गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायामधील विविध किडींमध्ये हुमणी या कीटकाच्या उपद्रवाने अनेक शेतकरी हैराण आहेत. विशेषत: ऊस पिकाला या किडीपासून मोठा धोका संभवत असल्याने ऊसउत्पादक या हुमणीपासून मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. या किडीच्या बंदोबस्ताविषयी…

शेती व्यवसाय करताना मशागत, लागवड, पाणी-खतांसोबतच विविध किडी, रोगांबाबतही सातत्याने काळजी घ्यावी लागते. बदलते हवामान, नवनव्या जाती आणि कीटकनाशांच्या वापरातून या आजारामध्ये सतत वाढ होत आहे. सध्या या किडीच्या उपद्रवात हुमणी या कीटकाच्या उपद्रवाने अनेक शेतकरी हैराण झाले आहेत. विशेषत: ऊस पिकाला या किडीपासून मोठा धोका संभवत असल्याने ऊसउत्पादक या हुमणीपासून मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.

Agriculture Trade job The Green Revolution Industrialization
आजही शेती उत्तमच!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!

पीकवाढीला अटकाव करणारी आणि शेतातील मूलद्रव्ये खाऊन गब्बर होणाऱ्यांमध्ये हुमणी हा कीटक अधिक नुकसानकारक आहे. जमिनीत याचे वास्तव्य असल्याने लवकर लक्षातही येत नाही आणि कीटकनाशकांचा त्यावर फारसा परिणामही होत नाही. याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट तर होतेच, पण हाता-तोंडाला आलेले पीक वाया जाण्याचा धोका असतो. यासाठी हुमणीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सुप्तावस्थेतील ही कीड पोषक हवामानात अधिक सक्रिय होत असल्याने याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

एकात्मिक व्यवस्थापन

ऊस व इतर पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असलेला दिसून येत आहे. हुमणी ही एक बहुभक्ष्यी कीड असून, सन १९७५ पासूनच राष्ट्रीय महत्वाची कीड म्हणून परिचित आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे ३०० प्रजातींची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात या किडीच्या प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या प्रजाती आढळून येतात. त्यांपैकी होलोट्रॉकिया सिराटा (माळावरील हुमणी) या प्रजातीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नांदेड, बुलडाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इ. जिल्ह्यांत दिसून येतो. तर ल्युकोफोलिस लेपिडोफोरा (नदीकाठावरील हुमणी) या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात आढळून येतो. त्याचबरोबर मागील ५-६ वर्षांपासून (फायलोग्यँथस आणि ऑडोरेट्स) या दोन नवीन हुमणी हलक्या जमिनीत व प्रामुख्याने कमी पाण्याच्या प्रदेशात आढळत आहेत.

या किडीचे वेळेत नियंत्रण केले नाही, तर किडीमुळे पिकाचे जवळपास ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. किडीचा जर विचार केला, तर या किडीचा जीवनक्रम हा भुंगेरा, अळी, अंडी व कोष या चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो. वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात सुप्तावस्थेतील भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर हे भुंगेरे बाभूळ, कडुनिंब किंवा बोर या यजमान झाडावर हल्ला करून त्यांची पाने खाण्यास सुरुवात करतात. या झाडांवर नर भुंगेरे आणि मादी भुंगेरे यांचे मीलन होते. मीलन झाल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे होतात आणि परत झाडाची पाने खातात.

भुगेऱ्यांचा बंदोबस्त

१) शेतात वळीव पावसानंतर १ मीटर रुंद, ३ मीटर लांब व अर्धा मीटर खोल खड्डा करावा. त्यामध्ये पिवळे प्लॅस्टिकचे आच्छादन पसरून त्यात रॉकेल किंवा डिझेलमिश्रित पाणी भरावे. आणि त्या खड्ड्यावर रात्रीच्या वेळेस विजेचा बल्ब टांगावा, भुंगेरे प्रकाशाकडे जास्त आकर्षित होतात. यामुळे विजेच्या बल्बखाली असलेल्या खड्ड्यामध्ये किंवा ठेवलेल्या भांड्यामधील रॉकेलमिश्रित पाण्यामध्ये पडून मरून जातात व हुमणी नियंत्रित करणे शक्य होते. एक प्रकाश सापळा १ हेक्टर जमिनीस पुरेसा आहे.

२) शेतातील कडुनिंब, बाभळी, बोर इ. झाडांवर प्रौढ भुंगेरे पाने खाण्यासाठी पहिल्या पावसानंतर जमा झालेले आढळतात. अशा झाडांच्या फांद्या रात्रीच्या वेळी काठीने हलवल्यास भुंगेरे खाली पडतात. खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून नष्ट करावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या केल्यास, किडीचा अंडी घालण्यापूर्वीच नायनाट करता येतो.

३) प्रौढ भुंगेरे यजमान झाडांवर आढळून येत असल्यास इमिडायलोप्रीड १७.८ एस. एल. ३ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारल्यास भुंगेऱ्यांचे नियंत्रण होते.

हुमणी अळीचा बंदोबस्त :

१) शेतात आंतरमशागतीच्या वेळी अळ्या गोळा कराव्यात व लोखंडी हूक किंवा खुरप्याने माराव्यात. २) सापळा पिकांचा वापर : ताग, एरंडी अथवा भुईमूग पिकांचा सापळा पिके लावून वापर करावा. ३) सदर पिके उसाच्या सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी लावावीत व मलूल होऊन कोमेजलेल्या झाडांखालीत अळ्या गोळा करून माराव्यात. ४) पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून साचलेल्या पाण्यामुळे मुळांजवळ लपलेल्या अळ्यांना प्राणवायू मिळण्यात अडथळा येऊन त्या मरतील. ५) अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा घेणे प्रकर्षाने टाळावे, सूर्यफुलाचे पीक घेऊन त्यानंतर शेताची ३-४ वेळा खोलवर नांगरट करावी.

जैविक नियंत्रण:-

१) परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बासियाना, बिव्हेरीया बैंगोनीटी, मेटॅरिझीअम अॅनिसोप्ली, तसेच जीवाणू, ब्यॉसिलस पॉपिली यांचा वापर पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या सेंद्रिय खतामध्ये मिसळून कीड नियंत्रणासाठी करता येतो. २) एटोमो पॅथोजेनिक निमटोड म्हणजे कीटकांना बाधित करणारे सूत्रकृमी हे होलोट्रॉकिया हुमणीच्या शरीरातील छिद्रावाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करतात. किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसऱ्या हुमणीला शोधून बाधित करतात. ई. पी.एन. चा वापर करताना एकरी एक लिटर द्रावण प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळांशी वाफसा स्थितीत आळवणी केली असता, हुमणीचे प्रभावी नियंत्रण होते. सदर सूत्रकृमीचा जमिनीतील उपयुक्त जिवाणू, तसेच इतर पिके तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नसल्याने त्यांचा वापर सुरक्षित ठरतो. ३) शक्यतो शेतीची मशागत दिवसा करण्यात यावी. तसेच हुमणीचे निसर्गत: शत्रू असलेले बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इत्यादी पक्षी, तसेच मांजर, मुंगूस, कुत्रा, रानडुक्कर इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खाताना दिसतात.

रासायनिक नियंत्रण:-

सुरवातीला फिप्रोनिल ३ टक्के दाणेदार ३३ किलो प्रतिहेक्टर मातीमध्ये मिसळून द्यावे, हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या उसात आढळून येत असल्यास फिप्रोनिल ४० टक्के इमिडायलीप्रीड ४० टक्के डब्ल्यू. जी. हे संयुक्त कीटकनाशक प्रतिहेक्टरी ५०० ग्रॅम १२५० लिटर पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या ओळीत सोडावे. अशा तऱ्हेने हुमणीचे नियंत्रण शेतकरी बंधूनी सामुदायिक मोहिमेच्या स्वरूपात जास्तीत जास्त भुंगेरे गोळा करून नष्ट केल्यास प्रभावी व सर्वांत कमी खर्चीक उपक्रम म्हणून करता येईल.

प्रकाश सापळे प्रत्येक शेतकऱ्याने लावावेत. लिंब, कडुनिंब, बाभळच्या झाडांवर प्रौढ भुंगेरे यजमान आढळून येत असल्यास इमिडायलोप्रीड १७.८ एस. एल. ३ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारल्यास भुगेऱ्यांचे नियंत्रण होते. तसेच हुमणी कीड ही भुंगेऱ्याच्या अवस्थेत जास्त प्रमाणात नियंत्रित होत असल्याने याचा सामूहिकपणे बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

हुमणी कीड नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत हुमणी कीड व्यवस्थापन मोहीम कृषी सहायकांच्या मार्फत गावोगावी राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – विवेक कुंभारजिल्हा कृषी अधीक्षक

Digambar.shinde@expressindia.com