खासदारांचा सातबारा या सदरातून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांतील घडामोडींचा आणि विद्यमान खासदारांच्या कामगिरीचा वेध घेतल्यानंतर आता आजपासून सुरू करीत आहोत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे निवडणूकरंग टिपणारा साप्ताहिक स्तंभ – पक्षरंग  
पक्षाची कामगिरी
लढविलेल्या भाजपने जागा २६
निवडून आलेले खासदार ०९
गेल्या वेळी विभागनिहाय मिळालेले यश
०४ विदर्भ, मराठवाडा
०४ खान्देश
०१ पश्चिम महाराष्ट्र
हवा अनुकूल
राज ठाकरे यांना मोदी पंतप्रधान झालेले आवडेल. त्यामुळे मनसेचा समावेश महायुतीत झाल्यास अधिक चांगले. त्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असून, ते शक्य झाले नाही तर शिवसेना-रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने किमान ३३ जागांचा टप्पा गाठता येईल, असा विश्वास आहे.
केंद्र सरकारचा भ्रष्टाचारी कारभार, महागाईला जनता कंटाळली असून उद्योगपतींमध्येही कधी नव्हे इतका सरकारविरोधात असंतोष आहे. त्याचे प्रतिबिंब चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये दिसून आले. नरेंद्र मोदी यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांची संख्या वाढत आहे.

तेलुगू देसमने काँग्रेसची साथ सोडली. द्रमुकने मोदी यांना पाठिंबा दिला असून आसाम गण परिषदही एनडीएमध्ये येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे. शरद पवार हे सुसंस्कृत नेते आहेत, पण अजित पवार हे कोणाशी धड बोलतही नाहीत. पाटबंधारे, ऊर्जा व अन्य खात्यांमधील भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा राग आहे. गेली १५ वर्षे सत्तेवर असलेले सरकार बदलण्यासाठी लोकांना आता युतीचा पर्याय हवा आहे.
“१९९५ला सत्तांतर झाले, त्याचीच पुनरावृत्ती आता होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन हे नेते आता हवे होते, असे वाटते. त्यांची उणीव निश्चितच भासते. पण उद्धव ठाकरे यांनी पक्षावर पकड बसविली असून महापालिका निवडणूक जिंकली आहे. भाजपमध्ये गटबाजी नाही. किरकोळ ‘मनभेद’ असतील, ते मिटविले जातील. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात आली आहे.”
गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ नेते, भाजप

Story img Loader