भारत घडवणारा नेताभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १००वी जयंती. त्यानिमित्ताने अटलजी यांच्या कार्यकर्तृत्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिलेली ही शब्दांजली…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज २५ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी खूप विशेष दिवस आहे. आपला देश, आपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १००वी जयंती साजरी करत आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देत असतात.

एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारताचे स्थित्यंतर घडवून आणणारे शिल्पकार म्हणून, आपला देश अटलजींप्रति सदैव कृतज्ञ राहील. पंतप्रधान म्हणून त्यांनी १९९८मध्ये शपथ घेतली तेव्हा आपला देश राजकीय अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर पडत होता. सुमारे नऊ वर्षांमध्ये आपण चार लोकसभा निवडणुका पाहिल्या होत्या. भारतातील जनतेचा संयम सुटत चालला होता आणि सत्तेवर येणारी सरकारे कसा कारभार करतील याबाबत लोक साशंक होते. अटलजींनीच स्थिर आणि प्रभावी राज्यकारभार देऊन हा प्रवाह उलट दिशेने वळवत परिस्थिती अनुकूलपणे पालटवली. अटलजी स्वत: सामान्य पण सत्शील कुटुंबातून आले असल्यामुळे, सामान्य नागरिकांना करावा लागणारा संघर्ष आणि परिणामकारक राज्यकारभारातून घडवून आणता येऊ शकणाऱ्या परिवर्तनाची ताकद, ते जाणून होते.

हेही वाचा >>> जाहिरात ते सिनेमा…

आपल्या सभोवतालच्या अनेक क्षेत्रांमध्ये अटलजींच्या नेतृत्वाचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कारकीर्दीत, भारताने माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संपर्क व्यवस्थेच्या जगात मोठी झेप घेतली. अतिशय धडाडीची युवाशक्ती लाभलेल्या आपल्यासारख्या देशासाठी हे विशेष महत्त्वाचे होते. अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने, तंत्रज्ञान सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा पहिला गंभीर प्रयत्न केला. हे करताना, भारताला एकत्र जोडण्याची, जवळ आणण्याची दूरदृष्टी होती. आजही, अनेक जण भारतातील मुख्य ठिकाणे चहू दिशांनी जोडणाऱ्या सुवर्ण चतुष्कोन या महामार्ग प्रकल्पाची आठवण काढतात. पंतप्रधान ग्राम सडक योजनेसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक दळणवळण वाढवण्याचे वाजपेयी सरकारचे प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. त्याचप्रमाणे, त्यांच्या सरकारने दिल्ली मेट्रोसाठी व्यापक आणि विस्तृत काम करून दिल्ली मेट्रोच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्थेला-वाहतुकीला चालना दिली. दिल्ली मेट्रो प्रकल्प आज जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून जगात वाखाणला जातो. अशा प्रकारे, वाजपेयी सरकारने केवळ आर्थिक विकासालाच चालना दिली असं नाही, तर दूरपर्यंत पसरलेल्या प्रदेशांना जवळ आणले, देशाची एकता आणि एकात्मता वाढवली.

सामाजिक क्षेत्राचा विचार करायचा झाला तर सर्व शिक्षा अभियान हा उपक्रम, अटलजींनी कशा प्रकारे एका अशा आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते जिथे देशातील सर्वांना विशेषत: गरीब आणि वंचित घटकांना आधुनिक शिक्षण उपलब्ध असेल, ते अधोरेखित करतो. त्याच वेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला.

त्यांच्या नेतृत्वाचा दाखला १९९८च्या उन्हाळ्यात घडलेल्या घटनेतून पाहायला मिळतो. त्यांचे सरकार नुकतेच सत्तेवर आले होते आणि ११ मे रोजी भारताने ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखली जाणारी पोखरण अणुचाचणी केली. या अणुचाचणीने भारताच्या वैज्ञानिक समुदायाच्या सामर्थ्याची वेगळी ओळख जगासमोर आणली. भारताने अणुचाचणी केल्याने संपूर्ण जग थक्क झाले आणि त्याच वेळी काही देशांनी याबद्दल विनाकारण आपल्या संतापाचे देखील प्रदर्शन केले. भारत खंबीर राहिला आणि दोन दिवसांनी १३ मे रोजी आणखी चाचण्या करण्याचे आदेश देत सरकारने आपला निर्धार दाखवून दिला. ११ मे रोजी झालेल्या चाचण्यांनी वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन घडवले तर १३ मे रोजी केलेल्या चाचण्यांनी खऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडवले. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही तत्कालीन वाजपेयी सरकार, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराचे आणि त्याच वेळी जागतिक शांततेचा भारत खंदा पुरस्कर्ता असल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

भारतीय लोकशाहीचे अटलजींना ज्ञान होते आणि ती अधिक भक्कम करण्याची त्यांना जाणीव होती. भारतीय राजकारणातील आघाड्यांची व्याख्या बदलणाऱ्या रालोआचे अध्यक्षपद अटलजींनी भूषवले. त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि रालोआला विकासाचे, राष्ट्रीय प्रगतीचे आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षांचे सामर्थ्य बनवले. त्यांच्या राजकीय प्रवासातून त्यांची संसदीय प्रतिभा दिसून येते. एक पंतप्रधान म्हणून त्यांनी विरोधकांच्या टीकेला आपल्या स्वत:च्या शैलीने आणि विद्वत्तापूर्ण संवादांनी बोथट केले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा बराच काळ त्यांनी विरोधी बाकांवर व्यतीत केला होता पण त्यांनी कधीही कोणा विरोधात मनात कडवटपणा ठेवला नाही.

१९९६मध्ये घोडेबाजार आणि घाणेरड्या राजकारणाच्या मार्गावर चालण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देणे योग्य मानले. १९९९मध्ये केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला. अशा प्रकारच्या अनैतिक राजकारणाला आव्हान देण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला, मात्र त्यांनी नियमांना अनुसरून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. शेवटी जनतेनेच त्यांना भव्य बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर आणले.

आणीबाणीनंतरच्या १९७७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या स्वत:च्या पक्षाचे (जनसंघ) जनता पक्षात विलिनीकरण करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी हा निर्णय नक्कीच वेदनादायी ठरला असेल, अशी माझी खात्री आहे. पण कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.

अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृती किती खोलवर रुजलेली होती, याचाही दखलपूर्ण उल्लेख आपण करायलाच हवा. ते जेव्हा भारताचे परराष्ट्रमंत्री झाले, त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभांमध्ये हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले भारतीय नेते ठरले होते. त्यांच्या या कृतीतून भारताचा वारसा आणि अस्मितेबद्दलचा त्यांचा अपार अभिमान दिसून येतो.

अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे कोणालाही आपल्याकडे अगदी सहजपणे आकर्षून घेणारे होते, महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य आणि अभिव्यक्ती प्रेमाने त्यांचे अवघे जीवन समृद्ध झाले होते. आपल्या जीवन प्रवासात समृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक आणि कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी आणि कधी तर सहवेदना व्यक्त करण्यासाठी केला. त्यांच्या असंख्य काव्य रचनांमध्ये तर त्यांच्या मनातील संघर्षाचे आणि राष्ट्राविषयीच्या आशांचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसते. म्हणूनच तर त्यांच्या काव्यरचना आजही सर्व वयोगटातील लोकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे तर हे भाग्यच होते की आम्हाला अटलजींसारख्या व्यक्तिमत्त्वाकडून शिकता आले, त्यांना जाणून घेता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला. काँग्रेसला सशक्त पर्याय उभा करणे आणि त्या पर्यायाचे नेतृत्व करणे यातूनच त्यांची थोरवी कळून येते. लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी पक्षाला त्याच्या स्थापनेपासूनच आकार दिला, खडतर आव्हाने, अपयश आणि विजयाच्या काळात दिशा दाखवली. जेव्हा जेव्हा विचारधारा आणि सत्ता यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली, त्या त्या वेळी त्यांनी कायमच विचारधारेचीच निवड केली. त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या आदर्शांची जाणीव जिवंत ठेवण्यासाठी आणि भारतासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वत:ला पुन्हा झोकून देऊया. सुशासन, एकता आणि प्रगती या त्यांच्या तत्त्वांना मूर्त रूप देणारा भारत घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्याला उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे… देत राहील.