|| प्रा. अनिकेत भावठाणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलीकडच्या काळात कौटिल्याच्या परराष्ट्र धोरणविषयक विचारांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महाभारताचा फारसा विचार झालेला नाही. या महाकाव्यात मानवी जीवनविषयक विविध कंगोरे तसेच युद्ध आणि रणनीतीचे विश्लेषण केले असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात याचा विचार करण्याची आत्यंतिक गरज आहे.

सर्व भारतीयांना घरातच महाभारत आणि रामायण यांचे बाळकडू मिळालेले असते. महाभारतातील कौरव-पांडव युद्धाची आणि त्या अनुषंगाने श्रीकृष्ण, संजय आणि विदुर यांच्या अनेक कथादेखील आपण सर्वानी ऐकलेल्या, वाचलेल्या आणि पाहिलेल्या  आहेत. युद्ध आणि रणनीती यांचे विविधांगी कंगोरे समजून घेण्यासाठी महाभारतासारखे दुसरे महाकाव्य नसावे. महाभारतातील उद्योगपर्व आणि शांतिपर्व म्हणजे राज्यकारभार आणि राजनय यांचे महत्त्वाचे पाठ आहेत. असे असले तरी, आधुनिक काळात परराष्ट्र धोरण आणि राजनय यांचा अभ्यास करताना आपल्याला ‘महाभारत’ आठवतदेखील नाही. याचे कारण म्हणजे, नृशंस नरसंहार घडवणाऱ्या महायुद्धानंतर पाश्चात्त्य देशांत परराष्ट्र धोरणे/आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा विद्याशाखा म्हणून अभ्यास सुरू झाला.  त्या वेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळवलेल्या ‘भारताचा’ राजनयासंदर्भात वेगळा विचार असू शकतो, ही बाब कोणाच्या खिजगणतीतही नव्हती. याउलट १९९२ मध्ये अमेरिकन अभ्यासक जॉर्ज टॅन्हम यांनी मूल्ये, सांस्कृतिक विविधता, अलिप्ततावादाची भूमिका यामुळे भारतात ‘धोरणात्मक संस्कृती’चा अभाव असून २१व्या शतकातील राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने पेलण्यासाठी भारत असमर्थ ठरेल, अशी भूमिका मांडली. ‘धोरणात्मक संस्कृती’ म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेविषयी देशाची धोरणे, नीती, वृत्ती यांची इतिहासाच्या आधारे मांडणी करणे होय. परराष्ट्र धोरणाला वळण देण्यामध्ये ‘धोरणात्मक संस्कृती’चा  अत्यंत महत्त्वाचा सहभाग असतो. परराष्ट्र धोरणाचे विख्यात अभ्यासक आणि अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांच्या Does America Need a Foreign Policy?: Toward a Diplomacy for the 21st Century’ या पुस्तकात भारताविषयीचे विवेचन पुढील प्रकारे आहे-

‘‘बहुतांश भारतीय नेते आणि अधिकारी यांनी पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले आहे; परंतु भारतीय नेतृत्व परराष्ट्र धोरणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते हे समजून घेणे अमेरिकन लोकांच्या आकलनापलीकडे आहे.’’

टॅन्हम यांच्या भूमिकेचा अनेक भारतीय अभ्यासकांनी प्रतिवाद केला आहे; परंतु आजदेखील भारताची ‘राष्ट्रीय सुरक्षा रणनीती’ नाही हे सत्य आहे; पण स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली, विकासाचे वेगवेगळे स्तर आपण अनुभवले आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणदेखील आमूलाग्र बदलले आहे तरीदेखील जगाशी भारताने साधलेला संवाद आणि राजनय यांच्यात एक प्रकारचे सातत्यता आणि ताíककता आहे. त्यामुळे भारताला ‘धोरणात्मक संस्कृती’च नाही, असे म्हणणे धाडसाचे आणि भ्रमित करणारे आहे.

भारतीय परराष्ट्र धोरणाला चाणक्य/ कौटिल्य यांच्या विचारांनी दिशा दिली आहे, असे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे, किंबहुना दिल्लीतील परकीय दूतावास असलेल्या उपनगराचे नाव चाणक्यपुरी आहे यात बऱ्याच गोष्टी समजून येतात. चाणक्य यांच्या अर्थशास्त्रासोबतच त्यांच्या नंतरच्या कमंडकी यांच्या ‘नीतिसार’मध्येदेखील राजनय आणि परराष्ट्र धोरण यांची चर्चा केली आहे. मात्र उपरोक्त महान तत्त्वज्ञाशिवाय महाभारतातून परराष्ट्र धोरण आणि पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्या संस्कृतीतील विचारांच्या आधारे युनायटेड किंग्डम आणि अमेरिका यांनी जगभर सत्ता राबवली आहे. चीनदेखील त्याचा कित्ता कन्फ्युशिअस विचारांच्या आधारे गिरवतो आहे. अशा वेळी महासत्ता होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भारताला आपला विचार २१व्या शतकाच्या राजकारणाच्या कसोटीवर उमजून घेण्याची आणि त्याचा प्रसार करण्याची गरज आहे.

राजनयाची मुळे महाभारतातील उद्योगपर्वात दिसून येतात. पांडवांचा वनवास संपल्यानंतर त्यांनी दूतामार्फत कौरवांसमोर राज्याची मागणी ठेवली होती. दुर्योधनाने त्याला सपशेल नाकारल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये संजय, विदुर आणि सर्वात शेवटी श्रीकृष्ण शिष्टाईच्या राजनयिक माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याची बोलणी झाली. ही बोलणी फिसकटल्यानंतर युद्धाच्या तयारीचे वर्णन या पर्वात केले आहे. शिवाय, युद्ध म्हणजे परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्याच्या काळातील परराष्ट्र धोरणे आणि सुरक्षा स्थिती यांच्याशी तंतोतंत समांतर उदाहरणे इतिहासात सापडणे शक्य नाही. मात्र आजच्या आव्हानाशी मिळतेजुळते संदर्भ, घटना आणि परिस्थितीमध्ये तत्कालीन धोरणकर्त्यांनी अवलंबलेला राजनय आणि मुत्सद्दीपणा यांच्यापासून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. सम्राट अशोक आणि अकबराच्या काळानंतर ब्रिटिश काळात भारताच्या राजकीय नकाशाची पुनर्माडणी झाली. महाभारतामध्ये विश्वनिर्मितीची चर्चा कमळाच्या चार पाकळ्यांच्या आधारे केली आहे त्यात भारताचे स्थान दक्षिणेला आहे. थोडक्यात भारत जगातील इतर देशांपकी एक आहे आणि इतरांना त्यांच्या भौगोलिक रचना तसेच सर्व गुणदोषांसकट स्वीकारण्याची भूमिका भारतीय सांस्कृतिक विचारात मांडली आहे.उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत अनेक देश असले तरी केवळ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेतील नागरिकांना ‘अमेरिकन्स’ म्हणण्याची प्रवृत्ती भारतापेक्षा वेगळी आहे. सहजीवन आणि सहअस्तित्व हा भारतीय विचारांचा पाया आहे आणि त्याचेच प्रतििबब पंडित नेहरूंच्या वसाहतवादविरोधी धोरणात तसेच मोदींनी गेल्या महिन्यात इंडो-पॅसिफिकविषयी मांडलेल्या सर्वसमावेशक भूमिकेत दिसून येते.

