पूर्व विदर्भात काही वर्षांपूर्वी अचानक सक्रिय झालेल्या विद्यार्थी संघटनेत काम करणारा ‘अ’ नावाचा तरुण. त्याने इंग्रजी साहित्यात पदवी घेतली होती. एके दिवशी संघटनेच्या प्रमुखाकडून त्याला सांगण्यात येते ‘मुंबईला जा. तिथे दादर रेल्वे स्थानकावर हातात केळी आणि वृत्तपत्र घेतलेला माणूस भेटेल. तुझ्याही हातात याच वस्तू ठेव म्हणजे ओळख पटेल. तो एक थैली देईल. त्यात एक बॉक्स असेल. ते सामान घेऊन तू परतायचे. बल्लारपूर स्थानकावर याच वस्तू हातात घेऊन उभा असलेला एक तरुण भेटेल. त्याच्या हातात ही पिशवी सोपवायची.’ बल्लारपूर स्थानकावर नेमलेल्या तरुणाला सांगण्यात येते. ‘तू ही पिशवी घेऊन जवळच असलेल्या बामणी फाट्यावर उभे राहायचे. हातातल्या त्याच वस्तू बघून भामरागडला बांबू आणण्यासाठी जाणारा एक ट्रक तिथे थांबेल. त्याचा चालक खाली उतरून ती पिशवी ताब्यात घेईल.’ त्या चालकाला निर्देश असतात. ‘तू भामरागडच्या समोर जंगलात असलेल्या बांबू डेपोवर ट्रक भरायला सुरुवात केल्यावर उजव्या खांद्यावर कुऱ्हाड ठेवलेला एक इसम येईल. त्याच्याजवळ ही पिशवी सुपूर्द करायची.’ त्या इसमाला मिळालेला निरोप असा असतो की ती पिशवी त्याने घरी ठेवावी. तीन-चार दिवसांनी जंगलातून एक व्यक्ती येईल. पिशवीबाबत विचारेल तेव्हा ती त्याला देऊन मोकळे व्हायचे. त्या पिशवीतील बॉक्समध्ये काय हे कुणीही बघायचे नाही.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा