स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या दहा दशकांच्या कालावधीत भारताने आपल्या ७ हजार ६०० कि.मी. अंतराच्या सागरी किनारपट्टीत १३ मोठे आणि १८७ लहान बंदरे विकसित केली आहेत. या बंदरांच्या माध्यमातून भारताचा तब्बल ९० टक्के व्यापार केला जातो. क्रूड तेल आणि कोळसा या महत्त्वाच्या घटकांची आयात मोठय़ा प्रमाणात समुद्री मार्गेच होते. विकासाच्या दृष्टीने ऊर्जा हा घटक महत्त्वाचा आहे. आज भारत उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. त्यामुळे ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षिततेसोबत सागरी सुरक्षाही महत्त्वाची ठरू लागली आहे. युद्धजन्य परिस्थिती असो वा नसो, देशाच्या हद्दीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग (इंटरनॅशनल शिपिंग लेन) तसेच दळणवळणाचा समुद्री मार्ग (सी लाइन ऑफ कम्युनिकेशन) यांच्या सुरक्षेवर अधिकाधिक भर देणे अनिवार्य आहे. अँग्लो-फ्रेंच युद्ध, अँग्लो-डच, अँग्लो- पोर्तुगीज, अँग्लो-स्पेन युद्ध तसेच जागतिक युद्धांचा इतिहास पाहता जमिनीवर ही युद्धे हरली गेली, कारण पराभूत राष्ट्रांना विरोधी राष्ट्रांच्या दळणवळणाच्या समुद्री मार्गावर वर्चस्व मिळवण्यात आलेले अपयश, हे होय. सातत्याने विकास वाढ आणि राष्ट्रीय प्रगतीचा उंचावणारा आलेख कायम ठेवण्यासाठी भारताला आपल्या समुद्री सुरक्षेबाबत कमालीची सतर्कता दाखवावी लागणार आहे. विशेषत: भारतीय महासागर क्षेत्रातील सुरक्षा अबाधित राखून अटलांटिक, भूमध्य आणि प्रशांत महासागरातील सुरक्षा आणि इतर बाबींवरही भर देण्याची गरज आहे. विशेषत: भारतीय महासागरी प्रदेश हा इतर समुद्री प्रदेशांच्या तुलनेत भौगौलिकदृष्टय़ा वेगळा आहे. त्यामुळे या प्रदेशात दळणवळण करण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी केवळ सात मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो. यामध्ये पश्चिमेकडे सुएझ कालवा (इजिप्तमार्गे), होरमजची सामुद्रधुनी (ओमान), बाब एल मनदेब (इथिओपिया/येमेन), केप ऑफ गुड होपची सामुद्रधुनी आणि पूर्वेकडे मलाक्का सामुद्रधुनी (सिंगापूर), सुंदा सामुद्रधुनी व लोमबोस सामुद्रधुनी (इंडोनेशिया) या मार्गाचा वापर केला जातो. भारतीय महासागरी प्रदेशातून जगातील सर्वात अधिक मालवाहतूक केली जाते. वर्षभरात ८० हजारहून अधिक जहाजांचा वापर या भागातून होत असतो. जगातील दोन तृतीयांश तेल वाहतूक, एक तृतीयांश मालवाहतूक तसेच अध्र्याहून अधिक कंटेनर वाहतूकही याच महासागरातून होत असते.या महासागरातील २० टक्के व्यापार हा समुद्रतटीय भागात, तर उर्वरित इतर प्रादेशिक भागांत होतो. त्यामुळे एखादे वेळी मालवाहू जहाज या सामुद्रधुनी मार्गात अडकून पडल्यास त्याचा परिणाम स्थानिक तसेच जागतिक व्यापारावरही होतो.
नैसर्गिक स्रोत लक्षात घेता जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भारतीय महासागर क्षेत्र
साठा, युरेनियम, कथिल, सोने, हिरे आदी घटक मोठय़ा प्रमाणात सापडतात. समुद्रतटीय राष्ट्रे मोठय़ा प्रमाणात रबर, चहा, मसाले, ताग यांचे उत्पादन घेतात. महासागराच्या किनारपट्टीवर वसलेल्या खनिजसंपन्न राष्ट्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात मँगनीज, कोबाल्ट, टंगस्टन, कोळसा,लोखंड, धातूपाषाण, बॉक्साईट आदी खनिजे मुबलक आढळतात. भारतीय महासागराच्या क्षेत्रातील २३ लाख ०५ लाख १४३ चौरस कि.मी.च्या खास आर्थिक क्षेत्र (एक्स्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन)आणि ४ लाख २ हजार ९९६ चौरस किमी (कॉन्टिनेन्टल शेल्फ) खंडीय क्षेत्रावर भारताचा दावा आहे. राष्ट्राची परिणामकारक भरभराट होण्यासाठी समुद्र तट आणि या नैसर्गिक खनिजांचे समुद्रीमार्गे होणारा आंतरखंडीय व्यापार यांची सुरक्षा अतिशय आवश्यक मानली जाते. समुद्रातील ही खनिज संपत्ती काढण्याचा आपला मूलभूत अधिकार मानून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करणे,यासाठी आपली समुद्री सामर्थ्यांची नितांत गरज असते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते की, जमिनीवर शक्तिशाली असण्यापेक्षा समुद्रावर वर्चस्व असणे केव्हाही चांगले. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सागरी धोरणे म्हणावी तशी राबवली गेलेली नाहीत, परंतु आता सागरी महत्त्व लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने समुद्री सामथ्र्य वाढविण्यावर भारताने कमालीचा जोर दिला आहे. त्यामुळेच आज जगातील बलवान आणि तंत्रज्ञानाने युक्त लष्करी नौदल भारताकडे आहे. भारतीय नौदल आज कमालीचे सामथ्र्यशाली आहे. त्यामुळे देशाच्या सागरकिनाऱ्याच्या सुरक्षेसोबतच जागतिक पटलावर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्येही भारतीय नौदल हिरिरीने भाग घेते.
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यांमुळे इतर देशांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. अनेक देशांचे सैनिक प्रशिक्षणासाठी भारतात येतात, तर परदेशातूनही भारतीय नौदलातील सैनिकांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येते. भारतीय नौदल वर्षभर संयुक्त कवायतींसाठी इतर देशांच्या नौदलाला पाचारण करते. तसेच स्वत:ही इतर देशांच्या नौदलांबरोबर संयुक्त कवायती करते.भारतीय नौदल मॉरिशस, मालदीव, सेचेल,श्रीलंका, दक्षिण पूर्व आशियाच्या सामुद्रधुन्या आणि आफ्रिकेतील समुद्रतटीय देशांना सागरी संरक्षण सातत्याने देत आहे. समुद्री दरोडेखोरांविरोधातही भारतीय नौदलाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सन २००८ पासून गल्फच्या आखातात भारतीय नौदलाने सुमारे दोन हजार व्यापारी जहाजांची समुद्री दरोडेखोरांपासून संरक्षण केले आहे. समुद्री दरोडेखोरांविरोधात आंतरराष्ट्राय स्तरावर धडक मोहीम राबवून १५०पेक्षा अधिक डाकूंना जेरबंद केले. यामुळेजागतिक पातळीवर भारताचे मोठे कौतुक झाले.भारतीय नौदल जागतिक पातळीवर आपला प्रभाव पाडत असताना देशाच्या सुरक्षेबाबतही तेवढीच जागरूकता दाखवत आहे. त्यामुळे गेल्या काही काळात भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या अनेक विघातक शक्तींचा बीमोड केला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने स्थानिक सुरक्षा यंत्रणांबरोबरचा समन्वय अधिक वाढवला आहे. संभाव्य देशविरोधी कारवाया हाणून पाडण्यासाठी नौदलाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या सुरक्षा मोहिमेअंतर्गत कोस्टगार्ड, स्थानिक सुरक्षा यंत्रणा आदींशी समन्वय साधत सुरक्षेचा चोख बंदोबस्त करीत आहे.भविष्यात नौदलाची सुरक्षा यंत्रणा आणखी बळकट होण्यासाठी परदेशी तसेच स्वदेशी तंत्राच्या मदतीने शस्त्रसंपन्न होणे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. युद्धनौकानिर्मितीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र त्याचा उपयोग नौदलाच्या बळकटीसाठी कायमस्वरूपी होतो, हे लक्षात घेऊनच नौदलाचा विस्तार आणि बळकटीकडे लक्ष देणे म्हणूनच आवश्यक आहे
राष्ट्रीय समृद्धीसाठी सागरी सामर्थ्य
मानव जातीचा इतिहास आणि मानवी संघर्ष हा परंपरागतपणे सुरू असलेला अखंडित प्रवास आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विविध स्रोतांवर आपला हक्कदाखवणे, यामध्येच या मानवी संघर्षांचे मूळ दडलेले आहे. जमीन, गुरेढोरे, पाणी अथवा मानवाकडून संस्कारित नैसर्गिक घटक तसेच तंत्रज्ञान विकास आदी स्रोत प्रामुख्याने संघर्षांच्या मुळाशी मानले जातात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-12-2012 at 06:46 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy power for national abundance