आणखी हजार वर्षांनंतर सूर्याचे मकर संक्रमण फेब्रुवारीस होऊ लागेल. . तेव्हा काय करणार? संक्रांत सणाचा मूळ हेतू जर कायम ठेवायचा असेल तर मकर संक्रमणाचा आग्रह न धरता उत्तरायणाशी संक्रांतीची म्हणजे तिळगुळाची सांगड घातली पाहिजे..

सूर्याचा प्रवास मेष ते मीन या राशीतून होतो. प्रत्येक राशीत सूर्याचा प्रवेश झाला की त्या संक्रमणास संक्रांत म्हणतात. ज्या राशीत प्रवेश होईल त्या राशीच्या नावाने ती संक्रांत ओळखली जाते. उदा. सूर्याने मेष राशीत प्रवेश केला की त्या संक्रांतीला मेष संक्रांत म्हणतात. सर्व आबालवृद्धांना जी माहिती आहे ती मकरसंक्रांत तिळगूळ देण्याघेण्याशी या मकरसंक्रांतीचा संबंध आहे. त्यामुळेच ही संक्रांत सर्वपरिचित आहे. तिळगूळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि संक्रांतीच्या आगेमागे हिवाळा असतो, त्यामुळे ही तिळगूळ वाटपाची प्रथा पडली याबद्दल मतभिन्नता नसावी असे वाटते.
उन्हाळा काय, हिवाळा काय हे ऋतू आहेत आणि ऋतूस कालावधी असतो. ऋ तू सहा धरले तर प्रत्येक ऋतूचा काळ दोन महिन्यांचा असतो. सूर्यस्थानाचा म्हणजे सूर्य कोणत्या राशीत आहे याचा विचार केला तर वर्षभरात समसमान दिवस व रात्र असल्याचे दिवस वर्षांतून दोन असतात व या दिवसांना विषुव दिवस म्हणतात. सूर्याने मेष आणि तूळ राशीत प्रवेश केला की हे दोन दिवस विषुवदिवस म्हणून धरले जातात. सूर्य जेव्हा जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो त्या दिवशी तो कर्क राशीत प्रवेश करतो. हा ऋतू म्हणजे उन्हाळा. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. तेथून पुढे उत्तरायण सुरू होते असे मानले जाई किंवा काही हजार वर्षांपूर्वी अशी स्थिती प्रत्यक्षात होती. सारांश सूर्याचा कर्कराशीतील प्रवेश किंवा कर्क संक्रमण म्हणजे दक्षिणायन आणि सूर्याचा मकर राशीतील प्रवेश म्हणजे उत्तरायणाची सुरुवात अशी परिस्थिती भूतकाळात होती म्हणून भूगोलातही यावरून कर्कवृत्त आणि मकरवृत्त असे दोन शब्द आले आहेत.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

आणखी वाचा – मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

सध्याची परिस्थिती

वर सांगितलेले उत्तरायणाचे आणि मकर संक्रमणाचे साहचर्य आता संपुष्टात आले आहे. सध्या आपल्या पंचांगात दिलेला सूर्याचा मकर प्रवेश आणि उत्तरायण यांच्यात फारकत झाली आहे. आपली पंचांगे सूर्याचा मकर प्रवेश १४ जानेवारीला दाखवितात.
उत्तरायण मात्र प्रत्यक्षात २२ डिसेंबरला होते. म्हणजेच उत्तरायण अगोदर होते आणि मकर प्रवेश नंतर होतो. थोडक्यात मकर संक्रमण आणि उत्तरायण हा दिवस पूर्वीप्रमाणे एकच नसून त्यांच्यात फरक आहे आणि हा फरक वाढत जाणार आहे. म्हणूनच संक्रांत केव्हा साजरी करायची याचा विचार करणे आवश्यक झाले आहे.

संक्रांत सणाचा हेतू

उत्तरायण आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दोन्ही घटना जेव्हा एकाच वेळी घडत असत तेव्हा मकरसंक्रांत साजरी करणे, तिळगूळ वाटणे हे नैसर्गिक परिस्थितीला समुचित होते. सांस्कृतिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आणि हेतूचा विचार करता मकरसंक्रांतीची म्हणजेच तिळगूळ समारंभाची गाठ उत्तरायणाशी बांधणे संयुक्तिक वाटते म्हणजे संक्रांतीचा प्रमुख निकष उत्तरायणाचा सुरुवातीचा दिवस हाच असतो. मकर संक्रमण हा निकष गौण आहे. उत्तरायणाच्या दिवशी संक्रांत न करता ती मकर संक्रमणाच्या दिवशी करणे हे कळत असून न कळल्यासारखे आहे. हा बदल लोकांनी म्हणजे जनतेने घडवून आणला पाहिजे.

