मलेशियन एअरलाइन्सचे बिजिंगला जाणारे प्रवासी विमान ८ मार्चपासून बेपत्ता झाले असून विविध देशांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. अपघात, घातपात ते अपहरण अशा अनेक शक्यता या विमानाच्या गायब होण्यासंबंधी व्यक्त होत आहेत. त्याचा हा ऊहापोह..
सॅटेलाइट सíव्हलन्स आणि कम्युनिकेशन्स, रडार कव्हरेज, यूएचएफ आणि व्हीएचएफ रेडिओ कम्युनिकेशन्स, स्वयंचलित बीकन्स, जीपीएस, कॉम्प्युटर कम्युनिकेशन सिस्टीम, प्रायमरी आणि सेकंडरी रडार किंवा निगडित विमानातील ट्रान्सपॉण्डर यंत्रणा, एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स अॅड्रेसिंग व रिपोर्टिग सिस्टीम (एसीएआर), ओमेगा नॅव्हिगेशन सिस्टीम आणि शेवटी वैमानिकांचे व प्रवाशांचे सेल/सॅटेलाइट फोन वगरे एकाहून एक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेल्या या युगात या सर्व यंत्रणांचा जगभर
वस्तुस्थिती
मलेशियन एअरलाइन्सच्या एम एच ३७० या क्वालालम्पूरहून बिजिंगला जाणाऱ्या विमानाने ८ मार्च रोजी रात्री उड्डाण केले. साधारण ४० मिनिटांनंतर विमान साधारणपणे ३६ हजार फूट उंचीवर आणि व्हिएटनामच्या हवाई हद्दीजवळ पोहोचण्यास आले असावे. या ठिकाणी विमानातील ट्रान्सपॉण्डर यंत्रणा व रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा बंद केली गेली. त्याआधी वैमानिकांनी रीतसर मलेशियाच्या ग्राऊंड कंट्रोलशी संपर्क साधून आपली पोझिशन व सर्व काही सुरळीत अन् पूर्वयोजनेनुसार (फ्लाइट प्लॅनप्रमाणे) चालले आहे असे कळवले होते आणि ‘गुड नाइट’ही म्हटले होते. साधारणपणे या संभाषणाच्या वेळी विमानाने अचानक ४५ हजार फूट उंचीवर झेप घेतली. नंतर एक वळण घेत विमानाने २३ हजार फूट उंचीपर्यंत खाली सूर मारला. ही माहिती संशोधकांना मिलिटरीच्या आणि सिव्हिलच्या सíव्हलन्स रडार व्यवस्थेकडून नंतर मिळाली. (एअर डिफेन्स व सिव्हिलची ही सíव्हलन्स रडार यंत्रणा प्रायमरी रडार वर्गामध्ये मोडते. त्यासाठी ट्रान्सपॉण्डर यंत्रणेची गरज नसते. ट्रान्सपॉण्डर विमानात बसवलेली सेकंडरी रडार सिस्टीम असते व जमिनीवरील रडारकडून संदेश आला की ही यंत्रणा आपोआप विमानाचे आयडेंटिफिकेशन, पोझिशन, उंची, वेग वगरे माहिती उत्तरादाखल पाठवते. याउलट प्रायमरी रडार विमानाच्या अंगावरून परावर्तित झालेल्या रेडिओ एनर्जीचे पृथक्करण करून ही माहिती गोळा करते. त्यासाठी विमानाकडून प्रतिसादाची अथवा सहयोगाची जरुरी नसते.) विमानाच्या या हालचाली ठरवलेल्या उड्डाणयोजनेप्रमाणे नव्हत्या, परंतु त्या संगणकाने नियंत्रित केल्या गेल्या होत्या. तेव्हा कॉम्प्युटरमध्ये हा वेगळा फ्लाइट प्लॅन) कुणी आणि कसा घातला?
यापुढे विमानाकडून माहिती मिळणे बंद झाले, कारण विमानातील ट्रान्सपॉण्डर व रेडिओ यंत्रणा बंद केली गेली होती. तरीसुद्धा दर तासाभराने एसीएआरतर्फे सॅटेलाइट्सना िपग मात्र मिळत होते. कारण एसीएआर ही यंत्रणा कॉकपिटमधून बंद करता येत नाही. पण ‘एसीएआर’कडून माहिती ही फार थोडी मिळते. पोझिशन, उंची, वेग वगरे गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे अंदाजे निष्कर्ष काढावे लागतात. तरीही केवळ िपग्जच्या आधारावर विमान एक तर तिबेटवरून कझाकिस्तानकडे किंवा अंदमानच्या बाजूने िहदी महासागराच्या दक्षिण कोपऱ्याकडे गेले असावे, असा अंदाज संशोधकांना बांधता आला. तसेच ते विमान शेवटच्या रेडिओ संपर्कानंतर पाच-सहा तास तरी आकाशात उडत होते ही माहितीही मिळाली. या माहितीवरून गोळाबेरीज करून विमानाच्या शोधासाठी िहदी महासागराच्या दक्षिण कोपऱ्याकडे लक्ष वळवण्यात आले. या वर्णनात लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहा तासांच्या उड्डाणात वैमानिकांनी एकही डिस्ट्रेस सिग्नल दिलेला नाही.
काय घडले असावे?
१. विमानाचे अपहरण झाले असावे. कुणी केले? विमान तर सापडत नाही. शिवाय कुठल्याही अतिरेकी संघटनेने याबाबतीत काही विधान केलेले नाही. असो. विमानातील दोन इराणी प्रवासी चोरलेल्या आणि खोटय़ा पासपोर्टवर प्रवास करत होते खरे. अर्थात ते दोघे संशयाच्या फेऱ्यात सापडतात. पण चौकशीअंती दोघांच्या बाबतीत अतिरेकी संघटनांशी संबंध कुठेच मिळाला नाही. आश्चर्य म्हणजे वैमानिक कॅप्टन झहारी अहमद शाह यांचेच वागणे संशयास्पद ठरते आहे. त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे त्यांनीच बनवलेला एक फ्लाइट सिम्युलेटर मिळाला. या सिम्युलेटरमध्ये दक्षिण हिंदी महासागरातील पाच विमानतळांचे आराखडे व माहिती मिळाली. त्यात मालदीव बेटावरील विमानतळाचाही समावेश आहे. मालदीव बेटावरील काही लोकांनी त्या दिवशी एक मोठे जेट विमान अगदी खाली समुद्रसपाटीनजीक
२. अपहरणाची आणखी एक शक्यता बोलली जाते. ती म्हणजे अपहरणकर्त्यांनी विमानास तिबेटवरून कझाकिस्तानकडे किंवा त्या बाजूने अफगाणिस्तानमध्ये नेले. अथवा भारताच्या दक्षिण सीमेकडून व नंतर पाकिस्तानमधून विमान अफगाणिस्तानमध्ये नेले गेले. तसे काही झाले नाही हे मी खात्रीलायकपणे म्हणेन. पाकिस्तानात तर नाहीच पण अफगाणिस्तानातसुद्धा तालिबानच्या हातात एकही असा विमानतळ नाही की ज्यावर एवढे मोठे विमान उतरू शकेल. एखाद्या दूरस्थ जागी सरकारच्या गुप्त परवानगीने जर विमान उतरवले गेले असेलच तर त्याचा आत्तापर्यंत पत्ता लागला असता व वाटाघाटी सुरू झाल्या असत्या. परंतु त्या दिशेने जाताना ते विमान त्या अक्राळविक्राळ पर्वतराजींमध्ये कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी तसे नक्कीच झाले नसावे, कारण अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या तालिबानकडे या विमानाचे अपहरण करण्याची हिम्मत येणार कुठून? या विमानात बहुसंख्य प्रवासी चिनी लोक होते आणि चीनशी पंगा घ्यायची ताकद दोघांकडे नाही. तेव्हा विमान या दिशेने आलेच नसावे असे माझे मत आहे. शिवाय भारताच्या काय किंवा चीनच्या बाजूने काय, लष्करी रडारला चुकवून जाणे एवढय़ा मोठय़ा विमानाला अशक्य आहे. कारण दोन्ही देशांची वायू सेना सतर्क आहे.
३. विमानात कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे वैमानिकांची सारासारविचार करण्याची शक्ती हरवली. त्यामुळे त्यांनी अनेक चुका केल्या व शेवटी बेशुद्ध झाले. विमानाचे इंधन संपल्यावर विमान समुद्रात कोसळले.
४. लिथियम बॅटऱ्यांनी स्फोट करून पूर्वीही आगी लावल्याची उदाहरणे आहेत. तसेच विषारी वायू सोडलेले आहेत. तेव्हा हे कारण नाकारता येत नाही, पण मग वैमानिकांनी कुठल्या तरी जवळच्या विमानतळावर आणीबाणीच्या अवस्थेत उतरवले असते. ते विमान घेऊन भलतीकडे कशाला जातील?
५. वैमानिकांची आत्महत्या- वैमानिकांना आत्महत्याच करायची असेल तर उड्डाणानंतर लगेच विमान जमिनीत घुसवता आले असते. त्यासाठी विमान सहा तास उडवायची गरज नव्हती. शिवाय स्वत: मरण्यासाठी कुणी इतक्या लोकांच्या मृत्यूचे पातक आणि तेसुद्धा देवाकडेच जाताना आपल्या डोक्यावर का घेईल?
६. याशिवाय घातपाताची शक्यता हल्लीच्या जगात नेहमीच असते, पण अजून तरी बॉम्बस्फोट झाल्याचे काही दुवे सापडलेले नाहीत. शिवाय अशा प्रकारच्या घातपाताने कुणाला काय मिळाले असते? कुणीही अजूनही काहीच दावा केलेला नाही. त्यामुळे कुणालाच कसलीही प्रसिद्धी नाही. कुणी कुणावर सूड उगवल्याचे दुवेही सापडलेले नाहीत.
७. अपघात- अपघातात स्फोट किंवा विमानाचा दरवाजा उडून जाणे वगरे प्रकार होऊ शकतात व विमान खाली कोसळू शकते. पण मग फ्लाइट प्लॅन बदलणे, रडार डिटेक्शन टाळणे, विमानातील ट्रान्सपॉण्डर यंत्रणा व रेडिओ यंत्रणा बंद करणे यांचे संबंध जुळत नाहीत. समजा विमानाच्या सर्व संपर्क यंत्रणा काही कारणांनिमित्त नादुरुस्त झाल्या असतील तर वैमानिकांनी सेल फोनद्वारे संबंध साधला असता आणि निदान ‘मे डे’ हा डिस्ट्रेस कॉल तरी दिला असता. पण विमानाने एकही डिस्ट्रेस कॉल दिलेला नाही. सहा तासांत काय समस्या आहे याचे आकलन वैमानिकांना झाले नाही आणि काय करावे या बाबतीत ते योग्य तो निर्णय घेऊ शकले नाहीत ही गोष्ट अशक्यप्राय आहे.
८. मग शेवटी झाले तरी काय? या प्रदेशात उडण्याचा अनुभव असलेले माजी पायलट ख्रिस गुडफेलो म्हणतात की, जर विमानाच्या टायरना आग लागली असेल व ते विषारी वायू कॉकपिटमध्ये तसेच विमानाच्या आत पोचले असतील तर वैमानिकाने इमर्जन्सी लॅण्डिंगसाठी जवळात जवळ आणि उंच अडथळ्यांविरहित असा (क्वालालम्पूरला जाण्यासाठी विमानाला ८००० फूट उंचीचे पर्वत ओलांडणे भाग पडले असते) पलाऊ लांगकवी नामक विमानतळ निवडला असेल. तेथे १३००० फूट लांबीची धावपट्टीदेखील आहे. या धावपट्टीसाठी थेट परवानगी देण्याची आज्ञा अनुभवी कॅप्टन शाह यांनी कॉम्प्युटरमध्ये नोंदवली असेल. म्हणूनच विमानाने कॉम्प्युटर कंट्रोल्ड डावे वळण घेतले व ‘पलाऊ लांगकवी’ विमानतळावर थेट मजल मारण्याची तयारी केली (विमानाचा अंदाजे काढलेला मार्ग या मुद्दय़ाला पुष्टी देतो). परंतु तोपर्यंत विषारी वायूमुळे दोन्ही वैमानिक घायाळ झाले असतील किंवा ते मरणसुद्धा पावले असतील (टायर फायरमुळे तसे होऊ शकते). प्रवाशांचीसुद्धा थोडी फार तशीच गत झाली असेल. त्यामुळे सेल फोनही शांतच राहिले. परिणामत: विमान खाली न उतरता ‘पलाऊ लांगकवी’ विमानतळास ओलांडून पुढे विचारहीनपणे अथांग िहदी महासागराच्या दिशेने उडतच राहिले. त्या दिशेने जाण्यात खरोखरच काहीही हशील नव्हते. कुठलाच भूप्रदेश त्या बाजूला जवळपास नव्हता आणि इंधन तर जळतच चालले होते. अखेर याच दिशेला आणखी पाच तास उड्डाण करून इंधन संपल्यावर विमानाने अलगद जलसमाधी घेतली असावी. ..मला तरी हे तर्कशास्त्र पटते आहे. प्रश्न एकच की वैमानिकांनी डिस्ट्रेस कॉल का दिला नाही? कदाचित ते घायाळ झाले असतील किंवा त्यांची सारासारविचार करण्याची शक्ती ऱ्हास पावली असेल अथवा याच वेळी आगीमुळे काही इलेक्ट्रिक यंत्रणा जळून जाऊन संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असेल. पण शास्त्राने कितीही प्रगती केली, एकावर एक बॅक अप असलेल्या धोकाविरहित यंत्रणा कितीही कामात आणल्या तरी मानवाला शेवटी नशिबाच्या फेऱ्यापुढे वाकावे लागते हेच खरे. मानवपुत्र मृत्यू हसत हसत पत्करतो, परंतु आपली हार कधीच मानत नाही. नशिबासहित सर्व शत्रूंशी सतत लढतच राहातो. म्हणूनच मानवपुत्र अजिंक्य आणि अभिजित आहे. पण मानवच मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे हेही तितकेच सत्य होय आणि या विमानाचा शोध लागल्यावर हीच सत्ये खरी ठरतील यात शंका नको.
(लेखक वायूसेनेचे निवृत्त विंग कमांडर असूनहवाई क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा