|| दत्ता पडसलगीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपले कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करणाऱ्या  देशातील सर्वच पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २१ ऑक्टोबर  हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने..

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या संतशिरोमणी तुकोबारायांच्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे केवळ आपल्या देशातील नव्हे तर थोडय़ाफार फरकाने जगभरातील सर्वच देशांतील पोलीस यंत्रणांची स्थिती आहे. आपल्या खंडप्राय देशाचा विचार करता कोणत्या ना कोणत्या प्रदेशामध्ये दर दिवशी एखाद-दुसऱ्या पोलीस जवानाला हौतात्म्य पत्करावे लागते.

आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करणाऱ्या आपल्या देशातील सर्वच पोलीस दलातील हुतात्मा अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘२१ ऑक्टोबर’ हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून आपल्या देशातील प्रत्येक पोलीस घटकामध्ये पाळण्यात येतो. २१ ऑक्टोबर या दिवसाला पोलिसांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी भारतीय पोलीस दलामधील सीआरपीएफ तथा केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० बहादूर पोलीस जवानांना देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राण गमवावे लागले. आपल्याजवळील अपुऱ्या साधनसामग्रीनिशी अद्ययावत शस्त्रसुविधांनी सुसज्ज असलेल्या बलाढय़ चिनी सनिकांशी ते लढले. लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग’ या समुद्रसपाटीपासून १५ हजार फूट उंचीवरील दुर्गम ठिकाणी बर्फाळ खिंडीमध्ये निकराने मुकाबला करीत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्या घटनेचे स्मरण म्हणून संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील पोलीस अधिकारी आणि जवान ‘हॉट स्प्रिंग, लडाख’ येथे प्रतिवर्षी २१ ऑक्टोबर रोजी जातात व त्यांना मानवंदना देतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे.

या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या देशामध्ये दरवर्षी कर्तव्य बजावीत असताना धारातीर्थी पडलेल्या सर्वच पोलीस अधिकारी आणि जवानांना ‘२१ ऑक्टोबर’ रोजी देशातील सर्व पोलीस घटकांमध्ये स्मृतिस्तंभासमोर एकाच वेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक हुतात्म्याच्या नावाचे स्मरण करून त्यांना मानवंदना दिली जाते.

आजवर देशभरात सुमारे ३५ हजारांहून अधिक पोलीस बांधवांनी कर्तव्य बजावताना प्राणांची बाजी लावून हौतात्म्य पत्करले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील ७७३ शूर पोलिसांचा समावेश आहे.

महाराष्ट्रामधील खासकरून नक्षलप्रवण क्षेत्रांमध्ये अनेक शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे तसेच २००८ मध्ये मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात काही पोलीस अधिकारी व शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या जवानांनी धर्य व अतुलनीय धाडस दाखवून पत्करलेल्या हौतात्म्याचेही दरवर्षी कृतज्ञ महाराष्ट्र व देश स्मरण करतो. या वर्षीच्या शहीद दिनी ज्यांच्या हौतात्म्याचे स्मरण प्रथमच केले जाईल असे महाराष्ट्रातील शूर पोलीस बांधव हे आहेत :

  • पोलीस हवालदार सुरेश दयाराम गावडे : गडचिरोली जिल्ह्य़ातील कुरखेडा येथील दुर्गम भागात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी पोलीस हवालदार सुरेश गावडे हे साथीदारासह कर्तव्यावर असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी झाले व त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
  • पोलीस हवालदार सुनील दत्तात्रय कदम : मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनील कदम हे ११ मे २०१८ रोजी कॅडबरी जंक्शन येथे नाकाबंदीसाठी कर्तव्य बजावताना दुचाकीवरून संशयास्पद तिघे जण जाताना त्यांना दिसले. त्यांची तपासणी करीत असताना ते पळून जाऊ जागले. पोलीस हवालदार सुनील कदम यांनी स्वतच्या जिवाची पर्वा न करता त्यांच्याशी झुंज दिली व त्यादरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीमुळे १९ मे रोजी उपचारादरम्यान ते मरण पावले.
  • पोलीस नाईक सतीश शरदराव मडावी : २७ मे २०१८ रोजी सकाळी सातच्या सुमारास सहायक पोलीस उपनिरीक्षक शामराव जाधव व पोलीस नाईक सतीश मडावी हे अमरावती जिल्ह्य़ातील मांजरखेडे गावाच्या शिवारात हातभट्टी दारूअड्डय़ावर धाड टाकण्यासाठी गेले होते. धाडीदरम्यान दारूभट्टीच्या साहित्यासह गावठी दारूची विल्हेवाट लावून परत येत असताना यातील आरोपींनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने व दगडाने जीवघेणा हल्ला केला. त्यात मडावी यांना हौतात्म्य प्राप्त झाले.

या तीनही घटना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांना जिवाची बाजी कशी लावावी लागते हे दर्शवितात. सध्या दारूभट्टीवरील धाड असो किंवा एरवी निरुपद्रवी वाटणारी नाकाबंदी असो, पोलिसांना सतत मृत्यूच्या छायेत वावरावे लागते. नक्षलवादाचा सामना करताना कदाचित पोलीस मृत्यूला सामोरे जाण्यास मनाने तयार असतात, परंतु अनपेक्षितरीत्यासुद्धा पोलिसांना कसे हौतात्म्य पत्करावे लागते याच्या वरील घटना निदर्शक आहेत.

ऑगस्ट व्होलमर यांनी पोलिसांच्या परिस्थितीचे केलेले हे वर्णन तंतोतंत खरे आहे :

The Policeman… is exposed to countless dangers. Condemned while he enforces the law and dismissed when he does not. He is supposed to possess the qualities of a soldier, doctor, lawyer, diplomat and educator with the remuneration much less than but working hour more than twice of any of them.

या देशातील असंख्य पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांच्या केलेल्या त्यागाची आठवण कायम राहावी म्हणून चाणक्यपुरी या देशाच्या राजधानी दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रीय पोलीस स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्मारक पोलीस दलातील शहिदांनी अतुलनीय शौर्य, धाडस दाखवून केलेल्या पराक्रमाची ओळख जपेल व प्रेरणास्रोत म्हणून सतत कार्य करीत राहील.

राष्ट्रीय पोलीस स्मारक ३० फूट आयताकृती ग्रेनाईटच्या स्तंभांनी साकारले आहे. कर्तव्य बजावत असताना देशभरातील विविध पोलीस दलातील मृत्युमुखी पडलेल्या ३६,०५० शहिदांच्या नावे या स्मारकात विविध स्तंभांवर कोरली गेली आहेत. ही नावे पोलिसांच्या शौर्याची व गौरवाची आठवण या स्मारकास भेट देणाऱ्यांना अविरत देत राहील. हे पोलीस स्मारक या वर्षीच्या पोलीस शहीददिनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केले जाईल.

राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या तळघरात कायमस्वरूपी पोलीस संग्रहालयाची उभारणी केली गेली आहे. सदर संग्रहालयात राज्य व केंद्रीय पोलीस दले यांच्याशी संबंधित विविध साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. सदर संग्रहालयात कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले व मरणोत्तर अशोक चक्र, कीर्ती चक्र व शौर्य चक्र यांसारख्या पदकांनी पुरस्कृत केलेल्या शहिदांसाठी एक विशेष गॅलरी तयार केली जात आहे.

देशात पहिल्यांदाच पोलीस या विषयावर आधारित कायमस्वरूपी राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात आले आहे. विविध पदकांच्या प्रतिकृती, सभारंभीय व कार्यरत पोशाख, टोप्या, फेटे, शिरस्त्राणे, बॅटन, कंबरपट्टे, श्वानपथकाची वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रे, घोडेस्वार पोलिसांच्या पथकांची छायाचित्रे, भारतीय पोलीस कायद्याच्या जुन्या प्रती, महिला पोलीस पथकांची छायाचित्रे, वृत्तपत्रांमधली पोलिसांशी संबंधित ऐतिहासिक महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे, पूर्वीपासून आतापर्यंत वापरली जाणारी वायरलेस उपकरणे इत्यादी प्रत्येक राज्यातून आणि केंद्रीय पोलीस दलांकडून मागवून संग्रहालयात प्रथमच प्रदíशत करण्यात येणार आहेत.

लडाख येथील पोलीस स्मृतिस्थळाला भेट देणाऱ्या देशवासीयांसाठी पोलिसांकडून एक मनोज्ञ संदेश दिलेला आहे, त्याचा भावार्थ असा आहे :

‘‘तुम्ही इथून परतल्यावर सर्वाना आमच्याबद्दल सांगा की,

त्यांच्या उद्यासाठी, आम्ही आमचा आज समíपत केला आहे.’’

शहीद पोलीस वीरांना शतश: प्रणाम..

लेखक राज्याचे पोलीस महासंचालक आहेत.