आणखी वाचा – मकर संक्रांती साजरी का केली जाते? या १० गोष्टींबाबत जाणून घ्या सविस्तर

बदल जनतेच्या हातात

राजकारण्यांचे प्राधान्य मतांना असते, तर व्यावसायिकांना ‘अर्थ’ महत्त्वाचा असतो. तेव्हा महत्त्वाचे सांस्कृतिक बदल जनताच घडवू शकते. श्रेयस आणि प्रेयस यामध्ये प्रेयस लोभसवाणे असल्यामुळे लोकांचा ओढा प्रेयसकडे असतो. साहजिकच राजकारणी किंवा व्यावसायिक जनतेचाच अनुनय करताना दिसतात. त्यांच्या प्राधान्यक्रमाला बाधा येईल अशी सुप्त भीती त्यांना वाटत असते. कारणे काहीही असली तरी वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. विनोबा म्हणतात त्याप्रमाणे जनता ही मालक आहे. योग्य ते बदल घडवून आणण्याचा निर्णय जनतेनेच घेतला पाहिजे. कोणी परंपरेचा आश्रय घेऊन म्हणतील की हे पूर्वीपासून चालत आले आहे. त्यामुळे बदल कसा काय करणार? पूर्वजांना काही कळत नव्हते काय?
मानवी इतिहास पाहिला तर समाज, विज्ञान इ. मध्ये ज्ञान परिपूर्ण नसते. त्यात विकास प्रक्रिया अंतर्भूत असते. जसजसे ज्ञान वाढते तसतशा विसंगत ठरत जाणाऱ्या गोष्टी बदलणे हे आपले कामच आहे. उपनिषदातल्या ऋषींनी काय म्हटले आहे पहा. ‘यान्यस्माकं सुचरितानि । तानि त्वयोपास्यानि । नो इतराणि ।’ याचा अर्थ असा की जी चांगली कृत्ये असतील त्यांचे अनुकरण करा. इतर कृत्यांचे अनुकरण करू नका.

शिवाय काही अभ्यासकांचे मत आहे की सूर्यसिद्धांतासारख्या ग्रंथानेही ऋतूंचे वर्ष घ्यावे असे म्हटले आहे. हा मुद्दा जरी विवाद्य असला तरी उत्तरायण आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश यात फरक पडला आहे हे समजण्यास कोणत्याही अन्य पुराव्याची गरज नाही.

आणखी वाचा – मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल

मकरसंक्रांत १४ जानेवारीस येते म्हणजे सूर्याचे मकर संक्रमण त्या दिवशी होते. तर उत्तरायण २२ डिसेंबरला होते. म्हणजे मकर संक्रांतीचा सण आपण उत्तरायणानंतर साधारण २२ ते २३ दिवसांनी साजरा करतो. सूर्याच्या मकर संक्रमणाच्या दिवशी तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम या गोष्टीला आपण चिकटून राहिलो तर आणखी हजार वर्षांनंतर सूर्याचे मकर संक्रमण फेब्रुवारीस होऊ लागेल. उत्तरायण मात्र २२ डिसेंबरलाच होईल. उत्तरायण व मकर संक्रमण यातील तफावत मंद गतीने का होईना पण वाढेल हे निश्चित. काही हजार वर्षांचे जाऊ द्या. इ. स. २१०० नंतर संक्रांतीची म्हणजे मकर संक्रमणाची तारीख १६ जानेवारी होईल. तेव्हा संक्रांत सणाचा मूळ हेतू जर कायम ठेवायचा असेल तर मकर संक्रमणाचा आग्रह न धरता उत्तरायणाशी संक्रांतीची म्हणजे तिळगुळाची सांगड घातली पाहिजे.

हा सूज्ञपणा जनतेने दाखविला पाहिजे. जी गोष्ट स्वच्छ आणि वस्तुनिष्ठ आहे तिचा पाठपुरावा करणे हीच वैज्ञानिक दृष्टी आहे. रुळलेल्या, परंपरेने चालत आलेल्या गोष्टी सोडून देण्याची समाजाची मानसिकता नसते. त्यामुळे असे बदल सावकाश आणि विरोध सहन करून करावे लागतात. समाजाचे सांस्कृतिक, वैज्ञानिक किंवा अन्य कोणतेही नेतृत्व करताना समाजधुरिणांनी या बदलाच्या दृष्टीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

आणखी वाचा – Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया

राष्ट्रीय कॅलेंडर आणि उत्तरायण
आपल्या देशासाठी एक सौर कॅलेंडर आहे. मेघनाद साहा समितीने शिफारस केलेले हे कॅलेंडर आपल्या देशाचे अधिकृत कॅलेंडर आहे. या कॅलेंडरमधील महिने सौर असून त्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशी चांद्रमहिन्यासारखीच आहेत. या कॅलेंडरच्या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या विशिष्ट स्थितीवरून म्हणजे ऋतूवरून केली आहे. या कॅलेंडरनुसार पौष महिना नेहमीच उत्तरायणाच्या दिवशी सुरू होतो. इंग्रजी कॅलेंडरचे वर्ष ऋतूंशी समायोजित केले असले तरी महिन्यांची सुरुवात सूर्य स्थितीशी सुसंगत ठेवलेली नाही. त्यामुळे उत्तरायणाची सुरुवात २२ डिसेंबर या तारखेस होते, तर दक्षिणायन २२ जूनला सुरू होते. पण ही अधलीमधली तारीख आहे. राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये मात्र दक्षिणायनाची सुरुवात ही आषाढ महिन्याचीही सुरुवात (एक तारीख) असते. तेव्हा राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे १ पौष किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे २२ डिसेंबर हा उत्तरायणाचा दिवस निश्चित असल्याने संक्रांतीची सांगड उत्तरायणाशी घालणे उचित आहे. उत्तरायण हेच तिळगुळाचे खरे मूळ आहे हे लक्षात घ्यायला हवे.