‘काय झाडी.. काय डोंगार.काय हाटिल.समदं ओक्के’ या संवादामुळे सार्वत्रिक प्रसिद्धीचे वलय लाभलेले सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील चर्चेत आले आणि त्यांना राज्यभरातून भाषणासाठी मागणी वाढू लागली. मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी सर्वच ठिकाणी त्यांच्या सभांना गर्दी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अॅड. शहाजीबापू पाटील यांना आपल्या पक्षाच्या उपनेतेपदी बढती दिली आहे. एवढे सारे वलय लाभले असताना अॅड. शहाजीबापूंनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आपणांस विधान परिषदेवर पाठवा आणि आपल्या सांगोला मतदारसंघातून साखर सम्राट अभिजित पाटील यांना विधानसभेवर पाठविण्याची अजब मागणी केली आहे. त्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. वाळू तस्करीप्रकणी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात तडीपार झालेले अभिजित पाटील हे आता अल्पावधीतच सहा साखर कारखान्यांचे मालक झाले आहेत. त्यांच्या साखर कारखान्यांसह कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने अलीकडेच धाडी घातल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मदतीला लगोलग भाजपचे नेते प्रवीण दरेकर पंढरपुरात धावून आले होते. पाटील हे भाजपमध्ये येतील, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी शाबूत राखण्याची खात्री देता येत नाही. तेव्हा काहीही होवो माझी आमदारकी कायम ठेवा, असाच शहाजीबापूंचा प्रयत्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा