आपल्या देशासाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन तारखांचे महत्त्व अतिशय आहे. प्रत्येक भारतीयासाठी जवळपास त्याच्या वाढदिवसाइतके च महत्त्व खरेतर या तारखांना आहे, असायला हवे. १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन तर २६ जानेवारीला आपण संविधानाचा स्वीकार के ला आणि प्रजासत्ताक देश म्हणून आपली वाटचाल सुरू झाली. यंदा आपण भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. दरवर्षी या दिवशी दिल्लीत होणारी खास परेड, चित्ररथ, त्याचे दूरदर्शनवरून होणारे थेट प्रक्षेपण, शाळेतील ध्वजवंदन या गोष्टी आपल्यातील अनेकांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असतात. भारतीय सैन्याची अपार क्षमता दर्शवणारी देखणी परेड आणि प्रात्यक्षिके तसेच निरनिराळ्या संकल्पना घेऊन सजवलेले विविध राज्यांचे चित्ररथ, हा साराच सोहळा नयनरम्य असतो. हे झाल्यावर जिलेबी तर व्हायलाच हवी. आपल्याकडे अनेक ठिकाणी खास २६ जानेवारीसाठी जिलेबी विक्रे त्यांची निराळी तयारी असते. नेहमी आपल्यासाठी, कु टुंबातील एखाद्या मंगलप्रसंगी जिलेबी खाल्ली जाते पण या दिवशी जिलबी खाताना आपल्या देशातला स्वातंत्र्याचा गोडवा, लोकशाहीचा आनंद मनात असतो. सध्या समाजमाध्यमांमुळे अनेक जुन्या गोष्टी, छायाचित्रे समोर येताना दिसतात, त्याचप्रमाणे पहिला प्रजासत्ताक कसा साजरा के ला होता याविषयीचे लेख, छायाचित्रे यंदा व्हायरल होताना दिसत आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यावेळची काही छायाचित्रे, चित्रफिती व्हायरल होताना दिसतात. अर्थात हे सारे एकमेकांना पाठवताना आपल्याकडे आलेले लेख, छायाचित्र हे साहित्य खरे आणि वैध आहे ना, याची खात्री करायला हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा