डॉ. इन्द्र मणि

डिजिटल तंत्रज्ञान व त्यावरील संशोधनकरिता कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन नुकतेच परभणी कृषी विद्यापीठातील ५१ विद्यार्थी आणि २५ प्राध्यापकांनी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, थायलंड, ब्राझील, स्पेन, हंगेरी, जपान आदी देशात प्रशिक्षण पूर्ण केले. फरिदाबाद येथील ‘वॉव गो ग्रीन’ कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून, विद्यापीठात कस्टम हायरींग सेंटरची करण्यात येणार आहे. या माध्यमातून फवारणी करिता ड्रोन भाडेतत्वावर सेवा पुरविण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. मे २०२४ पासून मराठवाड्यातील दहापेक्षा जास्त गावांमध्ये ड्रोन फवारणीचे शेतकरी बांधवांच्या शेतात प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे शेतीतील या प्रयोगाकडे यशाचे नवी पायरी म्हणून पाहिले जात आहे.

Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
donald trump kamala harris presidential debate
अग्रलेख : वीज म्हणाली…
Mahendra Thorve bodyguard beaten man
Mahendra Thorve : “शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची भर रस्त्यात एकाला रॉडने मारहाण, चिमुकल्यांचा टाहो”, ठाकरे गटाकडून VIDEO व्हायरल
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?

कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. शेतीत विविध बदल होऊ लागले आहेत. शेती अनेक कामे कष्टप्रद आहेत, त्यातील कष्ट कमी व्हावेत आणि उत्पादकताही वाढावी या दृष्टीने डिजिटल तंत्रज्ञानावर जगभरात संशोधन सुरू आहे, यात राज्यातील कृषी विद्यापीठांचे प्रयत्न सुरू आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून डिजिटल शेती तंत्रज्ञान संशोधनास चालना मिळाली आहे. यात शेतीत रोबोट, ड्रोन तंत्रज्ञान आणि स्वयंचलित यंत्रे संशोधनावर भर देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये भारतात विशेषत: स्वयंचलित हवाई यंत्रणेचा (ड्रोन) वापर वाढत आहे. देशात आणि महाराष्ट्रातील अनेक माध्यमातून ड्रोन वापराची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. येणाऱ्या काळात शेतीतील वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर वाढणार आहे.

आणखी वाचा-शिक्षणात पुढे जाताना…

शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून ड्रोनचा वापर भविष्यात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. ड्रोनव्दारे विविध प्रकारचे सेन्सर्स, उच्चतम प्रतीचे कॅमेरे, नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, सॉफ्टवेअर प्रोग्राम वापर करून अनेक कार्य आपण करू शकतो. ड्रोन शेतीसाठी अधिक अचूक माहिती देऊ शकतो. त्या आधारे सॉफ्टवेअरच्या मदतीने पृथ्थकरण करून शेती उपयुक्त माहिती तयार करता येते. याचा वापर हा प्रामुख्याने पीक फवारणी, पीक निरीक्षण, पीक वाढीचे मूल्यांकन, ड्रोन परागीकरण, तण व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन, पक्षापासून संरक्षण, पिकांची देखरेख, माती विश्लेषण अशा विविध अंगाने करता येतो. यामुळे खत, पाणी, बियाणे, कीटकनाशके यांसारख्या निविष्ठाचा प्रभावी व काटेकोर वापर करणे शक्य होणार आहे. सरसकट खते, कीटनाशक याचा वापर न करता सेन्सरच्या मदतीने आवश्यक ठिकाणी व योग्य वेळी वापर झाल्याने निविष्ठांचा अकारण होणारा भरमसाठ वापर टाळला जाऊ शकतो. त्यामुळे सहज डेटा गोळा होत असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होते. ड्रोन वापरून हवाई फवारणी केल्याने मोठ्या प्रमाणात वेळ आणि श्रमाची बचत होऊन मोठ्या भागावर फार कमी कालावधीत कमी कीटकनाशकात व कमी पाण्यात प्रभावी फवारणी करणे शक्य आहे. मजूर टंचाईवर उपाय म्हणूनही ड्रोन तंत्रज्ञानाकडे पाहण्यात येत आहे.

काही वेळेस मनुष्याच्या आणि जमिनीवरील यंत्राव्दारे फवारणी करणे शक्य होत नाही, तेव्हा ड्रोनद्वारे फवारणी केली जाऊ शकते. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी निविष्ठांचा सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रभावी वापर करणे शक्य आहे. भविष्यात रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव शोधणे, पीक आरोग्य निरीक्षण, लक्ष्यित निविष्ठांचा वापर आणि पीक उत्पादन आणि पीक नुकसानाचे जलद मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र किंवा मजुराव्दारे फवारणी करण्यास जास्त वेळ लागतो. सुरक्षिततेचे उपाय न केल्यास अनेक कीटकनाशकांमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते, तसेच जीव दगावण्याची दाट शक्यता असते. ड्रोनव्दारे फवारणी केल्यास जीवितहानी नक्कीच टाळू शकते. बराच वेळेस पिकांच्या अतिरिक्त वाढीमुळे शेतात पायही ठेवता येत नाही, मराठवाड्यात विशेषत: सोयाबीन पिकात अशी स्थिती काही वेळेस येते. या परिस्थितीत ड्रोन फवारणी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

आणखी वाचा-Marathwada Liberation Day : ज्वलंत मराठवाडा, अस्वस्थ तरुणाई

शेतीत ड्रोन वापराबाबत तज्ज्ञ समितीची स्थापना

देशात २०२० मध्ये काही भागांत टोळ किडींचा प्रादुर्भाव झाला तेव्हा त्या वेळी ड्रोन तंत्रज्ञानाची गरज भासली होती, तेव्हापासून कृषी क्षेत्रात ड्रोन वापराकरिता संशोधनात्मक कार्यास सुरुवात झाली. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने शेतीत ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय धोरण ठरविण्याकरिता विविध समितींचे गठण करण्यात आले. यात प्रथम डॉ. के. अलगुसुदरम यांच्या अध्यक्षेतखाली समिती नेमण्यात आली, या समितीचे समन्वयक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ड्रोनव्दारे माती आणि पीक अन्नद्रव्याच्या वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी दुसरी समिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. त्यांचा अहवाल कृषी मंत्रालयाने स्वीकारला. त्यानंतर पिकनिहाय ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीकरिता प्रमाणित कार्य पद्धती (एसओपी) निश्चित करण्यासाठी डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली जुलै २०२२ मध्ये उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले. या समितीने दहा पिकनिहाय ड्रोनद्वारे फवारणीबाबत प्रमाणित कार्य पद्धती निश्चित करून मसुदा अहवाल मंत्रालयास सादर केला. हा मसुदा अहवालाचे २० एप्रिल २०२३ रोजी केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ड्रोनद्वारे विविध स्वरूपातील मृदा व पीक अन्नद्रव्य वापराबाबत डॉ. इन्द्र मणि समिती कार्य करीत आहे.

दहा पिकांकरिता प्रमाणित कार्य पद्धती

राष्ट्रीय समितीने सोयाबीन, कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमुग, तुर, करडई, तीळ आदी दहा पिकांत ड्रोनचा वापराची प्रमाणित कार्य पद्धती निश्चित केली असून ड्रोन फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबतची मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. कोणकोणती कीटकनाशके, बुरशीनाशके ड्रोन फवारणीस उपयुक्त आहेत, त्याचे वापरावयाचे प्रमाण, ड्रोन उडण्याचा योग्य वेग व उंची, पाण्याचे प्रमाण, नोझलचा प्रकार, फवारणी करिता योग्य हवामानाची स्थिती, पिकांच्या कोणत्या वाढ अवस्थेत ड्रोनचा वापर करावा आदींबाबतचे मार्गदर्शक तत्व दिली आहेत. ड्रोनद्वारे फवारणी करताना शेतीतील मित्र किडी व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. सोयाबीन सारख्या स्वपरागित पिकांमध्ये फुलोरा अवस्थेते ड्रोनव्दारे फवारणी टाळण्यात यावी अन्यथा पिकांचे नुकसान होऊ शकते. पिकांवर कीटकनाशकांची ड्रोनव्दारे फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी केल्यास जास्त प्रभावी ठरते, दुपारी कीटकांच्या अळ्या मातीत लपलेल्या असतात. तसेच वाऱ्यांचा वेग जास्त असल्यास, उष्ण वातावरणात, एक ते दोन दिवसांत पावसाची शक्यता असताना ड्रोनद्वारे फवारणी न करण्याची शिफारस करण्यात आली आहे. फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्यास पर्यावरण दूषित होऊ शकते. या सर्व बाबी ड्रोन चालकांस माहिती असणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-विकसित भारताचा रस्ता छत्रपती संभाजीनगरातून

ड्रोनचा वापर हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. शासकीय स्तरावर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यावर अनुदानव्दारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित येऊन ड्रोन खरेदी करणे शक्य आहे. गावागावांत ड्रोन भाडेतत्वावर देणारे सुविधा केंद्र सुरू करणे शक्य आहे. ड्रोनचा वापर अधिक सुलभ व्हावा, यासाठी शेतकरी आणि सुशिक्षित तरुणांना केंद्र सरकारच्या काही निवडक कृषी यंत्रणा प्रशिक्षण व चाचणी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्यातील कृषी विद्यापीठांकडून ड्रोन चालकांचे प्रशिक्षणही दिले जात आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात लवकरच ड्रोन स्कूल स्थापन करून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर ड्रोनव्दारे नॅनो युरिया व इतर अन्नद्रव्य फवारणी बाबत संशोधनाचे कार्य परभणी कृषी विद्यापीठ, इफको कंपनी व देशातील अगग्रण्य कृषी विद्यापीठ राबवित आहेत.

शेतीत ड्रोन वापराबाबत परभणी कृषी विद्यापीठाचा पुढाकार देशातील खासगी ड्रोन कंपनीशी परभणी कृषि विद्यापीठाने सामजंस्य करार केले असून परभणी कृषी विद्यापीठाने पाच ड्रोन खरेदी केली आहेत. विविध प्रकारचे ड्रोन प्रकल्पांतर्गत खरेदी करण्यात आले आहेत. याचा उपयोग ड्रोन तंत्रज्ञान संशोधन करण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञान व त्यावरील संशोधन करिता मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन नुकतेच परभणी कृषी विद्यापीठातील ५१ विद्यार्थी आणि २५ प्राध्यापकांनी अमेरिका, कॅनाडा, आस्ट्रेलिया, मलेशिया, थायलंड, ब्राझील, स्पेन, हंगेरी, जपान आदी देशांत प्रशिक्षण पूर्ण केले. फरिदाबाद येथील वॉव गो ग्रीन कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला असून विद्यापीठात कस्टम हायरींग सेंटर करण्यात येणार आहे. या माध्यमातून फवारणीसाठी ड्रोन भाडे तत्वावर सेवा पुरविण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. मे २०२४ पासून मराठवाड्यातील दहा पेक्षा जास्त गावामध्ये ड्रोन फवारणीचे शेतकरी बांधवाच्या शेतात प्रात्यक्षिके घेण्यात आली, यास शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. परभणी कृषी विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था लवकरच उभारण्यात येणार आहे.

(लेखक हे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तर सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण कापसे यांनी सहलेखन केले आहे.)