राज्यात शांतता-स्थिरता राखणे हे राजाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रसंगी युद्धाची तयारी ठेवणे हा धर्म असल्याचे भीष्माने सांगितले आहे. महाभारतात मत्स्यन्यायाची चर्चा केली आहे. मत्स्यन्याय म्हणजे मोठा मासा छोटय़ा माशाला मारतो. मात्र मत्स्यन्यायाचा अतिरेक होऊन अराजक पसरू नये यासाठी धर्म महत्त्वाची भूमिका बजावतो. समाज आणि मत्स्यन्याय यांच्यामध्ये धर्म असून तो शांतता आणि स्थिरता राखतो असे शांतिपर्वात सांगितले आहे. आजच्या काळात अत्यंत विषमतेवर आधारित जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी गट, दहशतवादी संघटना, त्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा आणि आíथक रसद यामुळे राज्यांना त्यांच्या नागरिकांचे रक्षण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे अधिकाधिक राज्ये ‘कोल्ड स्टेट’ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्याबद्दल जगाला वाटणारी भीती म्हणजेदेखील पूर्वीच्या काळातील मत्स्यन्यायाचे नवीन रूप आहे.

स्वातंत्र्यानंतर ‘सामरिक स्वायत्तता’ हे मूल्य भारताच्या राजनयाचा धर्मच बनला आहे. शीतयुद्ध काळात नेहरूंनी अलिप्ततावादाच्या माध्यमातून भारताची स्वायत्तता राखण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप अलिप्ततावादाची उपयुक्तता संपली असली तरी सामरिक स्वायत्तता म्हणजेच ‘धर्माचे’ पालन करण्याची भारताची भूमिका कायम आहे. ट्रम्प यांच्या कारकीर्दीत भारताचा दुरावा निर्माण झाल्याचा सूर येत असताना चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी अनौपचारिक शिखर परिषद घेऊन मोदींनी योग्य तो संदेश दिला आहे. त्यानंतर या आठवडय़ातच अमेरिकन काँग्रेसमध्ये भारताशी संरक्षण संबंध वाढविण्यासाठी रशियाशी व्यवहार करणाऱ्या देशांवर असलेल्या र्निबधांपासून भारताला सूट देण्यात आली आहे. भारताची स्वायत्तता अबाधित राहिली आहे. थोडक्यात बदलत्या स्थितीनुसार योग्य-अयोग्यतेचा निर्णय घेण्याची भारताला मुभा आहे. जागतिक स्तरावर ‘धर्म’ संकल्पनेचा विचार म्हणजे नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची निर्मिती आणि त्याचे पालन होय. त्यामुळेच इतर कोणत्याही देशाने टाकलेल्या र्निबधांपेक्षा भारत संयुक्तराष्ट्रसंघाच्या र्निबधांना अधिक महत्त्व देतो. दक्षिण चीन सागर विवादात चीनने आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियम यांचे पालन करावे असे भारताने अधोरेखित केले.

अम्रिता नारळीकर आणि अरुणा नारळीकर यांच्या Bargaining with Raising India: Lessons from Mahabharata’ पुस्तकात नतिक मूल्ये भारतीय राजनयातील एक महत्त्वाचा पलू असल्याचे विशाद केले आहे. पाश्चात्त्य देश आपले प्रतिस्पर्धी किंवा शत्रू यांच्यासंदर्भात नतिकतेची चर्चा करतात. ९/११ हल्ल्यानंतर बुश प्रशासनाने ‘दहशतवाद विरोधातील युद्धासंदर्भात’ जारी केलेले पत्रक म्हणजे जागतिक राजकारणात नतिक मूल्यांच्या उपयोगाचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या समविचारी मित्रांशी चर्चा करताना पाश्चात्त्य राष्ट्रांना नतिक मूल्यांचा आधार घेण्याची गरज वाटत नाही. भारत मात्र मित्र अथवा प्रतिस्पर्धी यांच्याशी नतिकतेच्या चष्म्यातून चर्चा करतो. त्यामुळेच किसिंजर यांच्यासारख्या कसलेल्या मुत्सद्दय़ालादेखील भारताशी वाटाघाटी करणे अवघड वाटते. भारताच्या भूमिकेचे प्रतििबब कुरुक्षेत्रातील युद्धातदेखील दिसले होते. रणांगणावर आपले आप्तस्वकीय समोर दिसल्यावर शस्त्रे खाली ठेवणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्णाने मूल्यांचे पाठ भगवद्गीतेतून दिले होते. त्यासोबतच चाक जमिनीत रुतल्यावर शस्त्र उचलणाऱ्या अर्जुनाला कर्णाने मूल्ये आणि युद्धनियमांची आठवण करून दिली होती. भारतीय राजनयात विशेषत: अणुप्रसार, वैश्विक व्यापार आणि हवामान बदल यांच्याबाबतीत नतिक मूल्यांशी असलेली बांधिलकी उठून दिसते. युद्ध आणि रणनीतीविषयीचे विविधांगी पलू महाभारतात आहेत. कोणत्याही स्थितीत युद्ध जिंकायचे हाच स्वहिताचा विचार दुर्योधनाद्वारे महाभारतात सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार भारतीय राजनयात आहेच. अणुकरार, पॅरिस करार, डोकलाममधील भारताची भूमिका आणि अमेरिकेशी मित्रत्वाचे संबंध जोडणे ही व्यावहारिक राजकारणाची उदाहरणे आहेत. भारतीय परराष्ट्र धोरण अधिक व्यवहारी बनत असले तरी त्याच्यावर नेहमीच नतिक मूल्यांची सावली असते. त्यामुळेच ब्रिक्स परिषदेसाठी सध्या दक्षिण आफ्रिकेत असलेले मोदी अगदी सहजतेने चौथ्या औद्योगिक क्रांतीतून होणारी प्रगती आणि विकास यांची मानवी मूल्यांशी गुंफण करताना दिसतात.

