लोकसभेत अविश्वास ठरावावर सलग सात तास चर्चा करण्याचे ठरलेले होते. सकाळी अकरा वाजता चर्चा सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदस्य आपापले मुद्दे मांडतील आणि प्रथेप्रमाणे पंतप्रधान त्यांच्या मुद्दय़ांना उत्तरे देतील. लोकसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले; पण तेवढय़ात सदस्यांनी आक्षेप घेतला. सात तासांत चर्चा होणे शक्यच नाही. आम्हाला पुरेसा वेळ मिळायला हवा. कुठेही अविश्वास ठरावावरील चर्चा एका दिवसात संपवली जात नाही. अध्यक्षांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला; पण सदस्यांनी त्यांचा हेका काही सोडला नाही. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार उठले आणि सदस्यांना म्हणाले, ‘‘चर्चा एका दिवसाचीच असेल. आता तर टी ट्वेन्टीचा जमाना आहे. वीस षटकेच खेळायची असतात. कुठे तुम्ही जुन्या जमान्याची गोष्ट करता. पाच पाच दिवसांचा कसोटी सामना कोण बघतो का?..’’ अविश्वासावरील चर्चा म्हणजे खरोखरच टी ट्वेन्टीचाच सामना होता. अनेक सदस्यांना एक एक मिनिटात त्यांचे भाषण आवरावे लागले. कैरानाच्या खासदार तबस्सूम बेगम यांचे पहिलेच भाषण होते, त्यांनाही कसेबसे तीन मिनिटे मिळाली. काही सदस्यांना संधी मिळावी म्हणून पंतप्रधानांनाही बसून राहावे लागले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा