प्रश्न ‘आग्या वेताळां’चा!
गेल्या काही दिवसांत डोंबिवलीतील एका रासायनिक कारखान्यातील भट्टीचा स्फोट होऊन १२ जणांना तर पुलगाव येथील लष्कराच्या दारूगोळा भांडारातील अग्निकांडात १९ जणांना जीव गमवावा लागला. या दोन्ही दुर्घटनांच्या कारणांची चौकशी सुरू असली तरी यामुळे एकंदर औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तरी आपण त्यातून काहीही धडा घेतला नाही हेच वास्तव यातून समोर येते. या दोन घटनांच्या निमित्ताने या दाहक प्रश्नाचा घेतलेला वेध..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युद्ध झाल्यास दोन दिवसांत संपेल इतकाच दारूगोळा देशाकडे असल्याची बाब तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सरकारने या संदर्भात तातडीने पावले टाकली आणि गेल्या दोन वर्षांत उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पादन करण्यात आले. एकीकडे उत्पादनात वाढ करण्याचे आणि संरक्षण स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडत असताना झालेल्या उत्पादनाची साठवणूक सुरक्षित असावी, याकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देण्यात आले असे म्हणण्यासारखी स्थिती दिसत नाही. देशातील दारूगोळ्याच्या सर्वात मोठय़ा भांडाराला आग लागली. सुमारे ७ हजार एकरमध्ये असलेल्या या भांडारातील एका गोदामात आग लागून तेथील दारूगोळा नष्ट झाला. सोबतच १९ जवान शहीद झाले आणि १७ जवान जखमी झाले. आगीच्या घटना ही काही नवीन बाब नाही. लष्करासाठी तर अजिबात नाही. जम्मू येथील दारूगोळा भांडाराला २००७ मध्ये आग लागली होती. या आगीत होरपळून १७ जण मृत्युमुखी पडले होते. भरतपूर दारूगोळा भांडाराला २००० मध्ये आग लागली होती. ही आग १५ ते १६ दिवस धगधगत होती. कोलकाता येथील दारूगोळा भांडाराला २०१० मध्ये आग लागली होती. यामध्ये कुणीही दगावले नाही; परंतु १५० टन दारूगोळा नष्ट झाला होता. आमला येथे २००४ मध्ये स्फोट झाला होता. याआधी पुलगाव दारूगोळा भांडारात दोनदा आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमधून आपण कोणता धडा घेतला, असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या वर्षांतील आगीच्या घटनांमधून आणि ‘कॅग’ने(महालेखाकार)देखील काही उणिवांवर बोट ठेवल्यानंतरदेखील देशाच्या सीमा रक्षणासाठी साठवून ठेवण्यात आलेला दारूगोळा सुरक्षित का असू शकत नाही. युद्धसज्जतेची तयारी करीत असताना युद्धसामग्री हे महत्त्वाचे अंग असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
संरक्षण खात्याची स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. दारूगोळा भांडाराची रचना आणि तेथील वातानुकूलन व्यवस्थेची गोपनीयता आहे. लष्करामार्फत चौकशी झाल्यानंतर आगीच्या घटनेची कारणेदेखील बाहेर येत नाहीत. देशाच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने गुप्तता बाळगण्यात येत असली तरी तांत्रिक किंवा मानवी चुकांमुळे उद्भवणाऱ्या स्थितीवर, उपाययोजनांवर काम होणे आवश्यक आहे.
अतिशय संवेदनशील असलेला दारूगोळा साठा ठेवताना आवश्यक काळजी घेतली जाते. एकत्रित शस्त्र न ठेवता त्याचे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात. यासाठी परिसरात अनेक ‘एक्स्प्लोसिव्ह स्टोअर हाऊस’ (ईएसएच) बांधण्यात आलेली असतात. साधारणत: दोन ईएसएचमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात येते. दोन गोदामांमधील भागात मातीच्या भिंती, झाडे-झुडपे लावलेली असतात. यामुळे एका गोदामाला लागलेली आग किंवा स्फोटाचे हादरे दुसऱ्या गोदामापर्यंत पोहोचणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाते. गोदामांची रचना, तेथील वातानुकूलन यंत्रणा तेथे ठेवण्यात येणाऱ्या दारूगोळ्याच्या प्रकारानुसार असते. आग लागू नये म्हणून स्वयंचलित यंत्रणा विकसित झाली आहे. उदाहरणार्थ, आगपेटीतील काडीने पेट घेतल्यास ती क्षणात आपोआप विझेल, अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.
याशिवाय आग लागण्याची कारणे, आग लागू नये म्हणून असलेली यंत्रणा आणि तरीदेखील आग लागली तर त्यानंतर करावयाच्या उपाययोजना अशी सर्व तयारी दारूगोळा भांडारातील अग्निशमन दलाकडे असते. यामुळे तेथे काम करीत असलेल्या प्रत्येकाला आग विझवण्याचे प्रशिक्षण असते. कोणत्या प्रकारची युद्धसामग्री असलेल्या गोदामाला आग लागली तर काय केले जावे, याचे ज्ञान असतानादेखील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्राणहानी झाली आहे.
स्फोट होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे अशी संवेदनशील युद्धसामग्री असलेल्या गोदामात उष्णता निर्माण होऊ दिली जात नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचे ज्ञान असते. आग प्रतिबंधक तंत्रज्ञान, आग लागण्याची शक्यता शोधून काढण्याचे तंत्रज्ञान आणि ज्वलन तंत्रज्ञान आहे. देशातील एकमेव राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय नागपुरात आहे; परंतु लष्करातील जवानांना या महाविद्यालयाचा लाभ घेता आला असता, परंतु तसे झाले नाही, असे दिसून येत आहे. ‘फायर फायटर’ तयार करण्याची लष्कराची स्वत:ची यंत्रणा असली तरी काळाच्या ओघात बदललेल्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण येथून घेता येणे शक्य आहे. वर्धा जिल्ह्य़ातील केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या प्राणहानीमुळे येथील अग्निशमन उपकरणांवर प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे. अत्याधुनिक शस्त्रसाठा ठेवण्यात येत असलेल्या भांडाराच्या अग्निसुरक्षेसाठी जुन्या पद्धतीच्या उपकरणाचा वापर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. गोदामापासून काही अंतरावर जलाशय असल्याने आगीचे बंब भरणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांचा स्फोटात मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्यास अत्याधुनिक अग्निशमन उपकरण नसणे हे कारण पुढे येत आहे.
संरक्षण मंत्रालयाने युद्धसामग्री वाढण्यावर भर देणे चांगली बाब आहे, परंतु हा शस्त्रसाठा ठेवण्यात येत असलेल्या गोदामांची काय स्थिती आहे, दारूगोळ्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण आणि उपकरणे पुरविली जात आहेत काय, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
अग्निशमन तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली आहे. आगीसंदर्भातील ‘स्टॅण्डर्ड प्रोसिजर’ पाळली न गेल्यास किंवा या प्रक्रियेबद्दल अज्ञान असल्यास आगीच्या घटना घडत असतात असे दिसून आले आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे दुर्घटना टळण्याची ९९ टक्के शक्यता असते. उरलेल्या १ टक्का शक्यतेमुळे उद्भवणाऱ्या आगीपासून बचावण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करून प्राणहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी सदैव दक्षता बागळणे हाच एकमेव पर्याय आहे.

मानवी चूकच कारणीभूत?
भूसुरुंग, ‘अ‍ॅन्टी टँक माइन्स’ असलेल्या गोदामाला आग लागल्यावर ती विझवण्याचा प्रत्यत्न केला जात नाही तर त्या आगीचा फैलाव रोखण्यासाठी उपाय केले जातात. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या ‘हार्ड झोन’मध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊ नये तर ‘कोल्ड झोन’मध्ये उभे राहून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करणे अपेक्षित असते. स्फोट घडलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणे, परिसरात आगीचा कमीत कमी परिणाम होईल, याबद्दल दक्षता घेतली जाते. आग लागू नये, आग लागल्यास स्थिती कशी हाताळावी यासंबंधीचे ‘स्टॅण्डर्ड प्रोसिजर’ आहे. टॅक्टिकल मॅनेजमेंटमध्ये लष्करी जवानांची चूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळेच दारूगोळा भांडारातील अग्नितांडवात एवढय़ा प्रमाणात प्राणहानी झाली असावी , असे राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयातील तज्ज्ञांचे मत आहे.

राजेश्वर ठाकरे
rajeshwar.thakre@expressindia.com