‘कॅसेट’चे युग अस्तारंभावर आलेली १९९७-९८ ही वर्षे. जगभरात तबलावादक म्हणून फार पूर्वीच जनप्रिय झालेल्या झाकीर हुसेन या नावाच्या ‘वाह ताज बोलिये…’च्या जाहिरातीचे प्रायोजित कार्यक्रमांत घराघरांत आस्वादन सुरू होऊन तेव्हा बरीच वर्षे झालेली. अशात या तबला उस्तादाचे वेगळे रूप चित्रसंगीतात ‘आकंठ’ वगैरे की काय बुडालेल्या भारतीयांना ऐकायला मिळाले, सई परांजपे यांच्या ‘साज’ चित्रपटाच्या निमित्ताने.

लता-आशा या गानभगिनींच्या आयुष्यावर आधारलेल्या ‘साज’मध्ये झाकीर हुसेन यांची संगीतकार आर.डी.बर्मन यांच्या प्रतिमेशी जुळती भूमिकादेखील पाहायला मिळते. ‘साज’मध्ये संगीतकारांच्या नामावळीत झाकीर हुसेन यांच्या बरोबरीने भूपेन हजारिका, राज कमल आणि यशवंत देव ही नामावळीही दिसते. यातील दहापैकी दोन गाण्यांपुढे संगीतकार म्हणून ठळक नाव होते ते झाकीर हुसेन यांचे. तोपर्यंत रेहमानचे संगीत सर्वसामान्य नागरिकांच्या कानपटलावर स्थिरावले होते. नदीम-श्रवण अस्तपर्वातील ‘परदेस’ वगैरेची, ‘दिलसे’तली सारी गाणी देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यांत वाजत होती. ती दरडोई तशी वाजणे ‘संगीतदर्दी’पणाची पावती मानली जाई. त्या जोडीला जतिन-ललित जोडगळीच्या तुटण्यापूर्वीचे ‘कुछ कुछ होता है’, ‘प्यार तो होना ही था’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘गुलाम’ या चित्रपटांचीच गीते रेडिओ-एमटीव्हीवरून चोवीस तास घुमत होती. फार तर अन्नू मलिक यांच्या पोतडीतून निघालेल्या ‘छम्मा-छम्मा’चे काही प्रेमी असतील. तर या साऱ्या सांगीतिक गोंगाटाच्या ‘रोंबाटा’त गाण्याच्या शब्दांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो ‘साज’ या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांना. ती गाणी आज शोधून ऐकली तर झाकीर हुसेन यांचा त्यावरचा आधुनिक स्पर्श सर्वार्थाने कळू शकेल. ‘सुनने वाले सुन लेते है कणकणमे संगीत’ आणि ‘क्या तुमने ये कह दिया’ ही ती दोन गाणी. ‘सुनने वाले’ गाण्यातील हुसेन यांचे ताल-स्वरप्रयोग स्वयंपाकघरातील भांड्यांच्या आवाजापासून निसर्गातील प्राणी- पक्षी- कीटकांपर्यंत चार मिनिटे १९ सेकंद सुरू राहतात. शास्त्रीय- सुगम- लोकसंगीत असला मिलाफ या गाण्यांमध्ये दिसतो. म्हणजे लगदा दर्जाच्या साहित्याला अभिजात दर्जाच्या प्रकारात मिसळण्यासारखा हा अचाट उद्याोग.

Zakir Hussain a pioneer of Indian music passes away
झाकीर हुसेन- सर्जक तालदूत!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Loksatta editorial pay tribute to tabla legend ustad Zakir Hussain
अग्रलेख: आला नाही तोवर तुम्ही…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

हेही वाचा >>>तालदूत

तसा हा अचाट उद्याोग त्यांनी जगभरातील अनेक कलाकारांसह सादरीकरणात केला. २००९ साली ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’ या अल्बमअंतर्गत अमेरिकी, नायजेरियन आणि दक्षिण अमेरिकी तालवादकांसह हुसेन यांनी सादर केलेली गाणी यूट्यूब या सुलभ माध्यमावर पाहायला मिळतात. (‘बाबा’ या नावाचे तालसंगीत त्यातल्या बोलांसह ऐकता येते) हुसेन यांना या कामासाठी पहिल्यांदा ग्रॅमी मिळाले. त्यानंतर त्यांची असलेली ‘ग्लोबल पत’ आणखी वधारली. त्यानंतर पुढल्याच वर्षी म्हणजे २०१० साली यो-यो मा या फ्रेंच-अमेरिकी चेलोवादकाबरोबर त्यांनी सादर केलेल्या वाद्यागीताला २०१० सालचे ग्रॅमी मिळाले. यंदाच्या वर्षी एकदम तीन ग्रॅमी मिळालीत, त्यातील महत्त्वाचे अमेरिकी सिन्थेटिक बँजोवादक (बेंजोलिन) बेला फ्लेक, बासरीपटू राकेश चौरासिया आणि बेसप्लेअर (खर्जवाद्या) एडगर मेअर यांच्या एकत्रीकरणातून साकारलेल्या ‘अॅज वी स्पीक’ अल्बममधील वाद्यागीत. लिटिल बुद्धा, द मिस्टिक मॅसूर, मिस्टर अॅण्ड मिसेस अय्यर या चित्रपटांमधील संगीत असो, साजमधील गाणी असोत किंवा आंतरराष्ट्रीय पटलावरील बहुतांश वादकांबरोबर त्यांनी केलेले ‘फ्यूजन’ – यापैकी काहीच भारतीय कानसेनांपर्यंत जितके पोहोचायला हवे, तितके अद्याप तरी पोहोचलेले नाही. याची कारणे संगीतातील कलाकारांचे देव्हारे बनविण्याच्या आपल्याकडील वृत्ती-प्रवृत्तीत बरीच दडली आहेत. ‘वाह उस्ताद’ म्हणत त्यांच्या मृत्यूबाबत माध्यमांतून कढ काढणाऱ्यांनी आता तरी त्या महत्तेचा परिचय करून घ्यावा. तीच या तबला उस्तादाला उचित आदरांजली ठरेल.

Story img Loader