‘जेमतेम शिलकी’चा सन २०१३-१४ या वर्षांचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात २० मार्चला मांडला, पण काय स्वस्त झाले, काय महागले, याचीदेखील चर्चा फारशी झाली नाही. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत जनमानसात एवढी उदासीनता असण्यामागील कारणांचा मागोवा घेण्याचे ‘लोकसत्ता’ने ठरविले. अर्थसंकल्पात दडलेल्या सामान्य माणसाच्या मनातील अपेक्षांचा शोध घेण्याची मानसिकता कमी होऊ लागली आहे. ही मानसिकता पुन्हा जागी व्हावी यासाठी अर्थसंकल्पाचे पदर उलगडून तो सोपा करण्याच्या प्रयत्नांना ‘लोकसत्ता अर्थचर्चा’ कार्यक्रमात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि अर्थसंकल्पाचा शोध सोपा होऊन गेला. अर्थसंकल्पातील कोटय़वधींच्या रकमांचे आकडे समाधान पसरविणारे दिसत असले, तरी काही तुपाशी आणि काही उपाशी हा न्याय सातत्याने अर्थसंकल्पात उमटत असल्याची भावना इथे उघडपणे व्यक्त झाली. राजकारण आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज्याच्या सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पाचे विभागवार विश्लेषण केले, तेव्हा याच असमतोलाचे चित्र त्यांनाही अस्वस्थ करून सोडणारे आहे, ही बाब या निमित्ताने राज्यासमोर आली..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा