वृषांक हा आमचा मुलगा गोरेगाव (प.) येथील डोसीबाई जिजीभॉय प्राथमिक शाळेमध्ये दुसरीत शिकत आहे. आम्हा दोघांचेही शिक्षण मराठी माध्यमिक शाळेतच झाले. वृषांकला मराठी माध्यमात घालण्याबद्दल आमच्या घरात दुमत नव्हतेच. वृषांकच्या आजी-आजोबांचीही आम्हाला साथ मिळाली. वृषांकची आजी तर स्वत: महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मराठी शाळेत शिकूनसुद्धा चांगली प्रगती करता येते हे आम्ही स्वानुभवावरून सांगू शकतो (वृषांकचे बाबा सनदी लेखापाल आणि आई मीडिया प्रोफेशनल आहे.).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आता थोडेसे वृषांकच्या शाळेबद्दल. डोसीबाई जिजीभॉय प्राथमिक शाळेत मुलांच्या सर्वागीण विकासासाठी विविध आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. शाळेच्या पहिल्याच पालक सभेत पालकांना सांगितले जाते, की तुमच्या पाल्याच्या अभ्यासाची जबाबदारी ही शाळेची आहे. शाळेत वर्षांतून एकदा पालकांची कार्यशाळा घेतली जाते. वर्षभरात शाळा मुलांकडून कशापद्धतीने अभ्यास करून घेणार आणि पालकांनीही काय करावे, काय करू नये यासंदर्भात पालकांची ही दोन तासांची शाळाच असते. एकूणच आम्ही आमच्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याबाबत आणि त्याच्या शाळेतील प्रगतीबाबत खूपच समाधानी आहोत. – विक्रांत व तृप्ती बासुतकर, गोरेगाव (प.), मुंबई</strong>
मातृभाषेला पर्याय नाही
महाविद्यालयीन जीवनापासून माझे स्वत:चे मराठीवर नितांत प्रेम आहे आणि इंग्रजीवर प्रभुत्व. म्हणूनच पदवीसाठी मराठी आणि इंग्रजी वाङ्मय हे विषय निवडले होते. माझे पहिले मूल शाळेत घालायचे तेव्हा इंग्रजी की मराठी शाळेत यावर आम्हा पती-पत्नीमध्ये बरीच चर्चा झाली. व्यक्तीच्या सर्वागीण विकासासाठी मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे, असे विचार ऐकलेले होते. बाहेरच्या जगात वावरताना हेच लक्षात येत गेले की, इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून गरजेची आहे, परंतु शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेला पर्याय नाही. म्हणूनच माझ्या दोन्ही लेकरांना मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आज माझा मुलगा बी.एस्सी. करतोय, तर मुलगी शर्मिष्ठा वसमतच्या प. पू. योगानंद विद्यालयात सातव्या इयत्तेत शिकत आहे. मी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल समाधानी आहे. – संगीता देशमुख, वसमत (हिंगोली)
न्यूनगंडाचा प्रश्नच नाही!
ज्याला मातृभाषेचा अभिमान, त्याचीच प्रगती होते छान, यावर माझा विश्वास असल्यामुळे मी व माझ्या पतीने दोन्ही मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेतच टाकण्याचा निर्णय घेतला. नौपाडय़ातील सरस्वती शाळेत माझ्या मोठय़ा मुलीचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. ती आता अभियांत्रिकी शिकत आहे. छोटी मुलगी आठवीत आहे. ती शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेते, बक्षिसे मिळवते. मराठी भाषेबरोबरच ती चांगल्या प्रकारे इंग्रजीही बोलू शकते. मराठी शाळेत टाकले की मुलांना पुढे महाविद्यालयीन जीवनात न्यूनगंड येतो असे बऱ्याच जणांना वाटते; पण ज्यांना मातृभाषेबद्दल अभिमान आहे ते कधीच अशा न्यूनगंडाला बळी ठरणार नाहीत. अशी खूप उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. – सानिका ज्यो. कुप्टे, पाचपाखाडी, ठाणे</strong>
मातृभाषेतून शिकण्याचा फायदा..
आम्ही दोघेही मराठी माध्यमातून शिकलो. आज एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करीत आहोत. आम्ही मराठी माध्यमातून शिकूनही इंग्रजीच्या स्पर्धेत यशस्वी होऊ शकतो, तर आमची मुलगी सई का नाही मोठी होऊ शकणार? या विचारानेच आम्ही आमच्या सईला मराठी माध्यमाच्या सुविद्यालय, बोरिवली या शाळेत घालण्याचे ठरविले. ती आता पाचवीत आहे, तर मुलगा त्याच शाळेत पूर्व प्राथमिक वर्गात आहे. विशेष म्हणजे सईला गेल्या वर्षी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळाले. मातृभाषेतून मुले शिकत असतील, तर ती अन्य भाषाही लवकर आत्मसात करू शकतात, हे आमच्या लक्षात आले. – पल्लवी प्रसाद भुजबळ, बोरिवली
तरीही आम्ही ‘मराठी’चा निर्णय घेतला!
माझ्या पहिला मुलगा अर्णवचं शाळेत जाण्याचं वय झालं तशी स्वाभाविक चर्चा सुरू झाली. मी स्वत: डॉक्टर. त्यात कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण. त्यामुळे माझ्या पहिल्या मुलाचे, अर्णवचे शाळेत जाण्याचे वय झाले, तशी चर्चा सुरू झाली की शाळा सीबीएसई की आयसीएससी? पण मी आणि माझ्या नवऱ्याने अर्णवला मराठी माध्यमातून शिकवायचे असे ठरवले. मित्रमैत्रिणींचे टोमणे, नातेवाईकांचे खडे बोल हे सर्व ऐकत जोगेश्वरीमधील अस्मिता विद्यालयात अर्णवला प्रवेश घेतला. तो आता तिसरीत शिकत आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतले की मुले आपले विचार सहजतेने व्यक्त करू शकतात. अर्णव वक्तृत्व स्पर्धा, श्लोक स्पर्धा अशा विविध शालेय उपक्रमांमध्ये भाग घेतो. अभ्यासाचा ताण कमी असल्यामुळे त्याला खेळामध्ये भाग घेण्यास वेळ मिळतो. शाळेत इंग्रजी विषय असल्यामुळे त्याचे इंग्रजी ज्ञानही चांगले आहे. अर्णवबरोबर यंदा माझ्या लहान मुलीचाही आम्ही अस्मिता विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे. आम्ही आमच्या निर्णयावर खूप खूश आहोत. – डॉ. स्वाती महादेव ठाकूर, जोगेश्वरी
इंग्रजीला नकार नाही, पण..
आम्ही सईला ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर या शाळेत, मराठी माध्यमात ठरवून याचसाठी घातले, की भाषांची सरमिसळ व्हायला नको. मातृभाषेतून शिक्षण होणे हे उत्तमच. मराठी माध्यमात असल्यामुळे शिक्षणाव्यतिरिक्त इतर चांगले संस्कारही तिच्यावर झाले आहेत. तिला भाषेची उत्तम जाण आहे. केवळ एक इंग्रजी भाषा चांगली यावी म्हणून सगळे विषय इंग्रजीतून शिकवणे आवश्यक नाही. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी यायला हवी याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे त्या भाषेची तयारी आम्ही तिच्याकडून करून घेत आहोतच. पाचवीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे सहजच ती भाषाही तिने अवगत केली आहे. तिचे बालपण आम्ही जपत आहोत. ते दप्तराच्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली चिरडून टाकणारे पालक आम्ही नाही. – प्राची डिंगणकर, ठाणे