ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी देशात मध्यावधी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मांडून सर्वानाच जोरदार धक्का दिला. गेल्या बुधवारी ब्रिटिश संसदेने त्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार आता तेथे येत्या ८ जून रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील. वास्तविक ब्रिटनमध्ये दोन वर्षांपूर्वीच म्हणजे २०१५ साली निवडणूक झाली. या नव्या सभागृहाचा कालवधी २०२० पर्यंत आहे. परंतु सध्या तेथे ‘ब्रेग्झिट’ म्हणजे ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया जोर धरू लागली आहे. ती पूर्ण होईपर्यंत देशात स्पष्ट बहुमत असलेले प्रबळ सरकार असले पाहिजे, असा युक्तिवाद करत थेरेसा मे यांनी हा निवडणुकीचा घाट घातला आहे. या निर्णयाने आधीच संकटात असलेल्या ब्रिटनला अधिक स्थिर व सक्षम सरकार मिळेल, की एके काळी जगावर सत्ता गाजवल्याचा गर्व बाळगणाऱ्या या माजी महासत्तेची आणखीच वाताहत होईल, हा प्रश्नच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा