गेल्या काही वर्र्षांत गणेश विसर्जनापासून पबपर्यंत, वीकेन्डपासून पिकनिकपर्यंत आणि छोटय़ा मोठय़ा घरगुती पाटर्य़ापासून ‘इव्हेन्ट’पर्यंत उन्मादाची कमान चढत चालली आहे. संगीताच्या सुरांना हद्दपार करून बधिर प्रदेशात प्रवेश करण्याची इच्छा वाढू लागली आहे. उन्माद हे व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे लक्षण बनू लागले आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘राग महाबसंत, रागमाला मालिका’ कापडावर विणकाम, संजीव खांडेकर व वैशाली नारकर, २०१४

संगीत ही एक अजब चीज आहे. ज्यांना ती ‘कळते’ व कळून तिचा आनंद ते घेऊ शकतात ते सर्व सत्चारी व पुण्यात्मे असावेत असा माझा विश्वास आहे. माझ्यासारखे असंख्य पामर त्यांच्या पुण्यसंचयाच्या काठावर उभे राहूनच संगीत ‘कळण्याचा’ व कळून ते ऐकण्या, पाहण्याचा वा गात्रागात्रांनी अनुभवण्याचा प्रयत्न करतात. नशिबाने असे पुण्यात्मे मित्र म्हणून लाभल्याने मला संगीत नावाच्या अद्भुत रसाचा शिडकावा मिळाला. ज्या माझ्यासारख्याना संगीताचे फारसे व्याकरण, नियम व म्हणून त्यांचे गणित समजत नाही, त्यांना तरीही संगीताच्या नादावर वा तालावर वा नुसत्याच लकेरीवर आत उमलणारे धुमारे, नवीन नाहीत. जणू सारा आसमंत, हे विश्व, हे ग्रह, तारे, आकाश, – ही प्रचंड अनामिक निराकार ऊर्जा, कोणत्या तरी एका संगीत धुनीवर, तालावर वा गतेवर तरंगते आहे आणि काहीतरी ‘इथले’ ऐकताना ‘तिथल्या’ त्या वैश्विक संगीताची गत सापडावी, सम मिळावी असा अनुभव आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी आला आहेच. काहींना पुन:पुन्हा आला आहे. अशी गत किंवा वैश्विक सम मिळाल्याच्या क्षणाचा खुमार, इ’्र२२ किंवा साक्षात्कार कसा अपूर्व अनुभव असतो याच्या चर्चा आपण सर्वानीच केल्या आहेत. जगातल्या सर्व समाजात आदिम काळापासून संगीताच्या दैवीशक्तीच्या कथा, मिथके आणि दंत/लोककथा जागोजाग आढळतात. संगीत आपल्याला शारीर, मानसिक आणि आध्यात्मिक असा तिहेरी अनुभव देणारा ऊर्जास्रोत आहे, यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

लोहाराच्या घणांच्या घावाचा आवाज ऐकून पायथागोरस थबकला आणि वेगवेगळ्या वजनाचे व लांबीचे हातोडे वेगवेगळ्या पट्टीचे नाद निर्माण करत आहेत याचा त्याला अंदाज आला. त्याच्या शिष्यांनी पुढे जाऊन केलेल्या अभ्यासातून कंप पावणाऱ्या तारेची लांबी आणि त्यातून प्रगटणाऱ्या संगीताच्या आवाजाच्या प्रतीचे गुणोत्तर त्यांच्या ध्यानात आले. पायथागोरसची धारणाच मुळी आकडय़ांशी जोडली गेली होती. आकडे हेच प्रत्येक गोष्टीचे मूळ आहे आणि अस्तित्वाचे रूप हा त्या आकडय़ांच्या गुणोत्तराची अभिव्यक्ती आहे असे त्याचे मत होते. प्लेटोने हाच धागा पकडून ग्रहताऱ्यांच्या हालचालीतून एका दैवी संगीताची निर्मिती होते आणि एका शाश्वत (गणिती) समीकरणाच्या पोटातून जन्म घेते असे सांगितले होते. ‘ज्याप्रमाणे मानवी आत्मा हे विविध भूतांचे (पंच महाभूतांचे) एका विशिष्ट समतोलात बांधलेले एक गणिती समीकरण आहे व जेव्हा जेव्हा हा समतोल ढळतो तेव्हा तेव्हा जसा मनुष्याला उदासी, निराशा, मलिनता असे अनेकविध अनुभव येतात, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे संगीत माणसावर वेगवेगळे परिणाम करू शकते’, असे पायथागोरसला जाणवले होते. एका दारूच्या नशेतल्या तरुणाला मंद आणि ‘गोड’ किंवा तरल संगीत ऐकवून त्याने शांत केले होते, अशी जशी कथा आहे तशीच कृष्णाच्या मोहक, मादक व जादुई बासरीच्या कथा वा शंकराच्या डमरूच्या डिमडिमाच्या कथा आपल्याकडे कमी नाहीत. प्रश्न असा आहे की एका विशिष्ट गणिती समीकरणात बांधलेल्या व आपल्या भवतीच्या हवेत काही विशिष्ट कंपने निर्माण करणाऱ्या या लहरी आपल्यावर (भवताल व प्राणिमात्रांवर) असा अन्तर्बाह्य़, शारीर परिणाम कसा व का करतात? संगीतशास्त्र, मानसशास्त्र, मानस पदार्थ विज्ञान, भाषाशास्त्र, मज्जाशास्त्र, मज्जा व मेंदूक्रिया विज्ञान, इथॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स, संगणक वा तत्सम अशा विविध शास्त्रांना एकत्रित करून आज जगात अनेक ठिकाणी संगीताचा चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास चालू आहे. ‘प्रत्येक रोग हा संगीताचा प्रश्न आहे व प्रत्येक औषध हे सांगीतिक उत्तर आहे’ असे टोकाचे विधान करणाऱ्या डब्ल्यू. एच. ऑडेनची अतिशयोक्ती जरी बाजूला ठेवली तरी या संगीताचे गणित हे माणसाला पडलेले सुंदर स्वप्न कोडे आहे हे निश्चित.

संगीताचे कीर्तन मांडणे हा या लेखाचा हेतू नाही. गेल्या आठवडय़ात माझ्या घराशेजारी गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आणि काही नव्याच प्रश्नांचा भुंगा डोक्यात सुरू झाला. ढोल व ताशे व त्यांचे ध्वनिसंवर्धन करणारे स्पीकर यांचे कर्णकर्कश भयंकर उत्पाती आवाज माझ्या बंद खिडक्यांची तावदाने फोडून माझ्या डोक्यात आदळत होते. त्या आवाजानं माझी अवस्था एखाद्या अशक्त माणसासारखी चेतनाहीन झाली होती, तर माझे सर्व कुत्रे अक्षरश: भयकंपाने थरथरत माझ्या पलंगाच्या खाली आक्रसून बसले होते. त्यांच्या जिभा बाहेर आल्या होत्या व डोळे भिरभिरत होते.

बाहेरचे दृश्य- मिरवणुकीचे दृश्य मात्र नेमके याच्या विरुद्ध होते. माणसे नाचत होती, बेभान होती, वाजवणारे चेकाळले होते, कुणी त्यांच्यावर हजारो रुपयांच्या नोटा उधळून काही मिनिटे नाचून पुढे जात होते.

वाजवणाऱ्यांत- भले मोठे ढोल वाजवणाऱ्यांत अनेक तरुण मुली होत्या. देहभान विसरून त्या ढोल वाजवीत होत्या. बहुतेकींच्या गळ्यात भगवे दुपट्टे होते, कुणी केस मोकळे सोडून, तर कुणी एका भलत्याच तंद्रीत असल्यासारख्या बेबंद व बेदरकारपणे ढोल वाजवीत होत्या.

हे सर्व पाहून दोन प्रश्न माझ्या मनात पुन:पुन्हा उमटत आहेत. पहिला प्रश्न असा की, हे जे काही कर्कश होते ते संगीत आहे/होते काय? ज्या आवाजाने माझ्या छातीत दुखत होते, त्या आवाजात तल्लीन होणारी हजारो माणसे, स्त्रिया, आबालवृद्ध बेभान नाचतानाही दिसत होते. दुसरा प्रश्न असा की, या मिरवणुकीत वाढलेला ढोल वाजवणाऱ्या स्त्रियांचा सहभाग व त्यांचा अवतार किंवा अभिव्यक्तीत आलेला अमानुष, वेडा, उतू जाणारा उन्माद- या उन्मादाचा अर्थ काय? संगीत कळणाऱ्या जयंत जोशींसारख्या माझ्या मित्रांना मी याबद्दल विचारले असता जे वाजत होते ते संगीत नाही असेच जवळपास साऱ्यांचे मत होते. मग वाजत होते ते काय होते? जे वाजत होते त्यावर जे नाचत होते ते काय होते?

जवळपास असाच अनुभव आपल्याला पबमध्येही येतो. काहीतरी अतिजोरकस, छाती दडपणारे वाजत असते, म्हटले तर त्या वाजण्याला एक अति आदिम रानटी ताल असतो आणि त्या गदारोळात नाचणारे भान विसरून एका वेगळ्याच नशेत नाचत असतात.

इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते व जी कविता संगीतापासून तुटते ती कविता तिच्या मरणाकडेच चालत असते.’

विसर्जनाची मिरवणूक असो वा पबमधील दणदणाट या दोन्ही कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात हजारोंना नाचवण्याची शक्ती असेल, तर त्या गोंगाटाला संगीत म्हणण्यावाचून पर्याय राहत नाही. मग तो गोंगाट मला किंवा जयंत जोशींना नाचायला उद्युक्त का करत नाही?

हा प्रश्न नवा नाही, गेली काही वर्षे, दरवर्षी पडणारा हा प्रश्न आहे. परंतु या वर्षी मिरवणुकीत ढोल वाजवणाऱ्या मुलींची वाढती संख्या व पाठोपाठ सोशल मीडियावरून फिरणारे त्यांचे बेफाट फोटो पाहून मला अचानक या प्रश्नाकडे पाहण्याचा नवा कोन मिळाला असे वाटले.

मला ‘डोरा’ आठवली. डोरा. फ्रॉइडची डोरा. जिच्या उन्मादावर फ्रॉइड उपचार करत होता ती डोरा. फ्रॉइडचे उपचार सोडून पळून गेलेली डोरा. उन्मादी स्त्रीला काय हवे असते या प्रश्नाचे वादळ फ्रॉइडच्या डोक्यात उठवणारी डोरा. या डोराचे आणि तिच्या उन्मादाचे काय करायचे, हे फ्रॉइडला अखेपर्यंत समजलेच नाही.

हिस्टेरिया किंवा उन्मादाचा उगम इच्छांचे दमन झाल्यामुळे नव्हे, तर इच्छांचे अतिमुक्त प्रगटीकरण किंवा विमोचन केल्यामुळे नव्या जगातील ‘उत्सवी’ आणि ‘टबरे’ भांडवलशाहीच्या विकासाच्या रेटय़ामुळेच होते असे माझे मत आहे. (विकासाच्या असमतोलातून न्युरोसिस होऊ शकतो, असे आज नव्या फ्रॉइडने या शेकडो ढोल वाजवणाऱ्या ‘डोरा’ पाहून म्हटले असते काय?)

डोराचा उन्माद हा तिच्या दाबल्या गेलेल्या इच्छांना मोकळे करण्याचा मार्ग होता. अंगात आलेल्या स्त्रीला तिला जे जे नाकारले ते हवे असते. तिच्या कोंडलेल्या इच्छांना मुक्त करण्याचा तो तिचा केविलवाणा प्रयत्न असतो. अशा प्रयत्नात ती काही क्षण कोणालाच जुमानत नाही, बंधने मानत नाही, तिचा आवाज बदलतो, ती पुरुषी आवाजात बोलू लागते, दारू व कोंबडी मागते, पुरुषाला मिळणारी गोष्ट तिला हवी असते. ती ती मिळवते व शांत होते. अंगात येण्यासाठी ती देवीचा वार, अमावस्या-पौर्णिमासारखा ‘मिथिकल’ दिवस निवडते, तिचे अंगात येणे ‘नियमित’ व्हावे/करावे हा तिचा प्रयत्न असतो. तिचे वेडे व वाकडे वागणे दैवी कोप/प्रकोप म्हणून पाहावे हा तिचा आग्रह असतो.

कानठळ्या बसवणारे संगीत (?) मग ते विसर्जनाच्या मिरवणुकीतील असो वा पबमधील असो, अशा संगीतात आपण काय ऐकतो? या प्रश्नाचे उत्तर काही नाही असेच असते. हे गोंगाटाचे आवाज कान व ऐकण्याची व ऐकून प्रतिसाद देण्याची आपली क्षमताच बधिर करतात. बधिराला कोणताच आवाज ऐकू येत नाही. बधिर होणे व बधिर करणे ही अंगात आलेल्या/उन्मादित व्यक्तीची त्या अवस्थेत जाण्याची पूर्वअट असते. बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते. शांतता, व्यवस्था व संगीताचे गणित हा जर समाजाचा ‘द आदर’ किंवा अधिष्ठान असेल, नियम किंवा नियंत्रण असेल तर त्याला बधिर करणे ही कोंडलेल्या इच्छेची त्यावरची प्रतिक्रिया असते.

उद्ध्वस्त मानवी संबंध, नव भांडवलशाहीच्या वेगाच्या रेटय़ात हरवलेले स्वत्व, रोज नव्या ‘प्रॉडक्ट’ची खरेदी करूनही नियंत्रित मूल्येनाशामुळे- मूल्यशून्यतेमुळे येणारे असमाधान, कल्ल३ी१ल्लं’्र२ी िकिंवा रुजलेल्या, शरीरमनाचा अविभक्त भाग बनलेल्या मुक्त बाजारपेठेला बदलण्याची शक्यता व क्षमता हरवलेल्या समाजात प्रत्येक ढोल वाजवणारी स्त्री वा पुरुष व त्याच्या तालावर नाचणारी स्त्री वा पुरुष हे सारेच डोरा बनलेले असतात. ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती’ ही त्यांची समस्या असते. नसलेल्या इच्छांची पूर्ती करण्याची सक्ती करणारी व्यवस्था व तिची महाकाय गुंतागुंत ही त्यांच्या मनातली भीती असते. विसर्जनाची मिरवणूक असो वा पबमधील गोंगाट, त्यांची बधिर करण्याची व बधिर होण्याची क्रिया, हीच त्या कोंडीची मुक्तीची संधी असते.

जमावाने चेकाळणे व विसर्जनानंतर किंवा पबमधील म्युझिक बंद झाल्यानंतर यांत्रिकपणे काही घडलेच नाही अशा आविर्भावात दैनंदिन कामावर परतणे, शक्तिपात झाल्यासारखे मुकाट परतणे आणि अंगात आलेल्या बाईने दारू-कोंबडी साफ केल्यानंतर कोसळणे यात गुणात्मक फरक फारसा नाही. मात्र जेव्हा जमाव चेकाळतो, दरवर्षी अधिकाधिक उधळतो तेव्हा अशा हिस्टेरियामध्ये हिंसा व राजकीय आंकाक्षांचे रसायन मिसळणे सोपे असते हे विसरून चालणार नाही.

गेल्या काही वर्र्षांत विसर्जनापासून पबपर्यंत, वीकेन्डपासून पिकनिकपर्यंत आणि छोटय़ा मोठय़ा घरगुती पाटर्य़ापासून ‘इव्हेन्ट’पर्यंत उन्मादाची कमान चढत चालली आहे. संगीताच्या सूरांना हद्दपार करून बधिर प्रदेशात प्रवेश करण्याची इच्छा वाढू लागली आहे. उन्माद हे व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे लक्षण बनू लागले आहे. उन्मादाचा आविष्कार नेहमीच उथळ असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, तसा या नव्या उत्सवी उन्मादाला ढणढणाट फार. हा ढणढणात व खडखडाट, डब्ल्यू.एच.ऑडेन म्हणतो तसा आपल्या संगीताला व म्हणून जीवन ऊर्जेला लागलेला रोग आहे.

जयंत जोशींना या ढोल संगीतात बळीच्या मिरवणुकीचा आवाज ऐकू आला. पं. कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’सारखा निश्चितच जरी तो प्रत्ययकारी श्रवणीय आवाज नसला, तरी त्यातील कारुण्य व आकांत ऐकू न येता मला तो दिसला. बळीच्या मिरवणुकीत बळी जाणाऱ्याचा व त्याच्या आप्तांचा आक्रोश ऐकू न यावा म्हणून ढोल बडवण्याची प्रथा होती. या ढणढणाटात आपण बळी कोणाचा देतोय? आपला की आपल्याला हजारो वर्षे बांधून ठेवणाऱ्या आपल्या वेदनेचे वा आनंदाचे रूप घेऊन अवतरलेल्या संगीत नावाच्या दैवी शब्दाचा?

ज्या प्रमाणात ढोल वाजवणाऱ्यांची, ते ऐकून नाचणाऱ्यांची, त्यांना बडवण्यास उद्युक्त करणाऱ्यांची, त्यांच्या उन्मादाला तासन्तास प्रक्षेपित करून अशा गदारोळाचे सौंदर्यशास्त्र बनवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता साऱ्या समाजाचा बळी चालला आहे काय, एका निष्प्राण समाजाची निर्मिती होते आहे काय, कलेवरांचा उत्सव मांडला आहे काय, याची भीती वाटते.
लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.
sanjeev.khandekar@gmail.com