उपरोक्त लिखाणाचा हेतू पाश्चात्त्य विचारांना तुच्छ लेखून केवळ महाभारताचा किंवा भारतीय विचारांचा उदोउदो करणे नक्कीच नाही. वास्तववाद हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत असला तरी गेल्या काही वर्षांत आदर्शवाद, मार्क्‍सवाद, उत्तर-आधुनिकवाद किंवा १९८०च्या दशकापासून प्रचलित झालेला संरचनावाद यांनी या सिद्धांताच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अराजकतेविषयी या वादांनी आपली वेगळी भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र बहुतांशी या सर्व ‘वादांचा’ उगम पश्चिमेत झाला आहे. राष्ट्रच-राज्य, राष्ट्रहित, सार्वभौमत्व या संकल्पना तसेच पश्चिमेतील सिद्धांत यांच्या माध्यमातूनच राजनय आणि परराष्ट्र धोरणाचे आकलन केले जाऊ शकते असा अट्टहास निर्माण केला आहे. धोरणकर्त्यांच्या निर्णयाला केवळ या संकल्पनाच प्रभावित करतात हा युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी सात दशकांपूर्वी मांडलेला विचार आजदेखील प्रबळ आहे. भारताच्या राजनयावरदेखील या संकल्पनांचा प्रभाव आहेच. पूर्वेकडील देशात राजकीय प्रक्रियांच्या अभ्यासाची वानवाच असते असे मानले जात असे. अलीकडच्या काळात कौटिल्याच्या परराष्ट्र धोरणविषयक विचारांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महाभारताचा फारसा विचार झालेला नाही. महाभारताचे मूळ असलेल्या ‘जय संहिता’मध्ये संजय आणि धृतराष्ट्र यांचा युद्ध आणि रणनीतीविषयक ८८८० श्लोकांचा संवाद आहे. त्यामध्ये भर पडून कालांतराने महाभारताची निर्मिती झाली. या महाकाव्यात मानवी जीवनविषयक विविध कंगोरे तसेच युद्ध आणि रणनीतीचे विश्लेषण केले असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात याचा विचार करण्याची आत्यंतिक गरज आहे. विशेषत: भारताचे स्थान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिक भक्कम होत असताना देशाच्या परराष्ट्र धोरणांना प्रभावित करणाऱ्या स्रोतांचा मागोवा घेण्यात इतर देशांसाठीदेखील स्वारस्याचे आहे. इतर देशांना आपल्या कहाणीत रस असल्याने भारतालादेखील स्वत:च्या विचारांना नव्या संदर्भात समजून घेऊन त्यांचा प्रसार करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

aubhavthankar@gmail.com

लेखक हे ‘सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’मध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.