलंबून आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. सांगली जिल्ह्यात आता म्हैसाळ, टेंभू, ताकारी, आरफळ या सिंंचन योजना कार्यान्वित झाल्याने एरवी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या पूर्व भागातही ऊस पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. यामुळे उसाला दरही आता उत्पादन खर्चाशी निगडित मिळत नसला, तरी हमखास ग्राहक असल्याने अन्य म्हणजे द्राक्ष, डाळिंब अथवा अन्य पिकाप्रमाणे बेभरवशाचा उरलेला नाही. साखर कारखानदारी असल्याने उत्पादित होणाऱ्या उसाला ग्राहक आणि पैसे मिळणार याची शाश्वती असल्याने उत्पन्नाची हमी आहे. याचबरोबर सहकाराच्या माध्यमातून कारखानदारी उभी राहिली असल्याने अन्य व्यापारी ग्राहकांपेक्षा खात्री निर्माण झाली आहे. यामुळे उसाचे क्षेत्र वाढत आहे.
जिल्ह्यात एके काळी द्राक्षशेतीचा मोठा विस्तार दुष्काळी भागात झाला. आज ही शेतीही बदलत्या हवामानामुळे, बाजारपेठेच्या अस्थिरतेमुळे तोट्यात आल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने संकटात सापडली आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जात होते. मात्र, गेल्या चार वर्षांत द्राक्ष पीक काढण्याचे प्रमाण वाढले असून, २० ते २५ हजार एकरवरील द्राक्ष पीक शेतकऱ्यांनी काढले आहे. विशेषत: करोना संकटानंतर द्राक्ष शेती अधिकच तोट्यात गेली. खते, कीटकनाशके यांचे दर तर वाढलेच, पण याचबरोबर मजुरीचे दरही आता आवाक्याबाहेर गेले. माल तयार झाल्यानंतर त्याचे पैसे हातात मिळेपर्यंत शेतकरी दलालाकडून फसविला जातो की काय, अशी स्थिती सातत्याने निर्माण होत असल्याचे द्राक्षासारखे नगदी पीक आज अधोगतीला लागले आहे. द्राक्षाच्या जागी आता पाण्याची शाश्वती झाल्याने ऊस शेतीकडे कल वाढला आहे.
ऊस लागवड करत असताना कांडी लावण, डोळा लावण हे काम अधिक कष्टाचे आणि वेळखाऊ असल्याने आता रोपलागवड हा नवीन प्रकार रुजू लागला आहे. नर्सरीमधून रोपे आणली, की त्याची लागवड करणे अधिक सुलभ आणि कमी खर्चात, कमी वेळेत लावण होत असल्याने शेतकऱ्यांचा कल या लागवडीकडे वाढला आहे.
तथापि, ऊस लागवड केली, की काम भागले असे होत नाही. त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पादन व साखर उतारा मिळवण्यासाठी पाणी, खते यांचे योग्य नियोजनही करण्याची गरज आहेच. एकदा का उसाची मोठी भरणी झाली, की तोड येईपर्यंत केवळ पाणी नियोजन करणे एवढेच काम हाती उरत असल्याने तसे द्राक्षाच्या तुलनेत कष्ट व धोका कमी असला, तरी अलीकडच्या काळात बदलत्या हवामानाचा फटका या ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. सरासरी एकरी साठ ते सत्तर टन उत्पादनाची शाश्वती होती. आता मात्र, एकरी तीस ते पस्तीस टन उत्पादन होत आहे. या तुलनेत करावा लागणारा खते, औषधे आणि पाण्यावरील खर्च मात्र वाढत चालला आहे. अवकाळी पाऊस, धुके हा हवामानातील बदल उसाच्या उत्पादनावर परिणाम तर करत आहेच, पण अतिरिक्त पाण्याचा वापर, रासायनिक खतांचा वापर यामुळे जमिनीचे आरोग्यही बिघडत आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग यशस्वी ठरला, तर त्याचा फायदा ऊसउत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय?
अचानक पाऊस, गारपीट, धुके यामुळे रोगाचे प्रमाण तर वाढतेच. रोगाचे आक्रमण झाल्यानंतर त्याचा उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते हे नित्याचे झाले आहे. यावर इलाज म्हणजे शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून येऊ घातलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे कमीत कमी नुकसान कसे होईल, याची दक्षता घेणे. यासाठी ऊस शेतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हवामानाची माहिती देणाऱ्या हवामान केंद्रांची उभारणी करणे आवश्यक आहे. हवेची दिशा, गती, हवेत असलेले कीटक, रोग यांची माहिती हवामान केंद्रामुळे मिळते. ही माहिती संगणकावर संकलित केल्यानंतर यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे, याचा सल्लाही संगणकावर मिळू शकतो. जी औषधे वापरायची, त्याची मात्रा किती द्यायला हवी, वाऱ्याचा वेग आणि दिशा कोणती आहे याची माहिती अगोदरच मिळाली असल्याने औषधाचा वापर ड्रोनच्या माध्यमातून करता येऊ शकतो.
तसेच पिकामध्ये साखर किती आहे, पक्वतेचा अवधी किती आहे याची माहिती सेन्सारच्या माध्यमातून संकलित होऊ शकते. जमिनीमध्ये नत्र, पालाश, स्फुरद यांचे प्रमाण किती आणि पिकासाठी कोणत्या मूलद्रव्याची गरज आहे आणि किती प्रमाणात द्यावे लागेल, याचीही माहिती उपलब्ध होते. पिकाला पाण्याची गरज किती आहे, जमिनीत किती फुटांपर्यंत ओलावा आहे आणि पाणी किती लिटर द्यावे लागणार आहे, की पाण्याची ओढ द्यावी लागणार आहे ही माहिती शेतातील सेन्सारच्या माध्यमातून संगणकावर संकलित करता येऊ शकते. या माहितीच्या आधारे पीक नियोजन, खत नियोजन, पाणी नियोजन शक्य होणार आहे. यामुळे अनावश्यक पाण्याचा वापर तर टाळता येऊ शकतोच, पण रासायनिक खतावर होणारा खर्चही कमी होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जर यशस्वीपणे करता आला, तर उसाचे उत्पन्न ४० टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे तर आहेतच, पण याचबरोबर साखर उताराही वाढणार आहे. उत्पादन खर्चामध्ये २० ते ४० टक्के घट येऊ शकते. तर खतांवर होणाऱ्या खर्चात ३५ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. कीड नियंत्रण अगोदरच करण्याची संधी मिळाल्याने मावा, तुडतुडे यापासून होणारे पिकांचे नुकसानही टाळता येऊ शकते. आवश्यक तेवढाच कीटकनाशकांचा वापर होत असल्याने जमिनीतील परोपजीवी कीटकाचा नायनाट होण्याचा धोका तर टळणार आहेच, पण याचबरोबरच जमिनीचा पोतही सुधारणार आहे. असे लाभ या नव्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहेत. सामूहिक पद्धतीने जर ही यंत्रणा उभी केली, तर एकरी येणारा खर्चही कमी होणार असून, उत्पन्न वाढीसाठी भविष्यात एआय तंत्रज्ञानाला पर्याय उरणार नाही, असे वाटते.
हेही वाचा – ‘अपघाती’ पंतप्रधान; निश्चयी प्रधानसेवक!
क्रांती सहकारी साखर कारखान्याने बारामतीतील एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याचे निष्कर्ष अद्याप समोर आले नसले, तरी आधुनिकतेची कास धरली, तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे, याचबरोबर नवनवे तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. – शरद लाड, अध्यक्ष, क्रांती सहकारी साखर कारखाना
digambarshinde64@gmail.com